Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी

Supply chain management हा कोणत्याही कंपनी साठी महत्वाचा घटक असतो. Apple आपल्या व्यवसायातील मोठा भाग म्हणजे ‘उत्पादनांची पुरवठा साखळी’ (Products Supply Chain) चीनमधून भारतात हलवत आहे. याचा अर्थ येत्या काळात भारतामध्ये आत्तापेक्षा जास्त आयफोन आणि ॲपलची  इतर उत्पादने तयार होतील. हे कारखाने भारतात आल्यामुळे Apple ला ते चालवण्यासाठी अधिक कामगारांची गरज भासेल. त्यामुळे भविष्यात भारतातील तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात उपलब्ध नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल. 

ही सुवर्णसंधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही पुढील मार्गदर्शन नक्कीच वाचा ज्यामुळे तुम्ही अगदी सोप्या आणि सरळ मार्गाने अशा मोठ्या कंपन्यांमध्ये Supply chain Mangement Team चा भाग होऊन स्वतःची प्रगती करू शकता.

बातमी

 

Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी
Credit:Inc42
  • कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे मुख्यालय असलेले ॲपल आपला उत्पादन केंद्र (Products hub) चीनपासून दूर हलवण्याचा विचार करत आहे. आणि हा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, ते भारतीय कंपन्यांना त्यांचे प्रॉडक्ट्स बनवण्याची मोठी जबाबदारी देत आहेत. सध्याच्या काळात Apple च्या प्रॉडक्ट्सचे फक्त एकत्रीकरण (Assembly) भारतामध्ये होते. तर Apple च्या या धोरणामुळे भारत ॲपलच्या पुरवठा साखळीचा (Supply Chain चा) अधिक महत्त्वाचा भाग बनू शकेल.
  • Apple भारतात आपले उत्पादन वाढवत आहे. सध्या, त्यांच्या नवीनतम iPhonesपैकी 14%, किंवा अंदाजे प्रत्येक सात iPhones पैकी एक, भारतात असेंबल केले जात आहेत.
  • Apple, भारतातील पुरवठादारांसह, कारखाना कामगारांसाठी घरे बांधत आहेत. दुसऱ्या शब्दांत, Apple फक्त नोकऱ्याच देत नाही, तर कामगारांना राहण्यासाठी जागाही देत आहे.

                  इकॉनॉमिक टाइम्सच्या, रिपोर्टनुसार भारतात ऍपल उत्पादनांशी संबंधित नोकऱ्यांमध्ये जोमाने वाढ होण्याचा अंदाज आहे. ज्या कंपन्या iphone Body Parts पुरवतात व iPhones आणि इतर Apple उपकरणे (Equipments) एकत्र करतात ते पुढील तीन वर्षांत सुमारे 5,00,000 नवीन कर्मचारी थेट नियुक्त करू शकतात. हे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या सध्याच्या संख्येपेक्षा तिप्पट वाढ दर्शवते.

एका बातमीनुसार सर्वात बेस्ट आयफोनचे टोटल 14% प्रॉडक्ट्स भारतामध्ये असेंबल केले गेले आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक सात iPhone पैकी साधारणपणे एक प्रॉडक्ट भारतीय वर्कशॉपमधून जातो.

Apple च्या भारतातील व्यवसायाने FY’23 मध्ये 49.3लाख करोंडचा रेवेन्यू (व्यवसायामधून मिळणारे पैसे) नोंदवला आहे. मागील फायनान्शिअल इयर च्या तुलनेत 33.3K Cr वरून यावर्षी (FY’24 मध्ये) 48% ची वाढ झाली आहे .

Supply Chain म्हणजे काय?

आजच्या स्पर्धात्मक बिजनेस युगामध्ये, Supply Chain Management  हा सर्वात मोठा भाग झाला आहे. सोप्या भाषेत Supply Chain म्हणजे व्यवसायामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही जे काही बनवता आणि विकता त्याचा प्रवास सुरळीतपणे हाताळण्यासाठी बनवलेली प्रोसेस.

यामध्ये कच्च्या मालाच्या सोर्सिंग (विकत घेण्यापासून) मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्यूशन आणि शेवटी आपल्या ग्राहकांकडे प्रॉडक्ट पोहोचवण्यापर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे.

Supply Chain Management इतके महत्त्वाचे का आहे?

एखाद्या व्यवसायाचा कणा म्हणून पुरवठा साखळीचा तुम्ही विचार करू शकता. सर्वोत्तम आणि नीट प्लॅनिंग असलेली पुरवठा साखळी (Supply Chain) व्यवसायामधील खर्च कमी करते आणि ग्राहकांना त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी मिळतील याची खात्री करते. प्रभावी SCM चे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे येथे आहेत: 

कमी होणारा खर्च: व्यवसायातील सर्व ऑपरेशन्स (प्रक्रिया) सुरळीत केल्याने खर्चात लक्षणीय बचत होऊ शकते. इन्व्हेंटरी पातळी (Warehouse Inventory -साठवण), वाहतूक मार्ग आणि पुरवठादार संबंध (Supplier Relations)  यावर लक्ष देऊन चांगले बदल केल्यामुळे  व्यवसाय अधिक सुरळीत चालवण्यास आणि चांगला नफा मिळवण्यास मदत होते.

