आजच्या पिढीला पडलेला सर्वात अवघड प्रश्न How to discover your passion? त्याचबरोबर पालकही चिंतित असतात.

दिनांक: 30-04-2024

By- Siddhesh

आपल्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. त्याला अनुसरून आपण करियर निवडायला हव. पुढे दिलेल्या 10 क्षमता तुम्हाला अचूक आवड शोधायला मदत करतील.

१. संगीत क्षमता(Music Ability)

जे लोक संगीत ऐकण्यात आनंद घेतात, ज्यांना  ऐकून चांगले शिकता येते आणि कानाला काय आनंददायी वाटतात याची तीव्र जाणीव असते. त्यांच्यासाठी वाद्य वाजवणे, गाणे गाणे किंवा संगीत तयार करणे चांगले पर्याय असू शकतात. 

Credit: Unsplash

२.नैसर्गिक क्षमता(Nature Ability)

जे लोक निसर्गात वेळ घालवण्याचा आनंद घेतात, त्यांना वनस्पती आणि प्राणी आवडतात आणि विविध कंपाऊंड, एलिमेंट एकमेकांशी कसा संपर्क साधतात यात रस घेतात. त्यांच्यासाठी करिअरच्या मार्गात स्वयंपाक, शेती, प्राण्यांसोबत काम करणे, औषधांसोबत काम करणे आणि आरोग्यामध्ये काम करणे यांचा समावेश होतो.

Credit: Unsplash

३. हालचाल क्षमता(Movement Skills)

जे लोक त्यांच्या शरीराची हालचाल करण्यात आनंद घेतात, मग त्या मोठ्या स्फोटक हालचाली असोत किंवा अगदी लहान, सूक्ष्म हालचाली असोत. खेळ, नृत्य, उत्तम कारागिरी, वैयक्तिक प्रशिक्षण आणि अगदी मार्शल आर्ट्स हे त्यांच्या करिअरचे संभाव्य मार्ग असू शकतात

Credit: Unsplash

४ . परस्पर क्षमता(Interpersonal Skill)

जे लोक सहसा लोकांमधील नातेसंबंध समजून घेतात किंवा ज्यांचा संभाषणात हाथखंडा आहे  अशांसाठी संभाव्य करिअर मार्ग: सेल्स, Social Content तयार करणे (जसे की मुलाखती आणि टॉक शो), कार्यक्रमाचे नियोजन, नातेसंबंध समुपदेशन आणि अगदी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये काम करणे.

Credit: Unsplash

५. आंतरवैयक्तिक क्षमता(Intrapersonal Ability)

ज्या लोकांना स्वतःबद्दल खोल समज आहे. जी एक अत्यंत शक्तिशाली क्षमता आहे. थेरपिस्ट, स्व-सुधारणा प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते यासारखे व्यवसाय ह्या व्यक्तींना शोभून दिसतात. व त्या त्यात उत्तम असतात. 

Credit: Unsplash

६ . तार्किक क्षमता(Logical Ability)

ज्या लोकांना गणित आणि विज्ञानात रस आहे. व जे भावनेपेक्षा तर्कावर काम करतात. ते महान गुंतवणूकदार, शास्त्रज्ञ, शोधक, उद्योजक बनू शकतात. 

Credit: Unsplash

७. भाषिक क्षमता: Linguistic Ability

ज्या लोकांना त्यांची स्वतची भाषा आणि भावना समजते. जे उत्तम वाचण्याचा आणि ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात. हे लोक लेखक, वक्ते, कवी, कॉपीरायटर किंवा अनुवादक बनू शकतात.

Credit: Unsplash

८ . डिजिटल क्षमता (Digital Ability)

या श्रेणीत येणारे लोक तरुण पिढी आहेत. सोशल मीडिया, एसइओ(SEO), मार्केटिंग, मीम्स, व्हायरल होणे या सर्व गोष्टी या डिजिटल करियर च्या श्रेणीत येतात.

Credit: Unsplash

९. व्हिज्युअल क्षमता.Visual Ability.

ज्या लोकांना सौंदर्यशास्त्राची उच्च समज आहे ते करिअरच्या संभाव्य मार्गांमध्ये आर्किटेक्ट, चित्रकार, ॲनिमेटर, फॅशन डिझायनर आणि ग्राफिक डिझायनर यांचा विचार करू शकतात. 

Credit: Unsplash

१०. शिकवण्याची क्षमता (Teaching Ability)

जे लोक क्लिष्ट विषय, संकल्पना लहान मुलांनाही समजतील अशा स्पष्ट,सोप्या  पद्धतीने सांगतात. यासाठी संभाव्य करिअर मार्ग म्हणजे शिकवणे, सल्ला देणे ,शैक्षणिक कंटेंट तयार करणे आणि पालकत्व प्रशिक्षण.

Credit: Unsplash