Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी ४ लेखन शैलींचा वापर करा

सामान्यत: आपण जे लेखन करतो मग त्यामध्येही बरेच प्रकार असतात. The University of Rhode Island च्या एक लेखानुसार जगात ४ प्रकारचे लेखन (Writing Skills) आढळते. 

१) Persuasive-मन वळवणारे:

शक्यतो ह्या प्रकारच्या लेखनामद्धे लेखक एखाद्या विशिष्ट स्थितीची किंवा युक्तिवादाची(Argument) वैधता(validity) वाचकाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. 

उदाहरणार्थ; शिफारसपत्रे(Letter Of Recommendations),आवरण पत्र(Cover Letters),संपादकीय वृत्तपत्र लेख(Editorial), शैक्षणिक पेपरसाठी युक्तिवादात्मक निबंध(argumentative)

1) पुस्तकात: अ पीपल्स हिस्ट्री ऑफ द युनायटेड स्टेट्स, हॉवर्ड झिन द्वारा लिखित. हा युक्तिवादाचा मजकूर असे स्पष्ट करतो की United States ची जी कथा लोकांना केवळ त्याच्या संस्थापक व राष्ट्रपतींमुळे माहीत आहे ती त्यांच्या पुरती मर्यादित नसून कामगार वर्ग, विविध वर्णनाचे लोक, इतर उपेक्षित गट ज्यांनी न्याय आणि समानतेसाठी लढा दिला आहे त्या सर्वांची आहे.

२) न्यूजपेपर: Editorial: The Need for Universal Basic Income in India (The Hindu): हे एडिटोरियल असा युक्तिवाद समोर घेऊन येते की सर्व नागरिकांना मूलभूत उत्पन्न प्रदान केल्याने गरिबी दूर होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

२) Narrative-कथात्मक:

वर्णनात्मक लेखन म्हणजे कथा सांगणे.यामध्ये आपण स्वत: काल्पनिक गोष्टी तयार करून महत्वाच्या सामाजिक मुद्द्यावर वार करू शकतो.अथवा जीवनात वास्तवात घडलेल्या गोष्टी देखील सांगू शकतो.

तुम्हाला माहीत आहे?- Malgudi Days, R.K. Narayan यांची प्रसिद्ध कादंबरी ,रवींद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”,अरविंद अडिगा लिखित “द व्हाईट टायगर” यांसारख्या प्रसिद्ध कथा या Narrative ह्या लेखन स्टाइल मध्ये मोडतात.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

३) Expository-विवरनात्मक:

एक्सपोझिटरी किंवा विवरणात्मक ही एक अशी लेखनशैली आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट माहिती देणे,व पुरव्यासाहित ती स्पष्ट करणे आहे. त्या लेखनात लेखक दाव्यांचे समर्थन करण्यासाठी तथ्ये, पुरावे आणि डेटाचा वापर करतात. उदाहरणे: कसे करायचे/How-To, यांसारखे लेख, पाठ्यपुस्तके, बातम्या (Editorials किंवा Op-Eds नाही) , तांत्रिक किंवा वैज्ञानिक लेखन. तर येथे आपल्या ह्या पूर्ण लेखाचा गाभा आहे. म्हणजेच टेक्निकल रायटींग ही विवरणात्मक ह्या कॅटेगरी मध्ये येते.

उदाहरणार्थ;

  1. ” जीवशास्त्र/Biology: हायस्कूल जीवशास्त्र पाठ्यपुस्तक: हे पाठ्यपुस्तक विविध जैविक प्रणाली, अवयवांची कार्ये आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती स्पष्ट आणि संघटित पद्धतीने सादर करते.

  2. “Scientists Discover a New Planet in a Nearby Solar System” (सायन्स न्यूज वेबसाइट वरुन घेतलेला संदर्भ): ही बातमी नवीन ग्रहाच्या शोधाबद्दल अहवाल देते, त्याचा आकार, स्थान आणि शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींबद्दल तपशील प्रदान करते.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

४) Descriptive-वर्णनात्मक:

साध्या भाषेत सांगायच झालं तर शब्दांचा वापर करून चित्र तयार करणे. कथा जिवंत करण्यासाठी या प्रकारचे लेखन आपल्या संवेदनांचा – दृष्टी, स्पर्श, गंध, श्रवण आणि अगदी चव यांचा वापर करते. जणू तुम्ही एखादा चित्रपट बघत आहात. जणू लेखकांना तुम्ही त्या कथेचा भाग आहात असे जाणवून द्यायचे असते.

तुम्हाला माहीत आहे? – J.k.Rowling यांचे हॅरी पॉटर सारखे वर्णनात्मक लेखन ह्याच विभागात मोडते. रोलिंग त्यांच्या शब्दांसह ज्वलंत चित्रे रंगवते, ज्यामुळे वाचकांना हॉगवॉर्ट्सच्या जादुई जगाची, डायगन ॲलीच्या गजबजलेल्या रस्त्यांची आणि चित्तथरारक क्विडिच सामन्यांची कल्पना करता येते. वर्ण, प्राणी आणि जादूचे वर्णन देखील कथेत खोलवर भर घालतात.

तथापि, हॅरी पॉटर पूर्णपणे वर्णनात्मक नाही: तर ही कथांची मालिका इतर लेखन शैलीचा देखील पुरेपूर वापर करते. यामध्ये Narrative,Expository,Dialogue या सर्व मिक्स शैलींचा उपयोग झाला आहे.

Narrative/कथा: हे स्पष्ट कथानक, पात्रे, कथेची रचना आणि संघर्ष व्यक्त करते.
Dialogue/संवाद: पात्रांमधील संभाषणे कथानकाला पुढे नेतात आणि व्यक्तिमत्त्वे प्रत्यक्षात उभी करतात.
Expository/एक्सपोझिटरी: मालिका जादूचे नियम, जादूगार जगाचा इतिहास आणि जादू आणि औषधांचे तपशील स्पष्ट करते.
त्यामुळे, हॅरी पॉटरच्या यशात वर्णनात्मक लेखन हा मुख्य घटक आहे, परंतु एक समृद्ध आणि आकर्षक कथा तयार करण्यासाठी ते इतर शैलींसह मिश्रित आहे.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

मराठीतले माझे लेखन कौशल्ये मी कसे सुधारू?How to improve writing skills in marathi

लेखनाचा उपयोग प्रत्येकवेळी होतो, आणि त्यात जर तुम्ही लेखन शैलींचा वापर केलात तर त्या तुम्हाला दहावी ची बोर्ड परीक्षा असो किंवा UPSC च्या परीक्षेत मराठी एक ऑप्शनल विषय म्हणून घेतलेला असू. 

आपण ह्या मराठी लेखन कौशल्य  सुधारण्याच्या गोष्टीला चार विभागात वाटू! 

१. एक जर तुम्हाला लेखक व्हायची आवड असेल किंवा एक विशिष्ट शैलीतून दुसऱ्या शैलीत लिहावे वाटत असेल तर. 

२. १० वि च्या बोर्डमध्ये मराठी विषय असेल तर?

३. UPSC मध्ये मराठी हा विषय ऑप्शनल असेल तर?

वरील तीनही मुद्यांमद्धे उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर खालील गोष्टी न चुकता शिका. व प्रॅक्टिस करा

१. तुमची कल्पनाशक्ती मजबूत हवी– कल्पनाशक्ती मजबूत बोलण्याचे कारण म्हणजे. तुम्ही कोणतीही शैली बघा. मन वळवणारी, कथात्मक, विवरणात्मक,वर्णनात्मक प्रत्येक वेळी तुम्हाला कल्पनेचा आधार घेऊन लेखन करावे लागत आहे. जे के रोलिंग यांचे उदाहरण बघितले तर प्रत्येक टप्यात कल्पना करून त्यांनी जगत विख्यात हॅरी पॉटर अशी कादंबरी लिहिली. ते मजबूत करण्यासाठी तशी पुस्तके वाचा, चित्रपट बघा, लेख वाचा, क्रिएटिव लोकांशी बोला, ऑनलाइन असे मित्र बनवा जे तुम्हाला वेगवेगळे अनुभव सांगतील. ज्यातून तुम्ही तुमची चित्रे रंगवाल.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

2.खूप वाचन करा: तुमच्या वाचनाला मर्यादित ठेवू नका. Stephen King अमेरिकेतील नावाजलेले लेखक ज्यांनी रहस्य (suspense), गुन्हे(Crime), विज्ञान-कथा(science-fiction), कल्पनारम्य आणि रहस्य(fantasy and mystery) या विभागात खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे एक Quote आहे”जर तुम्हाला लेखक व्हायचे असेल तर तुम्ही इतर सर्वांपेक्षा ह्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत: भरपूर वाचा आणि भरपूर लिहा”

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

३. लेखनात स्पष्टपणा,योग्य व्याकरण: तुम्ही तुमच्या लेखनात व्याकरणातील चुका टाळायला हव्यात. जर पायाच मजबूत नसेल तर घर कोसळून पडणारच! तसेच योग्य व्याकरण हे तुमच्या लेखनासाठी फ्रेमवर्क म्हणून काम करते. ज्या व्याकरणामुळे तुमच्या लेखनाला अर्थ मिळून ती समोरच्या पर्यंत स्पष्टपणे पोहचतात. 

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

४. शब्दसंग्रह निर्माण करा: मराठी वर्तमानपत्रे, मासिके किंवा कादंबऱ्या वाचून तुमचा मराठी शब्दसंग्रह वाढवा. दररोज नवनवीन शब्द शिका आणि ते तुमच्या लेखनात वापरण्याचा सराव जरूर करा.अशा ॲप्सचा वापर करा जे तुमच्या बुद्धीत नवीन आणि अनोख्या शब्दांची भर घालेल. उदा; Learn Easily यूट्यूब चॅनल, मराठी डिक्शनरी, यांचा वापर करा.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

५. नियमित लिहा: बऱ्याचदा प्रॅक्टिस नेच अर्ध्या गोष्टी मिळून जातात. लिखाण केल्यानेच लिखानातली चूक कळू शकते. मराठी जर्नल किंवा ब्लॉग लिहायची सवय ठेवा. तुमच्या आवडीच्या विषयांवर लघुकथा, कविता किंवा निबंध लिहा. तुम्ही जितके जास्त लिहाल तितके तुम्ही अधिक आत्मविश्वासी व्हाल.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

लिखाण करताना ह्या गोष्टी ठेवा लक्षात:

Do/करा:

१) तुमचे लेखन अधिक थेट आणि प्रभावी बनवण्यासाठी तुम्ही काय व कसे बोलाल याची योजना करा.

२) शब्द जपून वापरा आणि वाक्ये लहान ठेवा आणि मुद्द्याला धरून लिहा.

३) लोक कन्फ्युज होणार असतील तर “फॅन्सी” शब्द टाळा. त्याऐवजी स्पष्टतेसाठी प्रयत्न करा.

४)तुम्हाला नुसत लिहायच नाही आहे तुम्हाला उत्तम लिहायच आहे अस स्वतच्या मनाशी घट्ट करा.

Don’t/करू नका:

१) तुमचं लिखाण झाल्यावर लगेच प्रसिद्ध करू नका. दोन-तीन वेळा वाचून खातर जमा करा. 

२) तुम्ही सुरवातीला लिहिलेलाच ड्राफ्ट योग्य होता असे स्वताला भासवू नका. 

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment