फूड-ट्रक चालू करणे इतकं सोप्प! in Marathi

फूड ट्रकचा इतिहास खूप जुना आहे. पूर्वीच्या काळात रस्त्यावर गाडीवरून कामगार आणि प्रवाशांना ताजं अन्न विकलं जायचं. १८०० च्या सुमारास अमेरिकेत “चकवॅगन” नावाच्या गाड्या काऊबॉय लोकांना जेवण पुरवत असत. हळूहळू हे ट्रक ऑफिस, शाळा आणि शहरातील कार्यक्रमाजवळ थांबून अन्न विकू लागले. आज फूड ट्रक ही एक ट्रेंडिंग गोष्ट झाली आहे – यात स्थानिक पदार्थांपासून जागतिक स्वादपर्यंत सर्व काही मिळतं. फूड-ट्रक म्हणजे कमी खर्चात चालवता येणारे आणि चविष्ट अन्न देणारे हे एक चालते-फिरते छोटे रेस्टॉरंटच आहे.

तर हे चालते-फिरते छोटे रेस्टॉरंट आपल्या महाराष्ट्रात आपण कसे उभारू शकतो हे पुढे जाणून घ्या

फूड-ट्रक चालू करणे इतकं सोप्प! in Marathi

1. व्यवसायाचा आराखडा तयार करा-

  • तुम्ही काय पदार्थ विकणार? (चायनीज, पाव भाजी, बर्गर, ज्यूस, वगैरे)
  • किंमती काय असणार?
  • किती गुंतवणूक करणार? (गाडी, साहित्य, परवाने, कामगार)
  • दिवसाला किती विक्री होईल याचा अंदाज?
  • ट्रक कुठे उभा करणार? (कॉलेज जवळ, ऑफिस जवळ, बाजार, समुद्रकिनारा)

    तुमचे उद्देश स्पष्ट असले पाहिजे

2. फूड ट्रक खरेदी करा किंवा तयार करून घ्या-
 
  • नवीन किंवा सेकंडहँड टेम्पो घेऊ शकता. (टाटा ACE, बोलेरो पिकअप, ट्रॅव्हलर सारखी गाडी घ्या)
  • त्यात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसची सुरक्षित व्यवस्था, चिमणी (एक्झॉस्ट), पाण्याची टाकी, लाईट, इन्व्हर्टर वगैरे लावा.
  • लाईटसाठी जनरेटर किंवा बॅटरी लावा
  • सुरक्षा साठी अग्निशामक यंत्र बसवा
  • ट्रकवर आकर्षक पेंटिंग व मेन्यू लिहा.

    सुरक्षा आणि आकर्षण दोन्ही महत्त्वाचे
3. आवश्यक परवाने घ्या-
  • मुख्य परवाने: 
    हे परवाने ऑनलाइन किंवा एजंटच्या मदतीने मिळवता येतात
परवाना कोण देते? का लागते?
FSSAI परवाना
FSSAI ऑफिस
खाद्य पदार्थ/अन्न विक्रीसाठी आवश्यक
गुमास्ता परवाना (Shop Act)
स्थानिक महानगरपालिकेकडून
व्यवसाय नोंदणीसाठी
व्हेईकल फिटनेस सर्टिफिकेट
RTO
व्यावसायिक वापरासाठी गाडी फिट आहे की नाही ते तपासणे
कमर्शियल व्हेईकल रजिस्ट्रेशन
RTO
गाडी व्यवसायासाठी नोंदवावी लागते
फायर सेफ्टी NOC
फायर डिपार्टमेंट
गॅसचा वापर असल्याने गरजेचे
महानगरपालिका/नगर परिषद परवानगी
स्थानिक नगरपालिका
उघड/public ठिकाणी फूड ट्रक उभारण्यासाठी
GST नोंदणी (₹20 लाख पेक्षा जास्त उलाढाल असेल तर)
GST विभाग
कर भरावा लागतो
पोलिस NOC (ऐच्छिक पण फायदेशीर)
स्थानिक पोलीस स्टेशन
सुरक्षेसाठी शिफारस केली जाते
फूड-ट्रक चालू करणे इतकं सोप्प! in Marathi

 4. जागा निवडा-

  • कॉलेज, गार्डन, आयटी पार्क, ऑफिस, स्टेशनजवळ, जत्रा, मॉल परिसर अशी गर्दीची जागा निवडा.
  • स्थानिक पालिकेची परवानगी असलेली जागा निवडणे गरजेचे आहे
  • कोणत्याही “नो पार्किंग” भागात उभी करू नका – दंड किंवा गाडी जप्त होऊ शकते


    जर दररोज जागा बदलणार असाल तर पालिकेची परवानगी घ्या

 5. कर्मचारी आणि सामान व्यवस्थापन-

  • १-२ स्वयंपाक करणारे कामगार ठेवा.
  • रोज लागणारे साहित्य – भाजीपाला, मसाले, बन्स वगैरे खरेदी करा.
  • गॅस स्टोव्ह, सिलिंडर, चिमणी / एक्झॉस्ट, स्टील शेल्फ, फ्रिज, पाण्याचा टाकी आणि हँडवॉश, डिजिटल पेमेंटसाठी QR कोड किंवा POS मशीन


    चव आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्या.

फूड-ट्रक चालू करणे इतकं सोप्प! in Marathi

 6. मार्केटिंग करा (लोकांपर्यंत पोहोचा)-

  • गाडी रंगीत, आकर्षक बनवा
  • सोशल मीडिया (Instagram, Facebook) पेज तयार करा
  • Zomato, Swiggy वर नोंदणी करा (ऐच्छिक)
  • ऑफर आणि कूपन द्या
  • मेनू बोर्ड आणि लाईट्स वापरा
  • बॅनर, संगीत आणि लोगो वापरा


    मोठ्या स्टडीनुसार हाच फूड ट्रकसाठी सर्वोत्तम प्रचार आहे.

 7. व्यवसाय सुरू करा आणि दररोजचा हिशोब ठेवा-

  • विक्री आणि खर्च याचा रेकॉर्ड ठेवा.
  • ग्राहकांचे फीडबॅक घ्या. 
  • स्वच्छता आणि नियम पाळा.
  • अधिकारी आल्यास परवाने दाखवा.
  • रोजचा हिशोब लिहून ठेवा.
फूड-ट्रक चालू करणे इतकं सोप्प! in Marathi

 8. अंदाजे खर्च (रु. मध्ये)-

बाब खर्च (रु.)
गाडी + सुधारणा
₹3 ते ₹5 लाख
स्वयंपाक साहित्य
₹1.5 ते ₹2 लाख
परवाने / कागदपत्रे
₹30,000 ते ₹60,000
कामगार पगार
₹10,000 – ₹15,000 प्रतिमाह
ब्रँडिंग व जाहिरात
₹20,000 – ₹50,000

महत्त्वाच्या सूचना:

  • अधिकारी आल्यास परवाने दाखवा.
  • BMC किंवा स्थानिक नगरपालिकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे
  • अनधिकृत ठिकाणी उभी केलेली गाडी दंडनीय आहे
  • स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा
  • पर्यावरण पूरक डिस्पोजेबल वस्तू वापरा.
  • कर्मचारी ग्लोव्ह्ज आणि कॅप वापरत आहेत का, याकडे लक्ष ठेवा.
  • दररोज ट्रकची साफसफाई करा.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now