आनंदी राहण्याचे Secret जगाला सांगणारे | Gautam Buddha Information In Marathi

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

त्यादिवशी कपिलवस्तू राज्यामध्ये (दक्षिण नेपाळ – गोरखपूर, उत्तरप्रदेश) प्रत्येक माणूस तो शुभसमाचार ऐकण्यासाठी आतुर होता. आणि शेवटी ती बातमी सर्वांना मिळाली. राजा सुद्धोधना आणि राणी माया यांच्या पोटी राज्याच्या राजकुमाराचा जन्म झाला. संपूर्ण राज्यामध्ये आनंदाने उत्सव साजरा होत होता. थोड्या दिवसांनी गुरुवर्य कौन्दिन्य राजकुमाराला बघण्यासाठी राजमहालामध्ये पोहोचले. त्यांनी बाळाला घेऊन लगेचच प्रश्न केला की राजा तुम्ही बाळाच्या शरीरावर असलेले निशाण पाहिलेत का? हे निशाण या बाळाच्या महानतेचे प्रतीक आहे.

भविष्यात हा बालक महान व्यक्ती बनेल अशी त्यांनी भविष्य वर्तवले. त्यांनी बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचे असे शब्द होते  की मला याचे दुःख वाटते की मी या बाळाची महानता बघू शकणार नाही. ‘तर असे का?’ असा प्रश्न राजाने विचारला असता कौन्दिन्य गुरुवर्य म्हणाले की थोडा वेळ वाट बघा, जसे या बाळाचे वय वाढत जाईल तसे त्यास मनुष्याचा जीवनातील कटू सत्य समजू लागेल आणि तेव्हा हा बालक संपूर्ण राजपाटाचा त्याग करून सिद्धी प्राप्त करून बुद्ध (Gautam Buddha Information )या नावाने ओळखला जाईल. 

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

साध्या शब्दांत गौतम बुद्धांची जीवन कथा (Gautam Buddha Life Story in Simple Words in Marathi)

काही दिवसांमध्येच सिद्धार्थच्या आईचा देहांत झाला. महाराजांची दुसरी पत्नी अर्थात गौतमी यांनी बाळाला पालनपोषण करून मोठे केले. त्यांनी सिद्धार्थचा आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्यामुळेच सिद्धार्थला गौतम हे नाव प्राप्त झाले. दुसऱ्या बाजूला राजा चिंताग्रस्त झाला. त्यांना गौतम यांची नेहमीच काळजी वाटत असे.

राजवाड्यातील काही मंत्र्यांनी त्यांना अशी कल्पना सुचवली की जर सिद्धार्थ म्हणजेच गौतमला संसारातील सामान्य जीवनापासून म्हणजेच दुःखापासून लांब ठेवले तर राजपाट सोडून जाण्याचा विचारही सिद्धार्थला येणार नाही. महाराजांनी लगेचच सिद्धार्थसाठी सर्व सुख संपत्तीयुक्त असा राजमहाल तयार केला. त्या जागी सर्व सर्व प्रकारच्या सुखांची नांदी होती, अनेक नोकरचाकर सिद्धार्थच्या सेवेसाठी आणि पंचपक्वानासाठी तत्पर होते. मनोरंजनासाठी नृत्य आणि संगीताचे आयोजन नेहमी होत असे.

काही वेळानंतर राजपुत्राचा  यशोदा नावाच्या राजकन्यासोबत विवाह पार पडला. काही वर्षांनी त्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाला. ज्याचं नाव राहुल ठेवण्यात आलं. सर्व काही सुरळीत पार पडल्यानंतर सिद्धार्थने राजासमोर त्या राजमहालाच्या बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. आता त्याला बाहेरील जीवन जवळून जाणून घ्यायचं होतं. 

राजांना पुन्हा चिंता सतावली, त्याने सेवकांना सांगितले की सिद्धार्थच्या मार्गामध्ये त्याला कोणतीही दुःखदायक घटना दिसता कामा नये. त्याचा मार्ग पूर्णता आनंदमय असला पाहिजे. दुःखदायक आणि वाईट गोष्टींना त्याच्या मार्गापासून दूर ठेवा. पण विधीमध्ये लिखित काहीतरी वेगळेच होते.

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

गौतम बुद्धांनी आपला राजवाडा का सोडला? (Why Did Gautam Buddha Leave His Palace in Marathi)

सिद्धार्थ आपल्या रथातून आपल्या सारथी सोबत राज्याचे भ्रमण करण्यास निघाला. राज्याचे भ्रमण करीत असताना त्याच्या मार्गावर एक माणूस दिसला ज्याचे शरीर पूर्णतः कमकुवत होते, ज्याचा चेहऱ्यावर सुरकुत्या होते आणि तो एका काठीच्या सहाय्याने अगदी वाकत पुढे चालत होता. सिद्धार्थने सारथीला विचारले की हे काय आहे. सारथी ने उत्तर दिले की हा तर एक वृद्ध व्यक्ती आहे. प्रत्येक जण एका विशिष्ट वयानंतर वृद्ध होऊन जातो. काही वर्षांनी तुम्ही सुद्धा वृद्ध होऊन जाल. सिद्धार्थचा रथ पुढे चालू लागला.

पुढे जाऊन त्याला एक असा माणूस दिसला ज्याच्या अंगावर जखमा होत्या, तो माणूस वेदनेने रडत होता. सिद्धार्थने त्या माणसाला बघून त्याचे रडण्याचे कारण विचारले असता सारथीने सांगितले की त्यास कुष्ठरोग झाला आहे आणि त्याच्या वेदनांना तो सहन करू शकत नाही आहे त्यामुळे तो रडत आहे.

रथ थोडा पुढे सरकताच त्यांना एक असे दृश्य दिसते ज्यामध्ये चार लोक एका माणसाला घेऊन जाताना दिसतात. सिद्धार्थने विचारले की हे काय आहे आणि हे लोक या माणसाला असे का घेऊन जात आहेत. सारथीने उत्तर दिले की त्या माणसाचा मृत्यू झाला आहे आणि त्याला हे लोक स्मशानामध्ये घेऊन जात आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक माणसाचा मृत्यू हा अटल आहे. मृत्यू हे जीवनातील शाश्वत सत्य आहे. सिद्धार्थ पूर्णतः शांत झाला आणि सारथीस पुन्हा राजमहालात पोहोचवण्यासाठी आदेश दिला. 

राज्याचे भ्रमण करून आल्यानंतर सिद्धार्थ एका जागी स्थिर बसून विचार करू लागला. राजाने त्यास पाहिले आणि विचारले की सिद्धार्थ कोणत्या गहण विचारामध्ये आहेस. सिद्धार्थने उत्तर दिले की ” पिताश्री, मी विचार करत आहे की मी कोण आहे, मृत्यू काय आहे, या सर्व गोष्टींचे मी अध्ययन करू इच्छितो. राजाने यामध्ये चिंतेची काय बाब आहे असे विचारले असता सिद्धार्थने उत्तर दिले की, एक दिवस तर मला मरण येणारच आहे.

जन्म घेतलेला प्रत्येक माणसाचे शेवटी मरण अटळ आहे. तर मी या नाश्वत शरीराच्या मोहामध्ये का राहू? राजाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की “तू सत्य पासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेस, तू क्षत्रिय आहेस आणि तुला या राज्याचा राजा बनायचे आहे.” पण सिद्धार्थने त्यांनाच सत्य समजवण्याचा प्रयत्न केला की ” पिताश्री, तुम्हीसुद्धा एक दिवस वृद्ध व्हाल आणि तुमचे सुद्धा शरीर नष्ट होईल.

त्यामुळे अशा शरीरासोबतचे सर्व बंधन मला तोडावेच लागतील. हे कटू सत्य आहे आणि हे मानलेच पाहिजे. मी माझे सर्व बंधन तोडू इच्छितो मी संन्यास घेऊन भिक्षा मागेन. त्यामुळे मला या मोहमायापासून मुक्ती पाहिजे. आपला आशीर्वाद असू द्या. हे सर्व मनाला तोडून टाकणारे शब्द ऐकल्यावर राजा घाबरून गेला आणि सिद्धार्थला विचार न करण्याचा आदेश देऊन नृत्य आणि संगीताचा आनंद घेण्यास महालामध्ये पाठवले.

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

गौतम बुद्धांचा राजवाडा सोडतानाचा क्षण (Moment of Gautam Buddha While leaving the Palace)

सिद्धार्थ तिथून तर गेला पण या सर्व गोष्टी त्याच्या मनात घर करून गेल्या. आपली पत्नी आणि पुत्रासोबत तो आयुष्यामध्ये मग्न तर होता पण अंततः त्याने आपल्या मनामध्ये निर्धार केला आणि आपल्या बाळाला शेवटचे प्रेमाने बघून व राजपाटाचा त्याग करून तो तिथून निघाला.

सिद्धार्थने आपल्या एका मित्राला स्वतःसोबत घेतले आणि राज्याच्या सीमेवर जाऊन स्वतःच्या अंगावरील सर्व आभूषण परत महालात नेण्याची त्याला विनंती केली. आणि सिद्धार्थ तिथून पुढे एकटाच निघाला. 

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

गौतम बुद्धांना ज्ञान कसे मिळाले (How Gautam Buddha Got Enlightenment in marathi)

पुढे जाऊन सिद्धार्थने भिक्षेचा मार्ग निवडला. भिक्षेमध्ये जितके मिळाले तितके खाऊन साधू संतांसोबत जीवनातील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत होता. ध्यानमय अवस्था प्राप्त करूनही त्याला जाणीव झाले की अजूनही तो संसारातून मुक्त होऊ शकला नाही.

त्यामुळे शेवटी त्यांनी आपल्या पाच साथीदारांसोबत तिथून निघून जाण्याचे ठरवले आणि अन्न सोडून ध्यान करण्याचा विचार केला. व स्वतः वेगळ्या पद्धतीने मुक्तीचा मार्ग शोधू लागला. 

एक दिवस सिद्धार्थ ध्यान करताना सितार वाजवत होते. त्यांच्या साथीदारांनी हे पाहून प्रश्न केला असता, सिद्धार्थने त्यांचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला की सुरामध्ये वाजणारी सितार आपल्या मनाला अगदी शांत करते, पण जर सितारच्या तारेला जोरात खेचण्याचा प्रयत्न केला की तार तुटून जाते आणि संगीत समाप्त होते.

तार सैल झाली तरी संगीत थांबते. सितारची तार योग्य स्थितीमध्ये असेल तरच मन मोहित होते आणि हृदय बहरून जाते. त्यांनी समजावले की, माणसाचे जीवन याच प्रमाणे आहे. मुक्तीच्या ध्येयाने आपण आपल्याला योग्य प्रमाणात बांधले पाहिजे.

ही शिकवण घेताना आपण अधिक जोरात पकडले किंवा थोडे सैल सोडले तर आपण आपल्या ध्येयाच्या मार्गातून भटकून जाऊ. त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ होता की मुक्तीसाठी अशा कोणत्याही कठीण उपायाची आवश्यकता नाही. मुक्तीचा मार्ग प्राप्त करण्यासाठी त्याची शिकवण महत्वाची आहे आणि ही अगदी सितारातील तारांच्या सुरांसारखी आहे.

त्यानंतर त्यांनी पुन्हा अन्नग्रहण करण्याचा विचार केला पण तो एक भोग म्हणून नाही तर जीवनातील समतोल राखण्यासाठी एक उपाय म्हणून होता. त्यानंतर सिद्धार्थ यांचे पाच साथी त्यांना सोडून दुसऱ्या मार्गाने गेले.

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

गौतम बुद्धांच्या शिकवणी काय आहेत? (What Are the Teachings of Gautam Buddha in Marathi)

दानवचसिद्धार्थ पुन्हा एकटे बोधगया मध्ये गेले आणि तिथे बोधीवृक्षाखाली त्यांनी ध्यानाचा आरंभ केला. जीवन आणि मृत्यू या विषयावर त्यांचे ध्यान चालू होते. त्यांचे ध्यान तोडण्यासाठी दानवांचे प्रयत्न चालू होते. दानवच काय तर अप्सरासुद्धा त्यांचे ध्यान भंग करू शकल्या नाहीत. मग राक्षसांचे सारे सैन्य त्यांच्यावर तुटून पडले. परंतु सिद्धार्थ यांचे ध्यान अखंड चालू राहिले.

“तू जे शिकला आहेस ते इतरांना देण्यास आपल्या राहिलेल्या जीवनाचा वापर कर आणि सर्वांना मुक्तीचा मार्ग दाखव” असा आदेश सिद्धार्थ यांना ध्यानमय अवस्थेमध्ये प्राप्त झाला. आणि बुद्ध यांच्या यात्रेचा प्रारंभ झाला. 

प्रथम ते सारनाथ येथे गेले तिथे त्यांना अचानक त्यांचे पाच शिष्य भेटले. त्यानंतर प्रवचनामध्ये त्यांनी बुद्धांचे विचार ऐकले. ज्यात बुद्ध असे म्हणतात की “जीवन मृत्यू आनंद हे सर्व कधीही न संपणारे चक्र आहे. जोपर्यंत आपण यातून बाहेर निघणार नाही तोपर्यंत सर्वजण अशाच प्रकारे भटकत राहतील.

जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि संसारातील करुणा व दुःख दूर करून सर्वत्र शांती मिळवण्यासाठी धर्माची शिकवण द्या. जीवनाची सुरुवात, मध्य व तसेच अगदी मरणापर्यंत चांगले कार्य करा. दुसऱ्यांसाठी जीवन व्यक्तीत करा. आणि आपले कर्तव्य पूर्ण करा यातच जीवनाचा आनंद लपला आहे. जो आपल्याला प्राप्त होऊ शकतो.”

बुद्ध कुरूविला गावामध्ये पोहोचले जिथे त्यांची भेट अग्निपूजक साधूंच्यासोबत झाली. ज्यांचे प्रमुख होते साधू कश्यप. बुद्धांनी एक रात्र एक साधूंच्या पवित्र अग्नी ठेवणाऱ्या ठिकाणी राहण्याची विनंती केली. कश्यप यांना गौतम बुद्ध हे एक ज्ञानी व्यक्ती आहेत याची जाण होती. त्यांनी राहण्याची परवानगी दिली परंतु त्या खोलीमध्ये असणाऱ्या विषारी सापांपासून सावध राहण्यास सांगितले.

कश्यप यांना वाटले की विषारी साप पाहून बुद्ध पळून जातील परंतु सकाळी बुद्धांना अगदी ताजेतवाने पाहून कश्यप आश्चर्यचकित झाला. आणि त्याला दृष्ट विचार आला की जर गौतम बुद्ध इथे राहिले तर सर्व लोक त्यांचीच पूजा करतील याची त्याला भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांना तिथून लगेच बाहेर काढावे असा विचार करू लागला. परंतु कश्यप काही बोलण्याआधीच गौतम बुद्ध बोलले की “मी जात आहे, तुझ्या मध्ये शत्रुत्व आणि मत्सर असल्याने तू परमात्मा सोबत एकरूप नाही आहेस.”

हे ऐकून कश्यप याने लगेचच बुद्धांची क्षमा मागितली आणि त्यांच्या शिष्य बनवून घेण्यास विनंती केली.

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

गौतम बुद्धांकडून शिकण्यासाठी जीवनाचे धडे (Life Lessons to Learn from Gautam Buddha in Marathi)

बुद्ध एका ठिकाणी चालत असताना एका सेवकाला एका शेळीचा बळी देताना त्यांनी पाहिले. महाराज बिंबिसारने यज्ञातील बळीसाठी हे करण्यास सांगितले आहे असे तो सेवक म्हणाला. त्यानंतर बुद्धांनी राजाची भेट घेतली आणि त्यांनी विचारले असता राजाने सांगितले की कोणत्याही प्राण्याची बळी दिला तर मी आणि माझे राज्य सुरक्षित राहील असे त्याने सांगितले. बुद्ध म्हणाले की तुझ्यासाठी या प्राण्यापेक्षा अधिक मौल्यवान मी आहे तर माझा बळी दे आणि माझे तुकडे कर.

त्याने पूर्णतः नकार दिला असता बुद्धांनी पुढे त्याला समजावले की यज्ञ हा आपल्यातील कमजोरी दूर करण्यासाठी असतो अशा प्रकारे हिंसा करून कधी यज्ञ होतो का? खरे तर अहिंसाच सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे ज्यामुळे सर्व जागी आनंद होईल आणि सर्वजण आनंदाने राहू शकतील. स्वतःमधील हिंसक वृत्तीला सोडावे लागेल आणि माया, लोभ, मत्सर अशा वाईट गोष्टींना सोडावी लागेल तेव्हाच तुला आनंद प्राप्त होईल. हे मौल्यवान शब्द ऐकून तो राजा बुद्धांचा शिष्य झाला.

एका दिवशी बुद्धांच्या मनात आपल्या स्वतःच्या म्हणजेच कपिलवस्तू राज्यास भेट देण्याचा विचार आला. ते स्वतःच्या राज्यात गेले. तेथे राजाच्या म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. स्वतःच्या मुलाला पुन्हा एकदा पाहून त्यांच्या उर भरून आला.

तू निवडलेला मार्ग अगदीच योग्य आहे आणि त्यामुळे तू सर्वांना मानवतेचा उपदेश देऊ शकतो असे त्यांचे शब्द होते. गौतम बुद्ध त्यानंतर यशोधराच्या  म्हणजे त्यांच्या पत्नीच्या भेटीस गेले. त्यांनी पाहिले की यशोधराने पती बुद्धांप्रमाणे स्वतःचे सुद्धा केस कापले होते. तिने सुद्धा आपल्या पतीप्रमाणे कधी कधी अन्नग्रहण करणे निवडले. गौतम बुद्धांनी तिचे उपकार मानले आणि याच जन्मामध्ये नाही तर आधीच्या जन्मात सुद्धा साथ दिल्याने तिचे आभार मानले. कपिलवस्तू राज्यातील सर्व लोक बुद्धांचे अनुयायी बनले. अनुयायींना उपदेश देऊन आणि स्वतःच्या मुलाला आशीर्वाद देऊन बुद्ध पुन्हा आपल्या ध्येयाकडे वळले.

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

एके दिवशी एका गृहस्थाने भिक्षा देण्यास नकार दिला असता धडधकड असल्याने काम का करत नाही असे विचारणा केली. त्यास आपण स्वतः शेतकरी असल्याचे सांगितले. मी तुझ्याप्रमाणेच शेती किंवा काम करतो. ज्ञानाची शेती करतो. विवेक आणि वैराग्य हे माझे धान्य आहेत. सत्य तथा अहिंसा हे माझे शेतातील बीज आहेत. त्यागाचे पाणी देऊन मी धान्य पिकवतो. ध्यानच माझे साधन आहे तर साम आणि धाम माझ्या शेतातील बैल आहेत यांच्या मदतीने मी मानवतेची शेती करतो.

हेच माझे नेहमीचे काम आहे. यामुळे माझा उदरनिर्वाह होतो. हे महाशय आध्यात्मिक शक्तीचा आनंद काही वेगळाच आहे ज्यामुळे मनुष्य संपूर्ण संसारचा आनंद प्राप्त करू शकतो. आणि तोच आनंद मी घेतो. हे ऐकून त्त्या गृहस्थाला स्वतःची चूक समजली आणि लगेच त्याने त्यांची क्षमा मागितली. व स्वतःला शिष्य बनवून घेण्यासाठी विनंती केली.

देवदत्त नावाचा एक व्यक्ती होता जो बुद्धांवर जळत असे. एके दिवशी त्याने भिल्लांना गौतम बुद्धांचा वध करण्यास पाठवले. त्या भिल्लांना बघून गौतम बुद्धांनी थांबू नका तर शस्त्र प्रहार करा असे सांगितले.  परंतु जसे भिल्लांनी बाण चालवला तोच ते बाण अगदी फुलांमध्ये रूपांतरित झाले आणि गौतम बुद्धावर त्यांचा वर्षाव झाला. हे पाहून ते भिल्ल सुद्धा बुद्धांचे अनुयायी बनले.

नंतर काही दिवसांनी  आनंद हे बुद्धांचे दूरचे भाऊ होते ते सुद्धा बुद्धांच्या शरण आले त्यासोबतच बुद्धांची माता गौतमी यांनी सुद्धा गौतम बुद्धांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. 

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

एके दिवशी जंगलामध्ये चालत असताना एक भिल्ल अंगुलीमानाने गौतम बुद्धांचा मार्ग अडवला तेव्हा बुद्धांनी स्वतःला मारण्यापूर्वी त्या भिल्लासमोर शेवटची इच्छा प्रकट केली. आणि बाजूच्या झाडाची फांदी तोडण्यास सांगितले.

भिल्लाने हे काम अगदी काही सेकंदामध्येच केले. त्यानंतर बुद्ध म्हणाले की आता ती फांदी पुन्हा झाडाला लाव अगदी जशी होती तशी. भिल्ल म्हणाला हे तर कोणी करू शकत नाही.

बुद्ध म्हणाले मग तू बलवान कसा, नष्ट करण्याचे कार्य तर कोणीही करू शकतो अगदी लहान मुलगा सुद्धा परंतु कोणतीही गोष्ट निर्माण करणाराच अधीक शक्तिमान असतो. त्या अंगुलीमान भिल्लाला स्वतःची चुकी समजून भिल्लाने लगेचच बुद्धांची क्षमा मागितली व तो त्यांचा शिष्य बनला. 

एके दिवशी बुद्धांचे हे सर्व कार्य ऐकून स्वतःचा बाळ गमावला असताना एक महिला त्या बाळाला तसेच घेऊन बुद्धांकडे आली आणि बाळाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती करू लागली.

गौतम बुद्ध म्हणाले मी जिवंत करेन पण मला त्यासाठी अशा घरातून मोहरी आण ज्या घरात कधीच मृत्यू झाला नाही. तिने सर्व गावातील लोकांच्या घरी जाऊन विचारणा केली परंतु असे घर तिला कुठेच सापडले नाही. 

त्यांनी हे समजावले की मृत्यू अटळ आहे. तो कोणीही थांबू शकत नाही प्रत्येकाने हे सोसले आहे आणि तेच खरे सत्य आहे. 

Video Credit: Youtube| DiscoveryChannelInd

गौतम बुद्ध यांनी सांगितलेला निर्वाणाचा खरा अर्थ (Real Meaning of Nirvana by Gautam Buddha in Marathi)

पुढे त्यांची लोकांना उपदेश देण्याचे काम तसेच चालू ठेवले. प्रत्येक जण त्यांच्याकडे स्वतःच्या अडचणी घेऊन येत असत आणि त्यातून कसे आनंदी राहावे हे मानवतेचा उपदेश बुद्ध करत असत. असे तथागत बुद्ध अगदी 80 व्या वयात पोहोचले, माझा निर्वानाची वेळ जवळ आली आहे असे त्यांनी स्वतःचा भाऊ आनंद यास सांगितले. माझा मृत्यू जवळ आला आहे.

माझे कार्य पूर्ण झाले आहे. रडू नको पूर्ण जीवनामध्ये हीच गोष्ट तर मी सर्वांना सांगितले आहे. शरीर नश्वर आहे शरीरावर प्रेम नका करू. मी आता सर्व बंधनातून मुक्त होऊ इच्छितो त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना हेच सांगेन की इतकी वर्ष मी काही मार्ग सांगितला आहे त्यावर तुम्ही चाला आणि ईश्वराची प्राप्ती करा. 

भगवान बुद्ध यांचा निर्वाण समय अगदी जवळ आला होता. त्यांनी आपल्या शिष्यांना स्वतःसाठी एक सेज सजवायला सांगितला. त्यावर त्यांनी ते अगदी एक हात चेहऱ्याखाली ठेवून उत्तरेकडे डोके आणि पूर्वेकडे आपले मुख देऊन निद्रिस्त झाले.

आणि त्यांचे शेवटचे शब्द असे होते की – ” माझ्या पुत्रांनो, मी या संसारात मानवतेचा पाठ शिकवण्यासाठी आलो होतो. मला लोक विचारतात की ईश्वर कुठे आहे. तर ईश्वर सर्वत्र आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये त्याचा संचार आहे. मी मानवतेसाठी आपले जीवन अर्पण केले. त्यामुळे तुमच्या सोबत तुमचे गुरुदेव नाही असे कधीही समजू नका. माझे पठण सदैव तुम्हाला गुरुस्थान दाखवेल. जीवनाच्या प्रत्येक क्षणात कार्यरत रहा. प्रत्येक गोष्ट सत्याने करा. धर्माची शुद्धता , भाषेची शुद्धता तसेच प्रत्येक कार्यामध्ये सत्यतेचे प्रमाण दाखवा. आणि जे काही मी शिकवले आहे ते जीवनामध्ये लक्षात ठेवा. आणि त्या मार्गावर चालत रहा. हीच माझी अंतिम इच्छा आहे.” 

Video Credit: Youtube| discovery Plus India
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment