माझा मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजासी जिंके
असे मराठी भाषेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. काना, मात्रा, अनुस्वार, वेलांटी सौंदर्याने नटलेली आपली मराठी आहे. याच आपल्या मराठी भाषेला (Marathi Language) आता अभिजात (classical language) भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. पण अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? भाषाला अभिजात दर्जा मिळाल्याने फायदा काय होतो? आणि यासाठी निकष काय असतात? हे प्रश्न पडणे सहाजिकच आहे. आणि त्यामुळेच याच संदर्भात तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही खाली देण्याचा प्रयत्न केला आहे.
Table of Contents
Toggleभाषेला अभिजात (Marathi Language) दर्जा मिळणे म्हणजे नक्की काय?
तर हा दर्जा मिळाल्यावर भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उमटते.
आपल्या मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आलेली. देशात आतापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. आता यात मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे
अभिजात भाषेचा दर्जा (Marathi Language) मिळाल्याने फायदा काय होतो?
1. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.
3. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं शक्य होणार.
4. अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते.
5. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत मिळणे शक्य होणार आहे.
सध्या देशात तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि ओडिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला. सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगु, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.
अभिजात दर्जा मिळवण्याचा अट्टाहास
मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपासूनचा इतिहास असल्याचा सांगितले जातं. आणि असे असले तरीही अद्याप मराठीला दर्जा मिळाला नव्हता. आणि त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कोट्यावधी मराठी बांधवांकडून, साहित्य रसिकांकडून, राजकीय नेत्यांकडून सारखी सारखी केली जात होती. आणि अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय 3 ऑक्टोबर 2024 ला कॅबिनेटच्या बैठकीत घेतला. खरंतर अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला.
‘महारठ्ठी’, ‘महरठ्ठी’, ‘मराठ्ठी’ आणि ‘मराठी’ असे मराठीचा उच्चार बदलत गेला असे या अहवालात सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरू होती. केंद्र सरकारच्या हातामध्ये हि बाब असते आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय याबाबत निर्णय घेते. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
मराठी भाषा ही ‘महाराष्ट्र’ हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षे जुन असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं. आणि त्यानंतर आता मराठी बरोबरच पाली, प्राक्रित, असामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
मराठी भाषेचा विकास ग्रंथ साहित्य संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निकष तरी नक्की काय असतात?
1. भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2. भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3. भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे लागते, ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4. भाषेचं स्वरूप इतर भाषेपासून वेगळे असावे.
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची स्थानाची छाननी होते.
त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते आणि मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. मराठी भाषेने हे आता सगळे निकष पूर्ण केले आहेत. आता विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. हा निर्णय राज्यातील 12000 ग्रंथालयांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयानंतर सर्व ग्रंथालयांचे सशक्तिकरण होणार आहे. खरंतर आपली मराठी खोलवर रुतली आहे. भारतातल्या 22 मुख्य भाषांमधली मराठी एक आहे.
आपण बोलतो, लिहितो त्याहूनही वेगवेगळ्या रूपात मराठी आढळते. भागाभागानुसार मराठीचा हेल बदलतो. मग पश्चिम महाराष्ट्रात वेगळी, विदर्भात वेगळी आणि मुंबईत बऱ्यापैकी वेगळी तर पुणे इथे काय उणे.
म्हणी, वाक्यप्रचार एकाहून एक वरचढ. कोणाचं कौतुक करण्यापासून टोमणे मारण्यापर्यंत एके एक परिस्थिती एका वाक्यात स्पष्ट करता येते. अलंकारातून प्रशांत वर्णन करता येतं. काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार अशा सौंदर्याने नटलेली आपली मराठी आहे. आणि आता ती फक्त मराठी नाही तर ‘ अभिजात दर्जा मिळालेली’ मराठी आहे.
आणि हा केवळ अभिमानाचा मुद्दा नाही आहे तर मराठीच्या अभिमानासाठी हा दर्जा खरंच महत्त्वाचा आहे.
धन्यवाद! दिलेल्या माहितीबद्दल💫
Your Most Welcome! तुम्हाला अश्याच intresting गोष्टींबद्दल माहिती हवी असल्यास मेल किंवा कमेन्टद्वारे नक्की कळवा. Thank यू!