गरिबी आणि अनामिकतेच्या अंधारातून बाहेर पडलेल्या आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नायक बनलेल्या व्यक्तीची कहाणी.

Credit : Unsplash 

दिनांक : १४-०३-२०२४

ही व्यक्ती कोण आहे? नरेंद्र दामोदरदास मोदी असे त्यांचे नाव आहे. वडनगर हे गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. तेथे त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला.

Credit : Google

घरात सहा भाऊ-बहीण होते, तिसरा क्रमांक नरेंद्रचा होता. नरेंद्रला एक मोठी बहीण देखील होती, तिचे बालपणीच निधन झाले. आईचे नाव हिराबेन मोदी व वडिलांचे नाव दामोदर मोदी . 

Credit : Google

नरेंद्रच्या वडिलांचा वडनगर रेल्वे स्थानकावर चहाचा छोटासा स्टॉल होता जेथे धाकटा नरेंद्र वडिलांना चहा देण्यासाठी मदत करत असे. अभ्यासात तो सरासरी विद्यार्थी असला तरी त्याला नाट्य आणि खेळात भाग घेण्याची खूप आवड होती

Credit : Google

१९६७ मध्ये नरेंद्र मोदींनी अगदी लहान वयातच कौटुंबिक जीवन सोडले. सुमारे २ वर्ष ,९ दिवस भारतात प्रवास केला. यावेळी ते थेट अहमदाबादला गेले.येथे त्यांनी काही दिवस त्यांच्या मामाच्या चहाच्या कॅन्टीनमध्ये काम केले.

Credit : Google

पुन्हा एकदा वकील साहेबांची भेट झाली व येथूनच त्यांच्या RSS च्या कारकिर्दीला सुरुवात झाली.ते संपूर्ण वेळ RSS च्या कामात घालवू लागले. यावेळी त्यांनी गुजरातच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या विषयांवर प्रचार केला.

Credit : Google

१९७५ देशात आणीबाणीच्या काळात  RSS सारख्या संघटनांवरती बंदी आणली. तरीही मोदीजी कामातून मागे हटले नाहीत. त्यांच्यावर या आणीबाणीला विरोध करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जी त्यांनी चोख पार पाडली.

Credit : Google

१९७८ मध्ये त्यांना आरएसएसचे प्रादेशिक संघटक बनवले. यादरम्यान त्यांनी “संघर्ष मा गुजरात” नावाचे पुस्तकही लिहिले! १९८० मध्ये गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षणही पूर्ण.१९८५  मध्ये त्यांची बांधिलकी,मेहनत पाहून RSS ने त्यांना भाजपच्या ताब्यात दिले.

Credit : Google

१९८७ मध्ये, ते बीजेपीचे सचिव म्हणून सामील झाले.या काळात ते अटलबिहारी वाजपेयीजींच्याही जवळचे झाले. आज त्यांच्या भाषेतही वाजपेयीजींची प्रतिमा स्पष्टपणे दिसते.नरेंद्र मोदी १९९८ मध्ये पक्षाचे सरचिटणीस बनले

Credit : Google

Credit : Google

२००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केशू भाई पटेल यांची नियुक्ती केली गेली होती. वास्तविक, त्या दिवसांत केशूभाईची तब्येत खूपच खराब होती, त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात योग्य उमेदवार फक्त नरेंद्र मोदी होते.

Credit : Google

२०१४ मध्ये वाराणसीकडून पहिले लोकसभा इलेक्शन लढले व रेकॉर्ड ब्रेक victory हाती लागली. ते म्हणतात की पूर्ण देश माझा परिवार आहे.जनतेचा मोदींवरच्या विश्वासामुळे २०१४ व २०१९ मध्ये जनतेने त्यांना सर्वाधिक मते देऊन विजयी केले.

Credit : Google

१. ग्रीसचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर २. फ्रान्समधील सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर ३. इजिप्तने ऑर्डर ऑफ द नाईल 

सन्मान व पुरस्कार

Credit : Google