Table of Contents
Toggleभारतीय अंतराळ स्टार्टअप अग्निकुलने जगातील पहिले 3D-प्रिंट केलेले रॉकेट इंजिन लॉन्च करून इतिहास रचला आहे
Congratulations @AgnikulCosmos for the successful launch of the Agnibaan SoRTed-01 mission from their launch pad.
— ISRO (@isro) May 30, 2024
A major milestone, as the first-ever controlled flight of a semi-cryogenic liquid engine realized through additive manufacturing.@INSPACeIND
बातमी
Agnibaan Rocket Launch: अग्निबान SOrTeD (सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) गुरुवारी सकाळी 7:15 वाजता यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले.गुरूवारी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरून रॉकेटने आकाशात झेपावल्यानंतर अनेक विभागात प्रथम असल्याचे दर्शविले आहे.
श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये असलेल्या अग्निकुलच्या धनुष या खाजगी लॉन्चपॅडवरून प्रथमच रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले, असे ते म्हणाले.
Space Regulator IN-SPACe चे प्रमुख म्हणाले की, जगात प्रथमच अग्निकुलने डिझाइन केलेले आणि विकसित केलेले सिंगल-पीस, थ्रीडी प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक इंजिन प्रक्षेपण वाहन चालविण्यासाठी वापरले गेले.
पुन्हा भारत ह्या ४ ठिकाणी प्रथम:
- पहिले खाजगी लाँचपॅड: हे भारतातील पहिल्या खाजगी लॉन्चपॅडवरून लॉन्च करण्यात आले, ज्याचे नाव “धनुष” आहे, जे अग्निकुलनेच विकसित केले आहे.
- जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन: “अग्निबान SOrTeD” (सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) नावाच्या रॉकेटने जगातील पहिले सिंगल-पीस, 3D-प्रिंट केलेले इंजिन वापरले.
- अर्ध-क्रायोजेनिक तंत्रज्ञान: इंजिन अर्ध-क्रायोजेनिक इंधन/semi-cryogenic fuel द्वारे चालवले होते, भारताच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये हे पहिल्यांदाच.
- सब-ऑर्बिटल फ्लाइट: प्रक्षेपण सब-ऑर्बिटल होते, म्हणजे रॉकेट अंतराळात पोहोचले पण पृथ्वीवर परत आले.
Agnikul Cosmos: भारतातील स्पेस स्टार्टअप
अग्निकुल कॉसमॉस:
- अग्निकुल कॉसमॉस हे एरोस्पेस उद्योगातील एक भारतीय स्टार्टअप आहे
- स्थापना – २०१७
- स्थापक/Founder: श्रीनाथ रविचंद्रन आणि मोईन एसपीएम
- त्यांनी IIT MADRAS च्या नॅशनल सेंटर फॉर कम्बशन R&D (National Centre for Combustion R&D (NCCRD) येथे कंपनी सुरू केली होती.
- उद्दिष्टे: त्यांची स्वतःची छोटी उपग्रह प्रक्षेपण वाहने विकसित करणे आणि प्रक्षेपित करणे हे त्यांचे ध्येय आहे.
- त्यांच्या मुख्य प्रक्षेपण वाहनाला अग्निबान हे नाव देण्यात आले आहे. ते सुमारे ७०० किमी परिभ्रमण करण्यासाठी ३०० किलोपर्यंतचे पेलोड (Payload) वाहून नेऊ शकते.
अग्निकुलचे आतापर्यंतचे यश:
- “धनुष” नावाचे भारतातील पहिले खाजगी लॉन्चपॅड विकसित केले.
- 30 मे 2024 ला पूर्णपणे 3D-प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिले रॉकेट लाँच केले, ज्याला अग्निबान-SOrTeD नाव दिले गेले.
- डिसेंबर 2020 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत एक महत्त्वपूर्ण करार केला, ज्यामुळे त्यांना ISRO चे कौशल्य आणि सुविधा मध्ये प्रवेश मिळाला. इस्रोसाठी ह्या खाजगी कंपनी सोबतचा हा पहिलाच करार होता.
- अग्निकुल हे भारतीय अंतराळ उद्योगात एक चांगले अर्थसहाय्यित स्टार्टअप मानले जाते, ज्याने आतापर्यंत $42 दशलक्ष जमा(Capital Raise) केले आहे.
#ISRO, you have done it once again!
— Dr Jitendra Singh (मोदी का परिवार) (@DrJitendraSingh) May 30, 2024
🚀 Incredible achievement for India!
#Agnibaan Rocket’s successful launch with the world's first single-piece 3D printed semi - cryogenic engine showcases India's Space ingenuity.
Best wishes Team @AgnikulCosmos pic.twitter.com/rlzMJBk9QC
अग्निबानचे डिझाइन आणि तंत्रज्ञान काही महत्त्वाच्या गोष्टी:
१) 3D-मुद्रित इंजिन (अग्निलेट): जगातील पहिले सिंगल-पीस, 3D-printed इंजिन. हे नाविन्यपूर्ण तंत्र पारंपारिक उत्पादन पद्धतींच्या तुलनेत हलक्या, अधिक कार्यक्षम डिझाइनसाठी ओळखले जाते.
२) बदलण्यायोग्य डिझाइन: रॉकेटमध्ये मॉड्यूलर किंवा “प्लग-अँड-प्ले” डिझाइन आहे. याचा अर्थ स्टेज जोडून किंवा काढून टाकून विविध कॉन्फिगरेशन तयार केले जाऊ शकतात, ज्यामुळे ते विविध पेलोड्स आणि मिशन आवश्यकतांशी जुळवून घेईल.
३) अर्ध-क्रायोजेनिक इंजिन: अग्निलेट इंजिन अर्ध-क्रायोजेनिक इंधन द्वारे चालते. हे पारंपारिक रॉकेट प्रोपेलेंट्सपेक्षा चांगले कार्यप्रदर्शन देते परंतु उच्च-शक्तीच्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रायोजेनिक इंधनापेक्षा कमी जटिल आहे.