CSE (Computer Science Engineering) मधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि ग्रॅज्युएट्स (पदवीधर) मायक्रोसॉफ्टमध्ये टेक्नॉलॉजी कन्सल्टंट समर इंटर्नशिप २०२५ (Microsoft Summer internship 2025) साठी अर्ज करू शकतात. तपशील तपासा आणि आत्ताच अर्ज करा!
मायक्रोसॉफ्टकडून इंटर्नशिप पोस्ट केल्याची दिनांक – 30/10/2024
Table of Contents
Toggleमायक्रोसॉफ्ट बद्दल थोडक्यात (About Microsoft)
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनची उपकंपनी (subsidiary) असलेल्या मायक्रोसॉफ्ट इंडिया (R&D) प्रायव्हेट लिमिटेडने 1998 मध्ये हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (MSIDC) ची स्थापना केली. गेल्या काही वर्षांमध्ये, ते मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या सर्वात मोठ्या R&D सेंटर पैकी एक बनले आहे.
नोकरीचे वर्णन (Job Description)
टेक्नॉलॉजी कन्सल्टंट इंटर्न, प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये रिस्क व त्याचे अवलंबत्व (dependencies) ओळखतात आणि प्रॉब्लेम चा प्रभाव कमी करण्यासाठी समस्यांचे निराकरण (resolve) करतात. ग्राहकांच्या व्यावसायिक गरजांनुसार तांत्रिक उपाय सुचवतात आणि लागू करतात. ग्राहक, पार्टनर आणि भागधारकांशी (stakeholders सोबत) चांगले संबंध निर्माण करतात. ग्राहकांचे समाधान कशामध्ये आहे हे समजून घेतात व त्याप्रमाणे काम करतात.
मायक्रोसॉफ्टमध्ये, इंटर्न मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील टीमच्या मदतीने वास्तविक-जागतिक (Real world) प्रोजेक्टवर काम करतात आणि बिझनेस मधील अनुभव घेत अशा मोठ्या कंपनीमध्ये शिकण्याचा आनंद घेतात.
या प्रोग्राम मध्ये तुम्हाला कम्युनिटी (टेक्नॉलॉजिकल ग्रुप) तयार करण्यासाठी, तुमची आवड एक्सप्लोर करण्यासाठी आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम केले जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करताना तुमचे उपाय आणि कल्पना जिवंत करून वास्तविक जगात त्याचा वापर कसा केला जातो हे उत्तमपणे समजण्यास मदत होईल.
मायक्रोसॉफ्टचे ध्येय जगातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कंपनीला स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम करणे आहे. “कर्मचाऱ्यांमध्ये, आम्ही वाढीची मानसिकता विकसित करतो, इतरांना सशक्त करण्यासाठी नवनवीन शोध घेतो आणि आमची सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहयोग करतो” असे कंपनीचे विचार आहेत. प्रत्येक दिवशी, MSC त्यांच्या आदर, सचोटी आणि उत्तरदायित्व मूल्यांवर समावेश करण्याची संस्कृती निर्माण करते जिथे प्रत्येकजण कामावर आणि त्याहूनही पुढे प्रगती करू शकेल.
जबाबदाऱ्या (Responsibilities)
1. पूर्व-विक्री (Pre-sales) प्रक्रियेत तांत्रिक कौशल्यांचा वापर करणे.
2. तांत्रिक कौशल्यांचा वापर करून ग्राहकांच्या गरजा ओळखून त्याच प्रकारच्या ऑफर ठेवण्यास मदत करणे .
3. ग्राहकांच्या गरजा योग्य मार्गाने समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
4. बौद्धिक संपदा (IP Address) चे ज्ञान घेऊन शिकणे आणि त्याचा वापर प्रोजेक्टमध्ये करणे.
5. क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीमध्ये वाढ करता येईल अशा संधी ओळखणे.
6. ग्राहकांसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी तयार केलेल्या टेक्नॉलॉजीवर देखरेख ठेवणे
7. बौद्धिक संपदा (IP Address) आणि ग्राहकांच्या गरजा यांमधील अंतर कमी करणे.
आवश्यक पात्रता (Required Qualifications)
सध्या कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी (डिग्री) घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
अर्ज कसा करायचा? (How to Apply)
इच्छुक उमेदवार खालील बटनावर क्लिक करून थेट अर्ज करू शकतात.