वाढते ग्राहक समाधान: आनंदी ग्राहक हे नेहमी एकनिष्ठ ग्राहक असतात. वेळेवर वितरण (Distribution) आणि सातत्यपूर्ण उत्पादनाची (Product ची) गुणवत्ता (Quality) जपून ठेवल्याने ग्राहकांना बांधून ठेवता येते. 

व्यवसायातील वाढलेली चपळता (जलदपणा): आजच्या सतत बदलणाऱ्या बाजारपेठेत, व्यवसायांना जुळवून घेण्याची गरज आहे. प्रभावी SCM तुम्हाला व्यवसायामधील अडथळे आणि  ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांना त्वरित प्रतिसाद देण्यास मदत करते. त्यामुळे व्यवसाय अधिक सुरळीत चालत राहतो.

SCM चे प्रमुख घटक कोणते आहेत?

प्रभावी SCM मध्ये  पुढील मूलभूत टप्पे आहेत:

  1. नियोजन (Planning): यामध्ये कस्टमरच्या मागणीचा अंदाज लावणे, इन्व्हेंटरी पातळी (Warehouse Inventory Level) व्यवस्थापित करणे आणि उत्पादन व वितरणासाठी रोडमॅप तयार करणे (Planning करणे)समाविष्ट आहे.
  2. सोर्सिंग (Sourcing): योग्य पुरवठादार (Suppliers) निवडणे जे तुम्हाला कमीत कमी किमतीत उच्च दर्जाचे साहित्य देऊ शकतात.
  3. उत्पादन (Production): कच्च्या मालाचे एका परिपूर्ण प्रॉडक्ट मध्ये रूपांतर करणे. यामध्ये अचूक प्रोडक्शनचे वेळापत्रक (Production Scheduling) आणि गुणवत्ता नियंत्रण उपायांचा (Quality Control Measures चा )समावेश आहे.
  4. वितरण (Distribution): फॅक्टरीमधून ग्राहकांपर्यंत तुमची उत्पादने (Products) पोहोचवणे. यामध्ये Warehouse Handling, वाहतूक (Transportation)आणि ऑर्डर पूर्ण (Order Completion) करणे/ऑर्डरची बिलिंग करणे समाविष्ट आहे.
  5. रिटर्न्स (Returns): व्यवसायातील  नफ्यासाठी (For Good Profit) प्रॉडक्ट बनवण्यात जितका खर्च केला आहे त्याच्या तुलनेत अधिक जास्त परतावा मिळणे आवश्यक असते.  त्यासाठी एक प्रणाली (SCM System) असल्यामुळे अडथळे कमी होतात आणि ग्राहकांना समाधान मिळते.
  6. डेटा ॲनालिसिस (Data Study): किती प्रॉडक्ट्स विकले गेले , किती सेल्स झाला आहे, कोणत्या प्रॉडक्ट्स ना पोहोचण्यास वेळ लागला आहे. अशा प्रकारचा  व्यवसायातील डेटा एकत्रित केल्याने व त्याच्या विश्लेषणामुळे (Analysis मुळे) व्यवसायामध्ये इम्प्रूमेंट (अधिक सुधार) होण्यास मदत होते.

फ्री SCM ऑनलाइन कोर्सेस

1) TCS iON – Free

Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी
Credit:TCS iON

तुम्ही पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी म्हणजेच Supply Chain Management साठी नवीन आहात का? तर काळजी करू नका, TCS iON चे प्रोक्योरमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स असे उपयुक्त अभ्यासक्रम तुम्हाला SCM बद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती देण्यास मदत करतील. त्याचबरोबर TCS तुम्हाला कोर्स पूर्ण  केल्यानंतर सर्टिफिकेट सुद्धा प्रदान करते.

कोर्सची वैशिष्टे :

TCS iON च्या फ्री कोर्स मधून तुम्हाला खालील गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील- 

1) स्ट्रॅटेजिक सोर्सिंग, व्हेंडर मॅनेजमेंट आणि रिटर्न्स (Profit and loss) मॅनेजमेंट यांसारख्या महत्त्वाच्या Supply Chain Concepts बद्दल अधिक जाणून घ्या. 

2) SCM मधील नवनवीन ट्रेंड्स आणि तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या, जसे की क्लाउड-बेस्ड सोल्युशन्स (डेटा स्टोरेज आणि त्याचा वापर) आणि डेटा  ॲनालिसिस. 

3) सध्याच्या इंडस्ट्रियल वर्ल्ड मध्ये ज्या प्रकारचे काम Supply Chain Management मध्ये होते, तशी प्रॅक्टिकल कौशल्ये या कोर्समधून तुम्ही एप्लीकेशन आणि साईट चा वापर करून आत्मसात करू शकता. 

पूर्णपणे निशुल्क (फ्री)
TCS iON वर उपलब्ध 

2) NPTEL – Free – Operations and Supply Chain Management, IIT Madras 

Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी
Credit:NPTEL

IIT मद्रास द्वारे NPTEL वर ऑफर केलेला ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट कोर्स तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतो.

कोर्सची वैशिष्टे :
  1. मूलभूत ज्ञान: या कोर्समध्ये व्यवसायामधील अंदाज (Business Forecasting), इन्व्हेंटरी व्यवस्थापन (Inventory Management), सुविधांचे स्थान (Facility Location)आणि रेखीय प्रोग्रामिंग (Linear Programming)यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. तुम्ही Supply Chain ऑपरेशन्समध्ये थेट सहभागी नसले तरीही हे मूलभूत ज्ञान विविध करिअरमध्ये उपयुक्त ठरू शकते.
  2. परिमाणात्मक कौशल्य विकास (Quantitative Skills Development): या कोर्समध्ये ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये येणाऱ्या निर्णय समस्या सोडवण्यासाठी (Decision Problems) या मॉडेलमध्ये अधिक माहिती दिली आहे. गणित आणि सांख्यिकीय ज्ञान (statistical knowledge)  यांसारखी कौशल्ये वापरणे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मौल्यवान ठरू शकते.
  3. सुधारित  कार्यक्षमता (Improvement in Capabilities): ऑपरेशन्स आणि Supply Chain कसे कार्य करतात हे समजून घेऊन, कोणत्याही कंपनीमध्ये अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही कामगिरी पार पाडू शकता. ऑपरेशन्सशी थेट संबंध नसला तरीही हे तुमच्या स्वतःच्या कामात किंवा व्यवसायात उपयुक्त ठरू शकते.
पूर्णपणे निशुल्क (फ्री)
तुम्ही एका नामांकित संस्थेकडून म्हणजेच IIT मद्रास कडून तुमच्या वेळेप्रमाणे शिकू शकता.
nptel.ac.in वर उपलब्ध

३. edX online course (edX ऑनलाइन कोर्स) -: सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये तुमची कारकीर्द वाढवा-मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी
Credit:Edx

काय शिकाल?

  1. डेटा-आधारित निर्णय घेणे: यामध्ये गणित (संभाव्यता, आकडेवारी) आणि ऑप्टिमायझेशन तंत्र वापरणे समाविष्ट आहे
  2. ट्रेड-ऑफ संतुलित करणे: मूलभूत सूत्रे वापरून, तुम्ही किती इन्व्हेंटरी हातात ठेवावी, मागणीचा अंदाज कसा घ्यावा आणि सर्वात किफायतशीर वाहतूक पद्धती निवडू शकता.
  3. पुरवठा साखळी तयार करणे: यामध्ये ग्राहकांपर्यंत उत्पादने मिळवण्यासाठी आवश्यक पुरवठादार, कारखाने, गोदामे आणि स्टोअरचे नेटवर्क शोधणे, तसेच या नेटवर्कमध्ये पैसा आणि माहिती कशी प्रवाहित होईल याचा समावेश आहे.
  4. संपूर्ण प्रणाली कशी कार्य करते हे समजून घेणे: पुरवठा साखळी जटिल आहेत, परंतु त्यांना एकमेकांशी जोडलेली प्रणाली म्हणून पाहिल्यास, भिन्न भाग एकमेकांवर कसा परिणाम करतात हे समजू शकता.
  5. कार्यक्षमतेसाठी तंत्रज्ञान वापरणे: यामध्ये मूलभूत स्प्रेडशीट्सपासून जटिल सॉफ्टवेअर सिस्टमपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे जे इन्व्हेंटरी ट्रॅक करू शकतात, वितरण ऑप्टिमाइझ करू शकतात आणि कार्ये स्वयंचलित करू शकतात.
कालावधी : १ वर्ष ६ महीने 
शुल्क : 1 लाख २७ हजार 
प्रॅक्टिस परीक्षा, सर्टिफिकेट परीक्षा 
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शिक्षक 

४ . Coursera online course (Coursera ऑनलाइन कोर्स):सप्लाय चेन मॅनेजमेंट स्पेशलायझेशन

Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी
Credit:Coursera

काय शिकाल?

  1. पुरवठा साखळी लॉजिस्टिक्स
  2. पुरवठा साखळी ऑपरेशन्स
  3. पुरवठा साखळी नियोजन
  4. पुरवठा साखळी सोर्सिंग
  5. पुरवठा साखळी व्यवस्थापन धोरण

कालावधी : १ महीना  
शुल्क : फ्री , परंतु सर्टिफिकेट हवे असल्यास फी भरावी लागेल. 
रटगर्स स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू जर्सीमधील शिक्षक 

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “Career in Supply Chain Management: Apple कंपनीचा सर्वात मोठा निर्णय, भारतीयांना पुन्हा रोजगारांची संधी”

  1. This is a very good articles. Very informative and helpful for someone who wants to switch to supply chain field.
    Thanks for this insightful article.

    Reply

Leave a Comment