Date: 18-02-2024

NAMO MahaRojgar Melava 2024

महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

कधी,कुठे आणि किती वाजता होणार?

दिनांक : 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत स्थान : हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवाडा, ठाणे (पश्चिम)

नमो रोजगार मेळावा 2024 शैक्षणिक निकष

महारोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.

आवश्यक कौशल्ये

एमएस-सीआयटी,संगणक,टॅली फिटर,इलेक्ट्रिशियन,टायपिंग-मराठी, इंग्रजी, कॅड आणि इंजिनीअर ड्रॉइंग,संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक,वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक मशिनिस्ट.. आणखी बरेच

नोंदणी कशी करावी

रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून वेबपोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करा

 या प्रशिक्षणाअंतर्गत विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी , स्वपरिचयपत्र  (Resume) तयार करणे, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य यासाठीचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात येत आहे

दोन लाख युवक युवतींना रोजगार