सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस

तुम्ही जॉब साठी पात्र आहात तरीही रिजेक्ट होताय? कारण एका प्रश्नाचे उत्तर अचूक न दिल्यामुळे. तो प्रश्न म्हणजे “तुम्हाला डेटाबेस आणि सर्वर बद्दल काही माहित आहे का?”. तुम्ही हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल की नॉन टेक्निकल जॉब्सना सुद्धा असे कर्मचारी हवेत ज्यांना थोडेफार टेक्निकल गोष्टी माहित असतील. कारण आज व्यवसायात टेक्नॉलॉजी सर्वत्र आहे, त्यामुळे नॉन IT नोकऱ्यांनाही बेसिक टेक्निकल गोष्टींमध्ये मदत करू शकतील आणि दररोज बदलत असणाऱ्या जगाशी जुळवून घेऊ शकतील अशा लोकांची गरज आहे. 
           त्यामुळे खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. डेटाबेस(DBMS) आणि सर्वर म्हणजे काय? ते कुठे वापरले जाते? आणि त्याचे कोणकोणते बेसिक ऑनलाईन कोर्सेस आहेत जे तुम्हाला खूप कमी वेळात एक योग्य असा टेक्निकल यूजर बनवण्यास कसे मदत करतील हे पुढे वाचा.

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस

कुशल तंत्रज्ञान कामगारांची मागणी अलीकडच्या काळात केवळ माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातच नाही तर सर्व उद्योगांमध्ये वाढली आहे. EY आणि iMocha च्या अहवालात असे दिसून आले आहे की 81% कंपन्या ‘पॉवर यूजर किंवा डेव्हलपर’ तंत्रज्ञान कौशल्यांच्या कमतरतेचा सामना करत आहेत म्हणजेच, या कंपन्यामधील कर्मचाऱ्यांमध्ये टेक्निकल स्किल्स खूप कमी आहेत तर  फक्त 19% कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना टेक्निकल गोष्टी चांगल्या प्रकारे माहित आहेत.

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय?

  • सोप्या भाषेत सर्वर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी असा विचार करा की सर्वर हे एका मोठ्या फाइलिंग कॅबिनेट म्हणजेच फाइल्स ठेवणाऱ्या कपाटासारखे आहे.
  •  या कपाटामध्ये खूप सारे कप्पे आहेत ते कप्पे म्हणजेच एक प्रकारे डेटाबेसेस आणि या कप्प्यांमध्ये आपण फाईल्स नीटपणे ठेवू शकतो. 
  • त्या फाइल्स म्हणजेच डेटा साठवून ठेवणारे खूप सारे फोल्डर्स आणि शेवटी या कपाटातील फाईल्स मधील माहिती म्हणजेच टेक्निकल भाषेत फोल्डर्स मधील टेबल्स (ज्याचे स्ट्रक्चर अगदी Excel  मधील टेबल प्रमाणे असते ज्यामध्ये Rows अँड Columns असतात)

तर, थोडक्यात:

  1. सर्व्हर:  मोठे फाईल साठवणारे कपाट जे सर्वकाही संग्रहित करते.
  2. डेटाबेस: कपाटा मधील खूप सारे व्यवस्थित कप्पे 
  3. फोल्डर्स : त्याच कप्प्यामधील नीटपणे ठेवलेल्या फाइल्स
  4. टेबल्स : अशा व्यवस्थित फाईल मध्ये बांधून ठेवलेली माहिती
सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस
टेक्निकल भाषेत -:
  1. सर्व्हर हा एक संगणक प्रोग्राम किंवा उपकरण आहे जो दुसऱ्या संगणक प्रोग्रामला आणि त्याच्या युजर्सना (वापरकर्त्यांना) सेवा प्रदान करतो. 
  2. डेटाबेस हा व्यवस्थित माहितीचा किंवा डेटाचा एक एकत्रित केलेला संग्रह असतो, एका सर्वर मध्ये आपण वेगवेगळे डेटाबेस बनवून त्यामध्ये व्यवस्थित आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये नीट वर्गीकरण केलेली माहिती साठवून ठेवू शकतो. 
  3. अशाच डेटाबेस मध्ये वेगवेगळ्या विषयांनुसार आपण वेगवेगळे फोल्डर्स बनवून आवश्यक माहितीला नीटपणे साठवून ठेवू शकतो आणि या फोल्डर्समध्ये निरनिराळे टेबल्स बनवून ठेवू शकतो. 
  4. ज्यामध्ये कस्टमरची नावे, पत्ते, फोन नंबर तसेच प्रॉडक्टचे नाव, प्रॉडक्टची किंमत, झालेला सेल त्यासोबत मिळवलेले प्रॉफिट अशा गोष्टी तुम्ही साठवून ठेवू शकता.

Database Management System चे कार्य

  • तुम्ही गुगलवर एखादा प्रश्न विचारला की गुगल त्याचे खूप सारी उत्तरे देते हाच डेटाबेस सर्व मॅनेजमेंट मधील मोठा भाग आहे. डेटाबेस सर्वर मॅनेजमेंट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डेटाबेसमध्ये साठवलेल्या माहितीतून युजरला पुरवणे. 
  • जेव्हा आपण कोणतीही क्वेरी (Question) सर्च बार वर सर्च करतो त्यानंतर त्या प्रश्नांमधील शब्दांप्रमाणे (Keywords प्रमाणे) ही सिस्टीम डेटाबेस मध्ये जाऊन फोल्डर्स मधील टेबल्स मध्ये साठवलेल्या माहितीला समोर प्रदर्शित करते.
  • पण हा डेटा प्रत्यक्षात साठवण्याचे काम कोण करते?  तर असा डेटा साठवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी  आणखी एक सिस्टम उपलब्ध आहे ज्याला डेटा अपडेशन म्हणतात. या प्रोसेस मध्ये ज्या व्यक्तींना एखाद्या विषयाबद्दल चांगली माहिती असेल तर ते त्या डेटाबेस मध्ये  त्यांच्या ज्ञानानुसार वेगवेगळ्या प्रकारची माहिती साठवण्यास देऊ शकतात. अशा प्रकारची माहिती डायरेक्टली स्टोअर केली जात नाही तर त्याआधी एक अप्रुव्हल सिस्टम अशा माहितीची पडताळणी करते व त्यानंतरच त्याला डेटाबेस मध्ये साठवण्यास परवानगी देते. हा डेटाबेस मॅनेजमेंट मधील दुसरा महत्त्वाचा भाग आहे.

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (DBMS)

  1. DBMS (डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम) हे एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे जे वापरकर्त्यांना डेटाबेस तयार करण्यास, मॅनेज करण्यास आणि ऍक्सेस करण्यास (डेटा मिळवण्यास) मदत करते. 
  2. हे सामान्यतः युजर्स आणि डेटाबेस मधील दुवा आहे. जे युजर्सना डेटाबेस मधील माहिती बघण्यास, साठवण्यास आणि बदल करण्यास परवानगी देते.
  3. डेटाबेस मॅनेजमेंट मुळे डेटा नीटपणे व्यवस्थित ठेवणे, गोपनीय (Confidential) माहितीला सुरक्षित ठेवणे, डेटामध्ये आवश्यक बदल करून तो अपडेटेड ठेवणे व डेटा अगदी अचूकपणे युजर समोर मांडणे सोपे होते.
  • DBMS मध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत- 
  1. डेटाबेस तयार करणे: युजर्स DBMS वापरून स्ट्रक्चर (टेबल, कॉलम, डेटा टाईप) लक्षात घेऊन आणि बनवून डेटाबेस तयार करू शकतात. 
  2. डेटा मॅनिपुलेशन (डेटा मध्ये बदल करणे): वापरकर्ते DBMS इंटरफेस किंवा क्वेरी लँग्वेज (SQL- माहिती शोधण्यासाठी एक टेक्निकल कमांड देणारी भाषा) वापरून डेटा बनवू शकतात, अपडेट करू शकतात आणि काढू शकतात 
  3. डेटा मिळवणे: युजर्स त्यांच्या गरजा नुसार  क्वेरी (SQL Query) वापरून डेटाबेसमधून विशिष्ट माहिती मिळवून शकतात व त्याचा स्वतःच्या कामांसाठी वापर करू शकतात.
  • DBMS ची लोकप्रिय उदाहरणे: 
  1. MySQL, Oracle, Microsoft SQL Server आणि PostgreSQL यांसारखे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे DBMS चे उपयुक्त सॉफ्टवेअर्स आहेत. ज्यांचा वापर मोठ्या संस्थांमध्ये (Google, Netflix, Amazon)माहितीची देवाण-घेवाण आणि डेटा साठवण्यासाठी  केला जातो.

Microsoft SQL Server Application चे कार्य

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस

Microsoft SQL कसे कार्य करते हे खाली दिलेल्या स्टेप्स प्रमाणे तुम्ही थोडक्यात जाणून घेऊ शकता

1. लॉगिन करताना सर्वप्रथम सर्वर नेम टाका आणि त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड टाका

2. जसे तुम्ही मायक्रोसॉफ्ट SQL मध्ये लॉगिन कराल तसे तुमच्या स्क्रीनवरील डाव्या बाजूला   काही फोल्डर्स दिसतील. त्यामध्ये Databases फोल्डर्स वर डबल क्लिक करा.

3. Database फोल्डर च्या आत मध्ये गेल्यावर तुम्हाला डेटाबेसच्या चिन्हाचे अजून एक फोल्डर दिसेल त्यावर डबल क्लिक करून आत मध्ये जाऊन टेबल (Table )फोल्डरमध्ये जा.

4. जसे तुम्ही टेबल्स फोल्डर च्या आत जाल तसे तुम्हाला खालील प्रकारे टेबलच्या चिन्हाचे काही फाइल्स दिसतील. तेच डेटाबेस टेबल असतील.

5. डेटाबेस टेबलच्या फाईलवर राईट क्लिक करून ‘Select Top 1000 Rows’ हा ऑप्शन सिलेक्ट करा.

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस

6. Select Top 1000 Rows वरती क्लिक केल्यावर तुम्हाला खालील प्रकारची स्क्रीन दिसेल

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस

7. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे एस्क्युल Query रन करणे –

  • तुम्हाला दिसत असलेल्या स्क्रीनवरील  टेबलच्या वरील दिसणाऱ्या  रिकाम्या जागेस कोड एडिटर असे म्हणतात
  • त्या कोड एडिटर मध्ये तुम्ही SQL Query लँग्वेज चे कोड टाकून तुम्ही वरील हिरव्या कलरचे बटन (Execute Button) दाबून डेटा ला कमांड देऊ शकता.
  • या कमांड लँग्वेज द्वारे  डेटा फिल्टरिंग, डेटा सॉर्टिंग, डेटा एडिशन, डेटा डिलीशन करू शकता.
सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस

ऑनलाइन DBMS कौर्सेस Beginner & Advanced

  • वाढत्या मागणीसह डेटाबेस व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. डेटाबेस प्रशासक (DBAs Database Administrator) आणि डेटाबेस विश्लेषक (Database Analysist )सारखे व्यावसायिक/कर्मचारी सुरळीत ऑपरेशन करतात आणि डेटाबेसमधून व्हॅल्यूबल माहिती काढतात.
  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम शिकण्यासाठी पुढील काही फायदेशीर कोर्सेस आहेत 

१. नेस्को अकॅडमी (Nesco Academy -You Tube Channel) 

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस
Source- Youtube

युट्युब वर नेस्को अकॅडमी या चॅनेल चा Database Management Systems असा फ्री कोर्स आहे. जी 27  व्हिडिओज ची एक व्हिडिओ प्लेलिस्ट आहे. प्रत्येक व्हिडिओ हा 10 ते 15 मिनिटांचा आहे. त्यामुळे कमी वेळेत तुम्हाला सर्वोत्तम माहिती मिळेल.

हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम शिकण्यासाठी चा ऍडव्हान्स कोर्स आहे. तुम्हाला जर एखाद्या नोकरी साठी Apply करायचे असेल किंवा  डेटाबेस मॅनेजमेंट मध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा फ्रीलान्सिंग करायची असेल तर हा ऍडव्हान्स कोर्स तुमच्यासाठी खूप उपयोगाचा आहे.

ज्यामध्ये तुम्ही पुढील गोष्टी चांगल्या प्रकारे शिकू शकता 

1. DBMS ची वैशिष्ट्ये 

2. डेटाबेस युजर्स

3. डेटाबेस आर्किटेक्चर

4. DBMS चे फायदे आणि तोटे 

5. डेटाबेस लँग्वेजेस

२. गेट स्मॅशर्स (Gate Smashers -You Tube Channel) 

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस
Source- Youtube
  • युट्युब वर गेट स्मॅशर्स या चॅनल चा ‘DBMS (Database Management System)’ हा फ्री कोर्स उपलब्ध आहे. ही एकूण 131 व्हिडिओज ची मोठी फायदेशीर प्लेलिस्ट आहे. यामध्ये लेक्चररने अगदी White बोर्डवर प्रत्येक टर्म समजावून सांगून उदाहरणे दिलेले आहेत. ज्यामुळे हे व्हिडिओज अगदीच वास्तववादी (Realistic) लेक्चर्स वाटतात. 
  • हा कोर्स तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या Exams मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी मदत करेल. GATE Exam च्या तयारी मध्ये हा कोर्स खूप फायदेशीर ठरतो. DBMS मधील लहानात लहान बेसिक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा कोर्स महत्त्वाचा ठरेल. या कोर्स मधील व्हिडिओज पाहून तुम्ही डेटा मॅनेजमेंटचे एप्लीकेशन चांगल्या प्रकारे हाताळू शकता.  सोबतच तुम्ही मोठमोठ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता.
  • या कोर्समध्ये तुम्ही पुढील गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकता- 
  1. DBMS सिलॅबस फॉर गेट एक्झाम 
  2. DBMS इंट्रोडक्शन 
  3. फाईल सिस्टीम VS DBMS सिस्टीम 
  4. डेटाबेस रिलेशन्स 
  5. डेटाबेस इंटिग्रेशन

३. अपना कॉलेज (Apna College -You Tube Channel) 

सर्वर, डेटाबेस आणि टेबल्स म्हणजे काय? व DBMS चे उपयुक्त कोर्सेस
Source- Youtube

युट्युब वर अपना कॉलेज या चैनल चा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या टॉपिक वर एक तीन तासाचा  उपयुक्त आणि सहज समजण्यायोगा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ श्रद्धा खापरा यांनी निवेदित केला आहे ज्या मायक्रोसॉफ्टच्या जुन्या कर्मचारी होत्या. त्यामुळे  DBMS आणि SQL लँग्वेज याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे त्यासोबतच Experience सुद्धा घेतला आहे.

हा व्हिडिओ पाहून SQL बद्दल अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत माहिती घेऊ शकता. हा व्हिडिओ मुख्यतः 12th पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. तुमच्या भविष्यातील करिअरची सुरुवात या व्हिडिओतील माहितीच्या मदतीने नक्कीच होईल. त्यासोबतच तुम्ही आयटी इंजीनियरिंग मध्ये प्रवेश घेऊन स्वतःची प्रगती करून मोठमोठ्या कंपनीमध्ये उत्तम पगाराची नोकरी सुद्धा मिळू शकता.

या कोर्समध्ये तुम्ही पुढील गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकता- 

1. SQL ची पूर्णपणे माहिती 

2. SQL Query चे कमेंट्स कसे लिहावेत आणि एक्झिक्युट करावेत 

3. Instagram, Netflix, Amazon मोठ्या कंपनीमध्ये ही लँग्वेज कशी वापरतात 

4. त्यासोबतच या चॅनलने त्यांच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे स्वतःच्या कोर्सेसच्या लिंक दिल्या आहेत

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment