“प्रत्येकाच्या मनात एक सुंदर स्वप्न असतं, परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचं. त्या स्वप्नाची पहिली पायरी म्हणजे TOEFL. हा एक असा दरवाजा आहे, जो उघडल्यावर ज्ञानाच्या नवीन विश्वात प्रवेश मिळतो. तुमच्या इंग्रजी भाषेच्या कौशल्यांवर आधारित हा प्रवास तुमचं भविष्य घडवू शकतो.”
- TOEFL म्हणजेच “Test of English as a Foreign Language”
- ही एक महत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेचा उद्देश असा आहे, की तुमची इंग्रजी भाषा कशी आहे हे मोजणं.
- जगभरातून अनेक विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी,शिकण्यासाठी, परदेशात जातात त्यासाठी TOEFL ची तयारी करतात.
TOEFL परीक्षा तुमचा आत्मविश्वास वाढवते, कारण ती केवळ एक परीक्षा नसून, तुमच्या भाषिक प्रवासाचा, तुमच्या मेहनतीचा, तुमच्या स्वप्नांचा साक्षीदार असते.
Table of Contents
ToggleTOEFL म्हणजे काय? व ती का महत्वाची आहे?
What is TOEFL and why is it important?
TOEFL (Test of English as a Foreign Language) ही एक अशी परीक्षा आहे जी प्रामुख्याने US(यूनायटेड स्टेट्स) मधील विद्यापीठांमद्धे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे दिली जाते. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की,TOEFL चा score जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये देखील स्वीकारला जातो. तुम्ही तुमचा TOEFL स्कोअर यूएसए, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड सारख्या देशांमधील युनिव्हर्सिटीससाठी वापरू शकता. तरीही इच्छुक ठिकाणी अर्ज करण्यापूर्वी cut off – score तपासून घेणे आवश्यक आहे.
हे माहीत आहे का?
TOEFL ही परीक्षांची मालिकाच आहे. यात अनेक प्रकारच्या परीक्षा आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय परीक्षा म्हणजे TOEFL iBT आणि TOEFL Essentials. या परीक्षा व्यतिरिक्त, TOEFL ITP, TOEFL ज्युनियर आणि TOEFL प्राथमिक या इतर प्रकारच्या परीक्षाही आहेत. मात्र, या परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या माध्यमातूनच उपलब्ध आहेत. TOEFL PBT(Paper Based Test) ही परीक्षा, जी कागदी स्वरूपात होती, एप्रिल 2021 मध्ये बंद करण्यात आली.
- TOEFL परीक्षा चार भागात विभागली आहे. वाचन, ऐकणे, बोलणे आणि लेखन.
- TOEFL iBT ही एक लांब आणि कठीण परीक्षा आहे, जी इंग्रजी भाषा बोलणार्या विद्यापीठात शिकण्यासाठी विद्यार्थी तयार आहेत की नाही हे तपासते. अनेक विद्यार्थी ही परीक्षा देण्यापूर्वी 3 ते 6 महिने तयारी करतात.
- TOEFL Essentials ही एक सोपी इंग्रजी परीक्षा आहे, जी शैक्षणिक विषयांवर कमी फोकस करते.
TOEFLचा score कसा मोजतात? व तो साधारण किती असायला हवा?
अधिकांश विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट TOEFL SCORE आवश्यक आहे. हा आवश्यक SCORE तुमच्या निवडलेल्या विद्यापीठ आणि तुम्ही शिकण्यासाठी निवडलेल्या विषयावर आधारित बदलू शकतो.TOEFL iBT परीक्षेत तुमचा स्कोर 0 ते 120 पर्यंत असू शकतो. Essentials परीक्षेत तुमचा स्कोर 1 ते 12 पर्यंत असू शकतो.
लक्षात ठेवा:
TOEFL iBT परीक्षेचा स्कोर परीक्षा दिल्याच्या दहा दिवसांनंतर उपलब्ध होतो. TOEFL Essentials परीक्षेचा स्कोर परीक्षा दिल्याच्या सहा दिवसांनंतर उपलब्ध होतो. हा स्कोर दोन वर्षांसाठी वैध असतो.
TOEFL कोणत्या प्रशासकीय संस्थेद्वारे घेतली जाते?
TOEFL ही Educational Testing Service (ETS) (प्रिन्स्टन, न्यू जर्सी येथे स्थित) नावाच्या एका अमेरिकन संघटनेद्वारे घेतली जाते. हीच संघटना TOEIC ही आणखी एक इंग्रजी परीक्षाही तयार करते, जी कॉर्पोरेट लोकांसाठी विशेषत: तयार केली आहे.
TOEFL एका दृष्टीक्षेपात:
TOEFL ही परीक्षा का घ्यावी? | यूएसए, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके किंवा कॅनडामधील विद्यापीठांना अर्ज करण्यासाठी |
किंमत | US $100-$320 |
वेळ | 90 मिनिटे (Essentials) व 180 मिनिटे (iBT) |
परीक्षेचा निकाल | 6 ते 10 दिवसांत |
परीक्षेचे स्थान | अधिकृत चाचणी केंद्रे |
स्कोरची वैधता | 2 वर्ष |