5 प्रकारे तुम्ही करू शकता MBA Programs मध्ये enroll| जाणून घ्या MBA Courses विषयी

Mba Programs जसे की: Full time MBA, Part time MBA, Distance MBA, Executive MBA, Integrated MBA आणि Online MBA हे लोकांच्या गरजेनुसार तयार केलेले असतात. जसे की एखादा स्टुडेंट ग्रॅजुएशन नंतर एमबीएचा विचार करेल.तर एखादा १२ वी नंतर लगेचच!

मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, एच आर, प्रोडक्शन, सप्लायचेन हे शब्द तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकले असतीलच. तर हे कोणत्याही बिजनेस मधील सर्वात महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत. आणि या सर्व डिपार्टमेंटच्या पद्धतशीर आणि अचूक कामामुळेच संपूर्ण बिझनेस अधिकाधिक उत्तम प्रगती करू शकतो. यांचा नीटपणे अभ्यास करून कोणताही बिजनेस कसा एक ब्रँड बनवावा हे सांगणारा बेस्ट आणि उपयुक्त कोर्स म्हणजेच MBA (Master of Business Administration).

सोप्या आणि प्रोफेशनल शब्दात MBA म्हणजे काय? एमबीएचा शोध कोणी लावला? आजच्या जगात तो का महत्त्वाचा आहे? बिजनेस मध्ये त्याचा कसा उपयोग केला जातो? एमबीएचे बेस्ट कोर्सेस कोणते आहेत?  त्यासोबतच या कोर्सेसची पात्रता,अशा एकूण एक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे नक्कीच मिळतील. त्यामुळे पुढच्या पाच मिनिटांमध्ये पुढील उपयुक्त माहिती वाचा आणि मोठमोठ्या कंपनीमध्ये उच्च स्तरावरची नोकरी मिळवा किंवा स्वतःचा स्टार्टअप उभारून तुमच्या बिजनेस ला एक ब्रँड बनवा.

MBA News

आजच्या दिवसांमध्ये काही बनावटी आणि फसवणारे ऑनलाईन प्रोग्राम चालू आहेत. जे तुम्हाला खरी डिग्री देण्याची खात्री देतात परंतु ते तसं करत नाहीत. यावर University Grants Commission (UGC) हे सरकारी  विभाग काम करत आहे. “10-day MBA” course” हा त्यांपैकी एक फसवणारा कोर्स आहे असे UGC ने सांगितले आहे. सोबतच केवळ वास्तविक कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी चांगल्या प्रकारच्या डिग्री तुम्हाला देऊ शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. आणि कोणताही ऑनलाईन प्रोग्राम मध्ये एनरोल किंवा लॉगिन करण्याच्या अगोदर त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती काढा आणि मगच त्या कोर्ससाठी अप्लाय करा असे UGC ने विद्यार्थ्यांना व ऑनलाईन कोर्स घेणाऱ्यांना मोठा सल्ला देत म्हटले आहे .

What is MBA? (MBA म्हणजे काय?)

Master of Business Administration (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) हा MBA चा फुल फॉर्म आहे.

सोप्या भाषेत MBA ही बिझनेस मधील मास्टर डिग्री असते. ही अशी डिग्री आहे जी तुम्हाला बिजनेस चालवण्याचे  A to Z शिकवते. कॉलेज नंतर तुम्ही ही उपयुक्त पदवी मिळवू शकता, जी तुम्हाला व्यवसाय चालवण्याचे इन्स आणि आउट्स (एकदम डिटेल मध्ये) शिकवते. अगदी ऑर्डर च्या चौकशी पासून ते शेवटी प्रॉडक्ट कस्टमर च्या हातात पोहोचेपर्यंत कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी बिझनेस ला अधिकाअधिक उत्तम करतात हे सर्व या डिग्री मध्ये समाविष्ट असते.

MBA ही एक अशी डिग्री आहे जी तुम्हाला तुमची व्यावसायिक कौशल्ये वाढविण्यात मदत करते व हा प्रोग्राम 2 वर्षाच्या कालावधीचा असतो. असे समजा की बिजनेस ही एक मोठी मशीन आहे आणि सेल्स, मार्केटिंग, एच आर, फायनान्स, प्रोडक्शन, सप्लाय चेन हे हे या मशीनचे महत्त्वाचे पार्ट्स आहेत जसे हे पार्ट मशीन चालवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच हे डिपार्टमेंट्स बिजनेस ला प्रगती च्या मार्गावर नेण्यास अथक प्रयत्न करतात.  हे सर्व डिपार्टमेंट नीटपणे योजना आखून आपण कसे चालवायचे हे एमबीए मध्ये चांगल्या प्रमाणात शिकवले जाते.

Invention of MBA (MBA चा इतिहास)

एमबीए प्रोग्रामच्या शोधाचे श्रेय एका व्यक्तीला नाही देऊ शकत, युनायटेड स्टेट्स च्या गरजेतून MBA प्रोग्राम उद्यास आला, MBA चा थोडक्यात इतिहास पुढे दिलेला आहे –

1. 1881 ला USA मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात पहिले बिजनेस स्कूल उभारण्यात आले. 

2. डार्टमाउथ कॉलेजच्या टक स्कूल ऑफ बिझनेसने 1900 मध्ये कॉमर्स फील्डमध्ये प्रथम मास्टर ऑफ सायन्स (Master Of Science) पदवी दिली गेली, जी एमबीएची सुरुवात होती. 

3. 1908 मध्ये जगातील पहिला एमबीए प्रोग्राम सुरू करण्याचे श्रेय हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (आताच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल) ला जाते. 

या सुरुवातीच्या प्रोग्रामनी अमेरिकेच्या जलद औद्योगिकीकरण (industrialization) होत असताना व्यवस्थापन आणि आर्थिक पद्धतींचे शिक्षण असलेल्या व्यवसायिकांना खूप मदत केली. MBA ची लोकप्रियता वाढली, ज्यामुळे व्यावसायिकांसाठी एक्झिक्युटिव्ह MBA सारख्या विविध स्पेशलायझेशन्स प्रोग्राम आणि फॉरमॅट्सचा उदय झाला.

MBA visionmarathi.co.in

How MBA helps in Business? (MBA व्यवसायात कशी मदत करते?)

एमबीए तुम्हाला व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी एक सुसज्ज मार्ग दाखवतो. बिजनेस मध्ये तुम्ही MBA मधील ज्ञान कसे वापरू शकता हे पुढील प्रमाणे आहे:

1. ब्रॉड बिझनेस नॉलेज (Broad Business Knowledge): एमबीएमध्ये फायनान्स व अकाउंटिंगपासून मार्केटिंग आणि ऑपरेशन्सपर्यंत विविध विषयांचा समावेश होतो. एमबीए तुम्हाला व्यवसायाचे वेगवेगळे भाग एकत्र कसे कार्य करतात याची स्पष्ट समज देते.

2. स्ट्रॉंग स्किल्स (Strong Skillset): तुम्ही आर्थिक विश्लेषण (Financial Analysis) आणि डेटा विश्लेषण (Data Analysis) यासारखी हार्ड स्किल्स त्याचसोबत कम्युनिकेशन, टीमवर्क आणि लीडरशिप यासारखी सॉफ्ट स्किल्स कसे शिकाल हे यात अगदी बारकाईने दिलेले असते. ही कौशल्ये कोणत्याही बिजनेस मधील व्यावसायिकांसाठी आवश्यकच आहेत.

3. समस्या सोडवण्याची क्षमता (Problem-Solving Abilities): एमबीए प्रोग्राम्स मध्ये बऱ्याचदा केस स्टडी (नेहमीच्या बिझनेस मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमचे थेरॉटिकल एक्झाम्पल) चा वापर करतात ज्यामुळे तुम्हाला गुंतागुंतीच्या बिजनेस मधील समस्यांकडे/ प्रॉब्लेम्सकडे कसे पाहायचे आणि ते कमी वेळात कसे सोडवायचे हे यात शिकवले जाते. हे तुम्हाला सिरीयस पणे विचार करण्यास आणि प्रेशर मध्ये योग्य निर्णय घेण्यास अधिक उत्तमरीत्या शिकवते.

4. उद्योजकीय विचार (Entrepreneurial Thinking): तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एमबीए एक उत्तम स्प्रिंगबोर्ड असू शकते. तुम्ही व्यवसाय नियोजन, मार्केटिंग आणि निधी कसा सुरक्षित करायचा याबद्दल शिकाल.

5. नेटवर्किंगच्या संधी (Networking Opportunities): अनेक एमबीए प्रोग्राम शाळेतील मित्र, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी जे सध्या यशस्वी व्यावसायिक नेते आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या संधी देतात. हे तुमच्या करिअरसाठी एक मौल्यवान संसाधन असू शकते.

6. करिअरची प्रगती (Career Advancement): एमबीए मध्ये सध्याच्या आणि येणाऱ्या जगातील करिअरच्या नवीन संधी आणि ऍडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत याचे ज्ञान मिळते. यामुळे बिझनेस मध्ये उच्च कमाईची क्षमता देखील होऊ शकते.

MBA Program Details (एमबीए प्रोग्राम डिटेल्स)

  • एमबीए प्रोग्राम लोकप्रिय आहे कारण सायन्स, कॉमर्स आणि ह्युमिनिटीज अशा कोणत्याही बॅकग्राऊंड चे विद्यार्थी कोर्स घेऊन बिझनेस मधील महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतात. 
  • साधारणपणे MBA हा दोन वर्षांचा चार किंवा सहा सेमिस्टरमध्ये विभागलेला कोर्स आहे. तर, काही प्रायव्हेट संस्था एक वर्षाचे पीजीडीएम (Post Graduate Diploma in Management) प्रोग्राम देखील पुरवतात. 
  • Full Time, Part Time, Online आणि Distance-Education मोड अशा विविध पद्धतींमध्ये एमबीए अभ्यासक्रम करू शकतो. इच्छुक उमेदवार एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्राम सारख्या त्यांच्या व्यावसायिक अनुभवावर (कंपनीतील त्यांच्या एक्सपिरीयन्सवर) आधारित प्रोग्राम देखील शोधू शकतात. 
  • बऱ्याच व्यवस्थापन संस्था(Institutes) एमबीए पदवी ऐवजी, पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM), पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा (PGD) किंवा पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्राम (PGP) ऑफर करतात. शेवटच्या दोघांमध्ये तसा फारसा फरक नाही पण स्वतंत्र ओळख म्हणून ते कोर्स वेगवेगळे उपयोग आहेत. 
  • संपूर्ण शिक्षण पद्धतींमध्ये Full time MBA पदवी सर्वात लोकप्रिय आहे. Full time MBA डिग्री मध्ये थेअरी क्लासेस, व्यावहारिक (Practical) प्रोजेक्ट, स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्राम (असा प्रोग्राम ज्यामध्ये विद्यार्थी सहा महिने ते वर्षभर आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत इन्स्टिट्यूट मध्ये अभ्यास करतात), समर इंटर्नशिप आणि आणि फायनल प्लेसमेंट समाविष्ट आहे. 
  • नवीन पदवीधर तसेच काही वर्षांचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार Full Time MBA Degree ची निवड करतात. काही कॉलेजेस नवीन पदवीधरांना प्राधान्य देतात तर काही महाविद्यालये काही वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देतात. दुसरीकडे, एक्झिक्युटिव्ह एमबीए 5 पेक्षा अधिक वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी योग्य आहे कारण ते नोकरीच्या मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांची व्यवस्थापकीय (Management) आणि नेतृत्व कौशल्ये वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. 
  • 12th झाल्या नंतर एमबीए कोर्स घेण्यासाठी ‘Five IIM’ द्वारे एकात्मिक एमबीए प्रोग्राम ऑफर केला जातो. त्याचे अधिक माहिती खालील कोर्सच्या लिस्टमध्ये आहे.

वैशिष्ट्ये

कोर्सची माहिती          

MBA चा फुल फॉर्म

Master of Business Administration (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन)

MBA कोर्सची लेव्हल

पोस्ट ग्रॅज्युएशन (ग्रॅज्युएशन नंतर)

एमबीए कोर्स चे प्रकार

फुल टाइम MBA, पार्ट टाइम MBA, डिस्टन्स MBA, ऑनलाइन MBA, एक्झिक्यूटिव्ह MBA आणि इंटिग्रेटेड MBA

एमबीए कोर्सची फी

INR 2 Lakh – INR 27 लाख आणि त्यापेक्षा जास्त

MBA कोर्सचा पात्रतेचा क्रायटेरिया

अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम

MBA कोर्सेस ची ऍडमिशन प्रक्रिया

इंटरेन्स एक्झाम + ग्रुप डिस्कशन + पर्सनल इंटरव्यू

MBA कोर्सेसच्या टॉप एंट्रन्स एक्झाम

CAT, CMAT, XAT, MAH MBA CET, इत्यादी.

एमबीए कोर्सेसची टॉपची कॉलेजेस

IIM Ahmedabad, IIM Bangalore, IIM Calcutta, IIM Lucknow, IIM Indore, IIM Kozhikode, इत्यादी.

MBA कोर्सेस मधील वैशिष्ट्ये

Sales, Marketing, Operations, Finance, Human Resources, Digital Marketing and Business Analytics

MBA जॉब प्रोफाइल्स

फायनान्स मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर, ह्यूमन रिसोर्सेस (HR) मॅनेजर, इत्यादी

MBA सरासरी सॅलरी

INR 5 LPA – INR 25 LPA

MBA टॉप रिक्रुटर्स

Boston Consulting Group, McKinsey, Bain & Co, Morgan Stanley, Citibank, JP Morgan Chase, Amazon, Facebook, Google, Adobe, etc.

What are different types of MBA courses? (एमबीए अभ्यासक्रमांचे विविध प्रकार कोणते आहेत?)

5 प्रकारे तुम्ही करू शकता MBA Programs मध्ये enroll| जाणून घ्या MBA Courses विषयी

1.  Full-Time MBA Courses (फुल टाइम एमबीए कोर्स) 

Full Time ही दोन वर्षांच्या कालावधीची नियमित एमबीए पदवी आहे. हा एक रेसिडेन्शिअल प्रोग्राम आहे ज्यामध्ये भौतिक वर्ग, लाईव्ह प्रोजेक्ट, सेमेस्टरनुसार असेसमेंट, समरिंटनशिप आणि अंतिम प्लेसमेंट समाविष्ट आहेत. भारतात सुमारे 5,000 पूर्ण-वेळ एमबीए महाविद्यालये आहेत.

कोर्सची पात्रता (Elibility)

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment