Table of Contents
Toggleफायनान्स म्हणजे काय?
Best career options in finance after graduation:
फायनान्स हा शब्द ऐकताच आपल्याला पैशाचीच आठवण होते. खरं तर, फायनान्स म्हणजे केवळ पैसे नाही, तर पैशाचे व्यवस्थापन आणि त्याचा प्रभावी वापर कसा करायचा याचा अभ्यास आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर:
- पैशाचे नियोजन: आपल्याकडे असलेले पैसे आपण कसे खर्च करतो, कसे वाचवतो आणि कसे गुंतवतो, याचा विचार करणे म्हणजे फायनान्स.
- पैशाची वाढ: आपले पैसे वाढवण्यासाठी कोणत्या योजना आखायच्या, कुठे गुंतवायचे, याचा विचार करणेही फायनान्सचाच भाग आहे.
- पैशाचा योग्य वापर: आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाचा योग्य वापर कसा करायचा, याचे नियोजन करणे.
रोजच्या जीवनातील उदाहरणे:
- घर खरेदी: घर खरेदी हा एक मोठा आर्थिक निर्णय असतो. आपल्याकडे किती पैसे आहेत, किती कर्ज घ्यायचे, कोणती योजना निवडायची, या सर्व गोष्टींचा विचार करणे म्हणजे फायनान्स.
- शिक्षण: उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे, शिष्यवृत्ती शोधणे, या सर्व गोष्टींचा विचार करणे म्हणजे फायनान्स.
- कार खरेदी: नवीन कार खरेदी करायची की जुनी, किती डाउन पेमेंट द्यायचे, कोणते वाहन कर्ज घ्यायचे, या सर्व गोष्टींचा विचार करणे म्हणजे फायनान्स.
- गुंतवणूक: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे, या सर्व गोष्टींचा विचार करणे म्हणजे फायनान्स.
- बजेट तयार करणे: आपल्या मासिक खर्चासाठी बजेट तयार करणे आणि त्यानुसार खर्च करणे म्हणजे फायनान्स.
फायनान्स शिकणे का महत्त्वाचे आहे?
- आर्थिक स्वातंत्र्य: फायनान्स शिकून आपण आपले पैसे व्यवस्थितपणे हाताळू शकतो आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो.
- भविष्याची योजना: फायनान्स शिकून आपण आपल्या भविष्याची योजना आखू शकतो.
- गुंतवणूक: फायनान्स शिकून आपण आपले पैसे गुंतवू शकतो आणि त्यातून चांगला परतावा मिळवू शकतो.
- कर्ज व्यवस्थापन: फायनान्स शिकून आपण कर्ज व्यवस्थापन कसे करायचे हे शिकू शकतो.
आजचा काळ:
फायनान्स आजच्या काळात एक अत्यंत गतिशील क्षेत्र आहे. वित्तीय तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेन यांच्यामुळे फायनान्सचे स्वरूप बदलत आहे. डिजिटल पेमेंट्स, क्रेडिट स्कोरिंग, रोबो-एड्वायझर्स यांसारख्या नवीन सेवांचा उदय होत आहे.अशा प्रकारे, फायनान्सचा काळानुसार विकास झाला आहे. त्याचे स्वरूप आणि कार्यपद्धतीत बदल होत गेले आहेत. आजच्या काळात फायनान्स अधिक जटिल आणि वैविध्यपूर्ण झाले आहे.
फायनान्स क्षेत्रातील डिग्री असो वा नसो हे करिअर पर्याय तुमच्यासाठी
1. वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) तज्ञ | Financial Technology (FinTech) Expert:
- अत्यावश्यक स्किल्स: प्रोग्रामिंग, डेटा ॲनालिसिस, आर्थिक ज्ञान
- हे क्षेत्र इतके लोकप्रिय का होत चालले आहे? : भारताची वाढती डिजिटल अर्थव्यवस्था आणि फिनटेक स्टार्टअप्स हे नाविन्यपूर्ण आर्थिक उपाय विकसित करू शकणाऱ्या आणि ते अंमलात आणू शकणाऱ्या व्यावसायिकांची मागणी वाढवत आहेत.
- उदाहरणार्थ -: Paytm, PhonePe, BharatPe, CRED, PolicyBazaar.. इत्यादी
या क्षेत्रात कौशल्य कसे मिळवायचे:
- ऑनलाइन अभ्यासक्रम (Online Courses): GReat Learning, edX आणि Udemy सारखे प्लॅटफॉर्म फिनटेक आणि प्रोग्रामिंगवर उत्तम कोर्सेस पुरवतात.
- बूटकॅम्प्स (Bootcamps): विशेष फिनटेक बूटकॅम्प्स अनुकूल ट्रेनिंग आणि व्यावहारिक अनुभव देऊ शकतात.
स्व-शिक्षण(Self Learning): ऑनलाइन साधने, ट्यूटोरियल आणि वैयक्तिक प्रकल्प तुम्हाला फायनान्स मधील कौशल्य विकसित करण्यात मदत करू शकतात.
महाविद्यालयांद्वारे दिले जाणारे अभ्यासक्रम:
कोर्स | कॉलेज | फी |
फिनटेक मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (Post Graduate Diploma in Fintech) | BITS Pilani | 55,000 रुपये |
फिनटेक आणि फायनान्शिअल ब्लॉकचेनमध्ये ऍडव्हान्स प्रोग्रामिंग (Advanced programming in FinTech and Financial Blockchain) | IIM Calcutta | 3,75,000 रुपये |
फिनटेक आणि फायनान्शियल ब्लॉकचेन मध्ये प्रमाणपत्र कार्यक्रम (Certificate Program in Fintech and Financial Blockchain) | IIM Indore | 2,00,000 रुपये |
बीएससी, बीबीए, बॅचलर इन फायनान्शिअल इंजिनीअरिंग वित्तीय अभियांत्रिकीमध्ये एमएससी, एमबीए (BSc, BBA, Bachelor in Financial Engineering MSc, MBA in Financial Engineering) | 1. Indian Institute of Technology, Kharagpur 2. QuantInsti Quantitative Learning Pvt Ltd, Mumbai 3. Indian Institute of Quantitative Finance, Mumbai 4. GD Goenka University, Gurugram | 1,00,000 ते 8,00,000 रुपये (तुम्ही कोणत्या कोर्ससाठी व हयापैकी कोणत्या कॉलेजकरिता अप्लाय करत आहात त्यानुसार शुल्क बदलेल) |
नोकरी प्रदान करण्याऱ्या टॉप कंपन्या:
- फिनटेक स्टार्टउप: Paytm, Razorpay, PolicyBazaar
- बँका आणि वित्तीय संस्था: HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, JP Morgan, ICICI, Goldman Sachs, HSBC
प्रारंभिक पगार/पॅकेज:
2. डेटा ॲनालिस्ट (Data Analyst) :
- अत्यावश्यक स्किल्स: डेटा विश्लेषण (Data Analysis), आकडेवारी (Statistics), प्रोग्रामिंग
- हे क्षेत्र इतके लोकप्रिय का होत चालले आहे?: फायनान्समध्ये डेटाच्या वाढत्या वापरासाठी अशा व्यावसायिकांची आवश्यकता आहे जे ट्रेंड ओळखण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मोठ्या डेटासेटचे विश्लेषण करू शकतात.
- उदाहरणार्थ -: स्टॉक मार्केट अंदाज (Stock Market Prediction), Fraud Detection (फसवणूक शोध), पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन (Portfolio Optimization), Customer Segementation (ग्राहक विभाजन)
या क्षेत्रात कौशल्य कसे मिळवायचे:
- ऑनलाइन कोर्सेस: Coursera, edX आणि Udemy सारखे प्लॅटफॉर्म डेटा विश्लेषण आणि डेटा सायन्सचे कोर्सेस पुरवतात.
- प्रमाणपत्रे (Certificates): प्रमाणित डेटा विश्लेषक (CDA -Certified Data Analyst) किंवा प्रमाणित विश्लेषण व्यावसायिक (CAP -Certified Analytics Professional) सारखी सर्टिफिकेट समोरच्याला तुमच्याबद्दल खूप काही सांगू शकतात.
या क्षेत्रात कौशल्य कसे मिळवायचे:
नोकरी प्रदान करण्याऱ्या टॉप कंपन्या:
- बँका आणि वित्तीय संस्था: HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक
- कन्सल्टन्सी फर्म (कंपनी): McKinsey, Bain, BCG
- फिनटेक स्टार्टअप्स: Paytm, Razorpay, PolicyBazaar
प्रारंभिक पगार/पॅकेज:
3.जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ (Risk Management Specialist):
- अत्यावश्यक स्किल्स: जोखीम मूल्यांकन (Risk assessment), आर्थिक मॉडेलिंग (financial modeling), परिमाणवाचक विश्लेषण (quantitative analysis)
- हे क्षेत्र इतके लोकप्रिय का होत चालले आहे?: आजच्या काळातील आर्थिक बाजारपेठ अधिक किचकट आणि अस्थिर होत असल्याने, जोखीम ओळखू शकतील आणि त्यांचे व्यवस्थापन प्रभावीपणे करू शकतील अशा व्यावसायिकांची गरज वाढत आहे.
- उदाहरणार्थ – HDFC बँक, SBI बँक, Tata Capital, Reliance Idustries
या क्षेत्रात कौशल्य कसे मिळवायचे:
- ऑनलाइन कोर्सेस: Coursera आणि edX सारखे प्लॅटफॉर्म जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक मॉडेलिंगचे कोर्सेस पुरवतात.
- प्रमाणपत्रे (Certificates): FRM (फायनान्शियल रिस्क मॅनेजर) किंवा CFA (चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट) सारखी सर्टिफिकेट्स फायदेशीर ठरू शकतात.
नोकरी प्रदान करण्याऱ्या टॉप कंपन्या:
- बँका आणि वित्तीय संस्था: HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक
- विमा कंपन्या: HDFC Ergo, Bajaj Allianz
- कन्सल्टन्सी फर्म: McKinsey, Bain, BCG Initial
प्रारंभिक पगार/पॅकेज:
4. गुंतवणूक विश्लेषक (Investment Analyst):
- अत्यावश्यक स्किल्स: आर्थिक विश्लेषण (Financial analysis), बाजार संशोधन (market research), पोर्टफोलिओ व्यवस्थापन (portfolio management)
- हे क्षेत्र इतके लोकप्रिय का होत चालले आहे? : भारताचा वाढता मध्यमवर्ग आणि फायनान्शिअल बाजारपेठेतील वाढती गुंतवणूक यामुळे उत्तम सल्ला देऊ शकतील अशा गुंतवणूक विश्लेषकांची मागणी वाढली आहे.
- उदाहरणार्थ -: राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, निमिष शाह, रामदेव अग्रवाल
या क्षेत्रात कौशल्य कसे मिळवायचे:
- ऑनलाइन अभ्यासक्रम: Coursera, edX आणि Udemy सारखे प्लॅटफॉर्म आर्थिक विश्लेषण आणि गुंतवणूक व्यवस्थापनावर कोर्सेस पुरवतात.
- प्रमाणपत्रे: CFA (चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट) हे गुंतवणूक व्यावसायिकांसाठी एक उच्च मान्यताप्राप्त सर्टिफिकेट आहे.
- इंटर्नशिप: गुंतवणूक संस्था किंवा बँकांमध्ये व्यावहारिक अनुभव मिळवणे मौल्यवान ठरू शकते.
नोकरी प्रदान करण्याऱ्या टॉप कंपन्या:
- गुंतवणूक बँका: Goldman Sachs, Morgan Stanley, JP Morgan
- म्युच्युअल फंड हाऊसेस: HDFC म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड
- वेल्थ मॅनेजमेंट फर्म्स: कोटक वेल्थ मॅनेजमेंट, एडलवाइज वेल्थ मॅनेजमेंट
प्रारंभिक पगार/पॅकेज:
5. कॉर्पोरेट वित्त विशेषज्ञ (Corporate Finance Specialist):
- अत्यावश्यक स्किल्स: आर्थिक विश्लेषण, विलीनीकरण आणि अधिग्रहण, मूल्यांकन
- हे क्षेत्र इतके लोकप्रिय का होत चालले आहे?: भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेटमधील (विविध प्रायव्हेट कंपनी मधील) वाढत्या व्यवसायिक ऍक्टिव्हिटीजमुळे कंपन्यांना आर्थिक सल्ला देऊ शकतील अशा व्यावसायिकांची मागणी वाढत आहे.
- उदाहरणार्थ- रिलायन्स इंडस्ट्री, टाटा स्टील, अदानी ग्रुप, फ्लिपकार्ट, HDFC बँक
या क्षेत्रात कौशल्य कसे मिळवायचे:
- ऑनलाइन कोर्सेस: Coursera आणि edX सारखे प्लॅटफॉर्म कॉर्पोरेट फायनान्स आणि फायनान्शियल मॉडेलिंगचे कोर्स ऑफर करतात.
- प्रमाणपत्रे: CFA (चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट) हे कॉर्पोरेट फायनान्स व्यावसायिकांसाठी एक उच्च मान्यताप्राप्त सर्टिफिकेट आहे.
- इंटर्नशिप: कॉर्पोरेट फायनान्स विभाग किंवा गुंतवणूक बँकांमध्ये व्यावहारिक अनुभव मिळवणे मौल्यवान असू शकते.
नोकरी प्रदान करण्याऱ्या टॉप कंपन्या:
- गुंतवणूक बँका: Goldman Sachs, Morgan Stanley, JP Morgan
- कॉर्पोरेट वित्त विभाग: विविध उद्योगांमधील मोठ्या कॉर्पोरेशन्स
- कन्सल्टन्सी फर्म: McKinsey, Bain, BCG
प्रारंभिक पगार/पॅकेज: