आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

दररोज तुम्ही सकाळी झोपेतून उठता आणि Message बघण्यासाठी Whatsapp ओपन करता, तुम्हाला बाहेर जायचं असेल तर कॅब/टॅक्सी बोलवण्यासाठी OLA ॲप ओपन करता, जर ट्रेनने जायचं असेल तर M-Indicator बघता, बातम्या बघण्यासाठी Inshorts  आणि भूक लागली तर जेवण मागवण्यासाठी Zomato किंवा Swiggy वर नक्की जाता. कधी मनाला वाटले कपडे किंवा शूज मागवावे  तर Amazon and Flipkart आहेतच.

आता त्यांना पैसे कसे देणार तर Google Pay आणि Phone Pay हे दोन भाऊंना कसे विसरणार. काही Shows बघायचे झालेच तर राहिलेले Netflix and Amzon Prime का बरं पुढे नाहीत येणार. आणि या सगळ्यांना तुमच्या पर्यंत पोहोचवणारा Playstore आहेच बरोबर. म्हणजे आपली दररोजची जवळजवळ खूप सारी कामे ॲप्स वापरून बसल्या बसल्या होऊन जातात.

या तुमच्या खिशातील छोट्याशा फोन मध्ये इतक्या गोष्टी सहज करणारे ॲप्स नक्की बनवते तरी कोण? त्यांचे किती सारे प्रकार आहेत? त्यासाठी स्किल्स तरी कोणत्या लागतात? App बनवणारे व्हायचे कसे? त्यांची सॅलरी तरी किती असते? आणि हे सर्व शिकण्यासाठी कोर्सेस कोणते आहेत? हे सर्व प्रश्न आपल्याला कधीतरी मनात येत असतात.

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे नक्कीच सापडतील.कॉलेज डिग्री शिवाय ॲप डेव्हलपर (App Developer)  बनायचे कसे हे पुढे वाचून तुम्हाला नक्की कळेल. आणि एकदा कळाले की वरील मोठमोठ्या कंपनीतील नोकरी आहेच, त्यासोबत स्वतःचा स्टार्टअप उभा करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर खालील 5 मिनिट ची माहिती नक्की वाचा. Please Scroll Down.

आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

ॲप डेव्हलपर (App Developer) स्मार्टफोन आणि टॅब्लेट सारख्या मोबाइल डिव्हाइससाठी (असा डिव्हाइस जो कुठेही नेऊ शकतो) सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तयार करण्यात माहिर असतात. ऍप्लिकेशन्स, ज्यांना सामान्यतः “ॲप्स” म्हणून ओळखले जाते त्यामध्ये डेव्हलपर्स एंटरटेनमेंट, गेमिंग, प्रॉडक्टिव्हिटी आणि बिझनेस टूल्स पर्यंत अनेक उद्देशांसाठी काम करू शकतात.

ॲप डेव्हलपर्सकडे (App Developer) सामान्यत: Java, Swift किंवा Kotlin सारख्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेस मधील कौशल्य असते आणि त्यांना मोबाइल प्लॅटफॉर्म, ऑपरेटिंग सिस्टम आणि यूजर इंटरफेस डिझाइन याची चांगलीच समज असते.

लोकांच्या मोबाईल मध्ये अगदी सुरळीतपणे चालणारे, चांगला वापर होणारे आणि उत्तम परफॉर्मन्स दाखवणारे ॲप बनवण्याचे काम ॲप डेव्हलपर्स करत असतात. ॲप डेव्हलपर्स एखाद्या कंपनीमध्ये टीम मध्ये काम करतात, त्यामध्ये ॲप डिझायनर्स, प्रोजेक्ट मॅनेजर आणि ॲप क्वालिटी  मॅनेजर च्या पोस्टवर काम करतात.

तसेच एखाद्याला आपला स्वतःचा स्टार्टअप उभा करून एखादा स्वतःच बनवलेला ॲप लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तेही तो गुगल Play Store द्वारे करू शकतो. त्यामुळे डिमांड मध्ये असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन करिअरमध्ये ॲप डेव्हलपरची भूमिका मोठी आहे. मोठ्या मोठ्या इंडस्ट्री मध्ये आणि क्षेत्रामध्ये ॲप्स मध्ये इनोवेशन आणणे आणि एक युजर फ्रेंडली ॲप बनवणे डेव्हलपर्सची मोठे रोल्स आहेत.

ॲप डेवलपर्सचे प्रकार(Types of App Developers)

आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

ॲप डेव्हलपरचे (App Developer) अनेक प्रकार आहेत, प्रत्येकाचे स्वतःचे स्पेशलायझेशन आणि डेव्हलपमेंट मधील फोकस आहे. थोड्या ॲप डेव्हलपरची थोडक्यात माहिती पुढे दिलेली आहे:

1) Android डेव्हलपर (Android Developer): 

Android डेव्हलपर साधारणपणे Android ऑपरेटिंग सिस्टमसाठी मोबाइल एप्लीकेशन तयार करण्यात तरबेज असतात. विविध स्क्रीनच्या आकाराप्रमाणे, रिझोल्युशन प्रमाणे आणि हार्डवेअर कॉन्फिगरेशनसह सुसंगतता सुनिश्चित (Compatible आहेत की नाही ते चेक) करून, Android-Powered डिव्हाइसवर चालणारे ॲप्स डेव्हलपमेंट करण्यासाठी ते Java किंवा Kotlin सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरतात. 

2) फ्रंट-एंड डेव्हलपर (Front-end Developer): 

फ्रंट-एंड डेव्हलपर मोबाइल एप्लीकेशन चा युजर इंटरफेस (UI) आणि युजर एक्सपिरीयन्स (UX) तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात. HTML, CSS आणि JavaScript सारख्या फ्रंटएंड टेक्नॉलॉजीचा वापर करून UI डिझाईन्स, लेआउट स्ट्रक्चर आणि इंट्रॅक्टिव्ह एलिमेंट्स चा वापर करण्यासाठी ते ॲप डिझायनर सोबत काम करतात.

फ्रंटएंड कंपोनंट्स दिसण्यास आकर्षक, प्रतिसाद देणारे (Responsive) आणि युजरसाठी ऍक्सेसिबल आहेत यावर लक्ष ठेवण्याचे काम फ्रंट-एंड डेव्हलपर करतात. 

3) फुल स्टॅक डेव्हलपर (Full-Stack Developer): 

फुल स्टॅक डेव्हलपर्स मध्ये दोन्ही फ्रंटएंड आणि बॅकएंड डेव्हलपमेंट मधील कौशल्य असतात. ज्यामुळे ते ॲप डेव्हलपमेंटच्या सर्व पैलूंवर काम करू शकतात. ते यूजर इंटरफेस (UI) कंपोनेंट तयार करण्यासाठी फ्रंटएंड टेक्नॉलॉजी, सर्व्हर-साइड लॉजिक, डेटाबेस मॅनेजमेंट आणि API इंटिग्रेशन करण्यासाठी बॅकएंड टेक्नॉलॉजी मध्ये निपुण असतात.

फुल स्टॅक डेव्हलपर कन्सेप्ट पासून ते इम्प्लिमेंटेशन पर्यंत (उपाययोजने पर्यंत) संपूर्ण ॲप डेव्हलपमेंट प्रोसेस नीटपणे हाताळू शकतात आणि प्रोजेक्ट रिक्वायरमेंट वर आधारित विशिष्ट क्षेत्रांमध्ये तज्ञ बनू शकतात. 

4) गेम डेव्हलपर (Game Developer): 

गेम डेव्हलपर स्मार्टफोन आणि टॅब्लेटसह विविध प्लॅटफॉर्मसाठी इंटरॅक्टिव्ह आणि आकर्षक मोबाइल गेम तयार करण्यात माहिर असतात. ते गेम मेकॅनिक्स, ग्राफिक्स, ऑडिओ आणि यूजर इंटरफेस डिझाइन, विकसित आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी Unity, Unreal Engine, C सारख्या गेम डेव्हलपमेंट फ्रेमवर्क, इंजिन आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरतात.

गेम डेव्हलपर विशिष्ट शैलींवर लक्ष केंद्रित करू शकतात, जसे की पझल गेम, ॲक्शन गेम किंवा सिम्युलेशन गेम आणि गेम डाउनलोड अनेकदा ॲप डेव्हलपर डिझायनर आणि साऊंड आर्टिस्ट सोबत गेम जिवंत करण्यासाठी सहयोग करू शकतात.

5) iOS डेव्हलपर (Mobile Web Developer): 

iOS डेव्हलपर साधारणपणे Apple च्या iOS ऑपरेटिंग सिस्टीमसाठी मोबाइल ऍप्लिकेशन तयार करण्यात माहीर असतात, जे iPhones, iPads आणि इतर Apple डिव्हाइसेस साठी काम करतात.

Apple च्या डिझाइन गाईडलाईन्स तत्त्वांचे आणि परफॉर्मन्स स्टॅंडर्ड चे पालन करणारे ॲप्स डेव्हलप करण्यासाठी ते Swift किंवा Objective-C सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरतात. iOS डेव्हलपर iOS फीचर्स आणि API सह कॉन्स्टंट इंटिग्रेशन सुनिश्चित करतात, ऍपल डिव्हाइसवर कन्सिस्टन्सी आणि यूजर एक्सपिरीयन्स  पुरवतात. 

6) मोबाइल वेब डेव्हलपर (Mobile Web Developer): 

मोबाइल वेब डेव्हलपर मोबाइल-ऑप्टिमाइझ केलेल्या वेबसाइट्स आणि मोबाइल ब्राउझरद्वारे ॲक्सेस करण्यायोग्य वेब ॲप्लिकेशन (App) तयार करण्यात तरबेज असतात. ते HTML, CSS, JavaScript सारख्या वेब डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करतात आणि मोबाइल-अनुकूल इंटरफेस तयार करण्यासाठी व मोबाइल डिव्हाईस चा परफॉर्मन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी प्रगत डिझाइन टेक्नॉलॉजी वापरतात.

मोबाइल वेब डेव्हलपर प्लॅटफॉर्म किंवा ऑपरेटिंग सिस्टमची पर्वा न करता स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर कॉन्स्टंट आणि रिस्पॉन्स देणारा वेब एक्सपिरीयन्स देण्यावर लक्ष केंद्रित करतात.

ॲप डेवलपर काय करतात? (What Do App Developers Do)

आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

ॲप डेव्हलपरची (App Developer) कामे आणि जबाबदाऱ्या ते काम करत असलेल्या विशिष्ट प्रोजेक्ट, कंपनी किंवा बिजनेस वर अवलंबून असतात. ॲप डेव्हलपरची काही सामान्य कामे आणि जबाबदाऱ्या खाली दिलेल्या आहेत:

1) कन्सेप्ट आणि प्लॅनिंग (Concept and Planning): 

ॲप डेव्हलपर (App Developer) लोकांची आवश्यकता, उद्दिष्टे, इंटरेस्ट आणि लक्ष्यित प्रेक्षक समजून घेण्यासाठी ॲपचे क्लाइंट्स, टेक होल्डर्स किंवा प्रोजेक्ट मेम्बर सोबत उत्तम चर्चा (Discussion) करून काम करतात . ते नवीन आयडिया सुचवण्यासाठी, नवीन फीचर्स बनवण्यासाठी आणि प्रोजेक्ट मधील स्कोप काय आहे हे ठरवण्यासाठी ते ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स मध्ये भाग घेतात.

प्लॅनिंग फेजमध्ये, ॲप डेव्हलपर प्रोजेक्ट टाइमलाइन देखील तयार करू शकतात, टप्पे (Mile Stones – काय मिळवायचे आहे) स्थापित करू शकतात आणि तांत्रिक (Technological) फीचर्स मध्ये मोठ्या नवीन गोष्टी घडवून आणू शकतात. 

2) यूजर इंटरफेस डिझाइन करणे (Designing User Interfaces): 

मोबाईल ॲप अधिकाधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी आणि नवनवीन डिझाईन बनवण्यासाठी ॲप डेवलपर्स मोठी कामगिरी बजावतात. ते वायरफ्रेम्सचे (Rough डिझाईन) ट्रान्सलेशन करण्यासाठी किंवा मॉकअप्सचे फंक्शनल UI एलिमेंट्स मध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी, ब्रँड गाईडलाईन्स आणि उपयोगी उपयोग होईल अशा सर्वोत्तम पद्धतींसह कन्सिस्टन्सी राहण्यासाठी डिझाइनरसह जवळून कार्य करतात.

यूजर एक्सपिरीयन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी कलर स्कीम्स, टायपोग्राफी बनवण्यासाठी आणि लेआउट अरेंजमेंट निवडण्यासाठी ॲप डेव्हलपर UI डिझाइन Decisions मध्ये देखील सहभाग घेऊ शकतात. 

3) डेव्हलपिंग आणि कोडिंग (Developing and Coding): 

ॲप डेव्हलपरच्या (App Developer)  रोलमध्ये महत्त्वाच्या भागामध्ये कोडिंग आणि प्रोग्रामिंगचा समावेश होतो. ॲप फीचर्स आणि ॲप फंक्शनलिटी नीट ठेवण्यासाठी ॲप डेव्हलपर्स Java, Swift, Kotlin, or JavaScript या लँग्वेजेस वापरतात. ज्यामुळे ॲप क्लीन, नीटपणे चालणारा आणि वापर करण्यास सोपा होऊन जातो.

ते बॅकएंड सर्व्हर- डेटाबेस कंपोनेंट्स निर्माण करू शकतात, क्लायंट-साइड चे लॉजिक समजून घेऊन ॲप मध्ये अप्लाय करू शकतात आणि कस्टमरच्या आवश्यकतेनुसार API किंवा थर्ड पार्टी services एका ठिकाणी लिंक करू शकतात. App नीटपणे चालत राहण्यासाठी ॲप डेव्हलपर कोडचा रिव्ह्यू, प्रॉब्लेम समजून घेऊन आणि ॲप ची फंक्शनलिटी वाढवून काम करत असतात. 

4) टेस्टिंग आणि डीबगिंग (Testing and Debugging): 

ॲप डेव्हलपर्स (App Developer) संपूर्ण ॲप डेव्हलपमेंट प्रोसेस दरम्यान मोबाइल App कंपोनंटची फंक्शनालिटी, वापर आणि परफॉर्मन्स तपासण्यासाठी जबाबदार असतात. ते दोष, त्रुटी किंवा विसंगती (fix bugs, glitches, or inconsistencies)ओळखण्यासाठी आणि Resolve करण्यासाठी युनिट टेस्ट, इंटिग्रेशन टेस्ट आणि यूजर एक्सेप्टन्स टेस्ट घेतात.

युजरचे एक्स्पेक्टेशन्स ना आणि क्वालिटीच्या स्टॅंडर्ड ना जुळून घेण्यासाठी ॲप डेव्हलपर्स कॉलिटी टेस्टर सोबत सुद्धा काम करतात.

5) उपयोजन आणि देखभाल (Deployment and Maintenance): 

एकदा ॲप डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यावर, ॲप डेव्हलपर (App Developer) ॲप स्टोअर किंवा डिस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्मवर ॲप रिलीझ करण्यासाठी डिप्लॉयमेंट प्रोसेस वर लक्ष देतात. ते डिप्लॉयमेंट एन्व्हायरमेंट, पॅकेज ॲप फाइल्स कॉन्फिगर करू शकतात आणि रिव्ह्यू करण्यासाठी आणि अप्रूव्हल साठी ॲप बिल्ड सबमिट करू शकतात.

ॲप लाँच केल्यानंतर, ॲप डेव्हलपर (App Developer) ॲप फंक्शनालिटीचे निरीक्षण करतात, वापरकर्त्याचा फीडबॅक गोळा करतात आणि मेन्टेनन्स आणि सपोर्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणत्याही समस्या किंवा प्रॉब्लेम चे निराकरण (Resolve) करतात.

ॲप डेवलपरच्या स्किल्स (App Developer Skills)

आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

वेब डेव्हलपर बनण्यासाठी पुढील  स्किल्स साधारणपणे असायला हवेत-

प्रोग्रॅमिंग मध्ये प्रवीणता (Programming Proficiency): 

हा ॲप डेव्हलपमेंटचा पाया आहे आणि डेव्हलपरना ते ज्या प्लॅटफॉर्मसाठी ॲप डेव्हलप करत आहेत त्यासाठी किमान एका प्रोग्रामिंग लैंग्वेज मध्ये सरस असणे आवश्यक आहे. लोकप्रिय लँग्वेजेस मध्ये Android साठी Java/Kotlin, iOS साठी Swift/Objective-C आणि क्रॉस-प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट साठी React Native/Flutter यांचा समावेश आहे. 

प्लॅटफॉर्म-विशिष्ट कौशल्ये (Platform-Specific Skills):

नॉर्मल प्रोग्रामिंग ज्ञानाव्यतिरिक्त, डेव्हलपर्सना मध्ये ते करत असलेल्या विशिष्ट प्लॅटफॉर्मची देखील मजबूत समज असणे आवश्यक आहे (Android, iOS, इ.). या प्लॅटफॉर्म मध्ये SDK (Software Development Kit) आणि एपीआय (Application Programming Interface) चे ज्ञान समाविष्ट असणे गरजेचे असते. 

UI/UX डिझाइन तत्त्वे (UI/UX Design Principles): 

काही ॲप्समध्ये साधे इंटरफेस असू शकतात, परंतु बहुतेक यशस्वी ॲप्स युजरसाठी अनुकूल आणि इंटरनल डिझाइनला प्राधान्य देतात. डेव्हलपर नी केवळ फंक्शनली स्ट्रॉंग नसून ते Apps वापरण्यास आनंददायक तयार करण्यासाठी मुख्य UI/UX डिझाइन तत्त्वे समजून घेतली पाहिजेत. 

डेटाबेस कौशल्य (Database Expertise): 

अनेक ॲप्स डेटा स्टोरिंग आणि मॅनेजिंग करण्यावर अवलंबून असतात. डेटा स्टोरेज आणि पुनर्प्राप्ती (retrieval) कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी डेव्हलपर्स SQL किंवा NoSQL सारख्या डेटाबेस टेक्नॉलॉजी सोबत परिचित असले पाहिजेत. 

सुरक्षितता सर्वोत्तम पद्धती (Security Best Practices): 

मोबाइल सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. डेव्हलपर्स यूजर चा डेटा संरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या ॲप्समधील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी Security पद्धतींशी परिचित असले पाहिजेत.

ऍप्लिकेशन डेवलपर कुठे काम करतात? (Where Do App Developers Work)

आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

ॲप डेव्हलपरकडे (App Developer) निवडण्यासाठी विविध प्रकारचे कामाची ठिकाणी आहेत. खाली काही सामान्य ठिकाणे आहेत जिथे ॲप डेव्हलपर काम करतात:

टेक कंपन्या (Tech Companies): अनेक टेक स्टार्टअप्स आणि मोठ्या कंपन्या त्यांची मुख्य उत्पादने किंवा अंतर्गत साधने तयार करण्यासाठी ॲप डेव्हलपरची नियुक्ती करतात. या Amazon, Flipkart,Zomato नावांपासून ते विशिष्ट एप्लीकेशन वर काम करणाऱ्या छोट्या कंपन्यांपर्यंत असू शकतात. 

खाजगी व्यवसाय (Private Businesses): अनेक व्यवसायांना त्यांचे काम सुव्यवस्थित करण्यासाठी किंवा कस्टमर सेवा सुधारण्यासाठी अनुकूल एप्लीकेशन ची आवश्यकता असते. ते त्यांच्या IT टीमचा भाग म्हणून किंवा कॉन्ट्रॅक्ट च्या आधारावर ॲप डेव्हलपरची नियुक्ती करू शकतात. 

ना-नफा आणि स्वयंसेवी संस्था (Non-Profits and NGOs): ना-नफा संस्थांना देखील त्यांना लागणाऱ्या एप्लीकेशन चा शोधात असतात. निधी उभारणी (fundraising), शिक्षण किंवा कम्युनिकेशन प्रोसेस साठी ॲप्स तयार करण्याच्या कामात ॲप डेव्हलपर चा मोठा सहभाग असतो . 

हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्स (Healthcare Organizations): हेल्थकेअर क्षेत्र टेक्नॉलॉजी वर अधिकाधिक अवलंबून आहे आणि रुग्ण पोर्टलपासून वैद्यकीय डेटा एनालिसिस पर्यंत सर्व गोष्टींसाठी ॲप डेव्हलपर App तयार करू शकतात. 

फ्रीलान्स (Freelance): उत्तम कौशल्य असलेले ॲप डेव्हलपर (App Developer) फ्रीलान्स करणे निवडू शकतात (Own Start-up), त्यांच्या सेवा वेगवेगळ्या क्लायंटला प्रोजेक्ट-दर-प्रोजेक्ट आधारावर कॉन्ट्रॅक्ट बनवू शकतात. हे त्यांच्या कामात लवचिकता (Flexibiltiy) आणि विविधता आणण्यास अनुमती देते.

ॲप डेवलपर कसे व्हावे? (How to become a App Developer)

आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi

अनेक मार्ग ॲप डेव्हलपमेंटमध्ये करिअर घडवू शकतात. ॲप डेव्हलपर(App Developer) होण्यासाठी तुम्ही खालील Steps घेऊ शकता: 

1) पदवीचा विचार करा (Consider a Degree) –

ॲप डेव्हलपरना (App Developer) नेहमी महाविद्यालयीन पदवी आवश्यक नसते, परंतु संबंधित पदवी मिळवणे—जसे की सॉफ्टवेअर इंजीनियरिंग, वेब डेव्हलपमेंट किंवा कॉम्प्युटर सायन्स मधील डिग्री— फंडामेंटल वेब डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंग संकल्पनांसाठी एक संरचित, सर्वसमावेशक पाया पुरवू शकते. संबंधित पदवी प्रोग्राम मध्ये विशेषत: प्रोग्रामिंग लैंग्वेज, कम्प्युटर सिस्टम, इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड टूल्स आणि ट्रेंड समाविष्ट असतात.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि संबंधित डिग्री प्रोग्राममध्ये सामान्यतः खालील विषय समाविष्ट असतात:

  • प्रोग्रामिंग भाषा, जसे की Python, Java, C++, C#
  • डेटाबेस सिस्टम्स (Database systems)
  • ऑपरेटिंग सिस्टम (Operating systems)
  • नेटवर्क सिस्टम्स (Network systems)
  • मोबाइल प्रोग्रामिंग (Mobile programming)
  • वेब एप्लीकेशन डेव्हलपमेंट (Web application development)
  • क्लाउड कॉम्प्युटिंग (Cloud computing)
  • डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम (Data structures and algorithms)

2) कोडिंग भाषा शिका (Learn Coding Languages)-

कोडिंग भाषा कोणत्याही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा पाया बनवतात. डेव्हलपर एप्लीकेशन तयार करण्यासाठी, डीबग करण्यासाठी आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी, अपडेट्स करण्यासाठी आणि नवीन वैशिष्ट्ये लागू करण्यासाठी कोडिंग कौशल्ये वापरतात. फ्रेशर साठी शिकण्यासाठी काही सर्वोत्तम प्रोग्रामिंग भाषांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • HTML
  • CSS
  • Python
  • Java
  • JavaScript
  • Ruby

Swift, Kotlin, Objective-C and C/C++ सारख्या भाषांमध्ये कोड कसे करावे हे जाणून घेणे iOS आणि अँड्रॉइड ऍप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. HTML, CSS आणि JavaScript चे ज्ञान डेस्कटॉप आणि मोबाईल उपकरणांवर चालणारे वेब ऍप्लिकेशन विकसित करण्यासाठी आवश्यक आहे.

3) संबंधित कामाचा अनुभव मिळवा (Gain Relevant Work Experience):

कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये प्रॅक्टिकल, प्रत्यक्ष अनुभव मिळवणे महत्त्वाकांक्षी ॲप डेव्हलपरसाठी आवश्यक आहे. कंपनीमधील नियोक्ते संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांना महत्त्व देतात, जे इंटर्नशिप्स, कोडिंग बूटकॅम्प्स आणि प्रोग्रामिंग भाषा आणि साधनांमध्ये प्राविण्य दर्शविणारे वैयक्तिक प्रोजेक्ट मधून येऊ शकतात.

ॲप डेव्हलपर ची सॅलरी (App Developer Salary)

भारतातील सरासरी iOS ॲप्लिकेशन डेव्हलपरला स्विफ्ट आणि ऑब्जेक्टिव्ह-सी मधील अनुभव पातळी आणि कौशल्य पातळीच्या आधारावर महिन्याला 20,000 ते 2,00,000 रुपये उत्पन्न मिळत आहे.

iOS डेव्हलपर बनणे ही कोणत्याही फ्रेशर्ससाठी त्याची कारकीर्द सुरू करण्याची आणि त्याला चांगल्या प्रकारे आकार देण्याची एक चांगली संधी आहे, कारण iOS विकसकांना नेहमीच मागणी असते आणि 1 किंवा अधिक वर्षांचा अनुभव मिळाल्यानंतर चांगल्या संधी मिळतात.

ॲप डेव्हलपमेंट कोर्सेस (App Development Courses)

ॲप डेव्हलपमेंट शिकणे हा एक रोमांचक आणि फायद्याचा अनुभव असू शकतो. ऑनलाइन अनेक फ्री कोर्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला कोडिंगच्या बेसिक गोष्टी आणि तुमचे स्वतःचे ॲप्स कसे तयार करायचे हे शिकवू शकतात. तुम्हाला प्रारंभ करण्यासाठी येथे काही लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत: 

1. The Odin Project

मोफत, पूर्ण-स्टॅक वेब डेव्हलपमेंट (Web Development) कोर्स ऑफर करतो ज्यामध्ये मोबाइल ॲप डेव्हलपमेंटचे धडे समाविष्ट आहेत. 

Link: https://www.theodinproject.com/ 

2. FreeCodeCamp

एक फ्री वेब डेव्हलपमेंट कोर्स ऑफर करतो ज्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह वेब ॲप्लिकेशन्स (RWAs) तयार करण्यावरील धडे समाविष्ट आहेत. RWAs हा एक प्रकारचा वेब आपलिकेशन आहे ज्याचा वापर ॲप सारखा अनुभव तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Link: https://www.freecodecamp.org/news/tag/mobile-app-development/ 

3. MIT OpenCourseware

ॲप डेव्हलपमेंटवरील काही कोर्सेससह MIT अभ्यासक्रमांच्या विविध सामग्रीमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करते. 

Link: https://ocw.mit.edu/
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment