तुम्हालाही कॅप्टन दीक्षा सारखे Special Forces जॉईन करायच्या आहेत का? जाणून घ्या काय करायचे ते!

आज अनेक तरुण-तरुणी भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहतात. त्यात जर तुम्हाला Special Forces (विशेष दलं) मध्ये जाण्याची इच्छा असेल, तर कॅप्टन दीक्षा यांच्यासारखी प्रेरणा कुठून मिळणार नाही.

त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना Balidaan Badge मिळालं — जे फक्त सर्वात कडक ट्रेनिंग आणि सेवा पूर्ण केल्यावरच दिलं जातं.

जर तुम्हालाही असं काहीतरी करायचं असेल, तर खाली दिलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं वाचाच — तुमच्या मार्गदर्शनासाठी खास!

Special Forces जॉइन करण्यासाठी काय करावे लागते, जाणून घ्या खालील उत्तराद्वारे
Image Source: Google

प्रश्न 1: Special Forces जॉईन करण्यासाठी Qualification काय लागते?

Special Forces मध्ये जाण्यासाठी प्रथम Indian Army, Navy किंवा Air Force मध्ये अधिकारी म्हणून निवड होणं आवश्यक आहे. म्हणजेच, किमान:

  • 10+2 (HSC) पास असणं आवश्यक

  • नंतर NDA (National Defence Academy) किंवा CDS (Combined Defence Services) सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून सैन्यात अधिकारी म्हणून भरती होणं गरजेचं आहे.

प्रश्न 2: कोणत्या Exam ची तयारी लागते?

तुम्ही Army officer बनण्यासाठी खालील परीक्षा देऊ शकता:

  • NDA Exam (आधी फक्त मुलांसाठी होती 2021 पासून मुलींसाठी देखील सुरू करण्यात आली आहे, 12वीनंतर)

  • CDS Exam (Graduation नंतर, मुलं आणि मुली दोघांसाठी)

  • Technical Entry Scheme (TES) – 12वीत PCM घेतलेल्यांसाठी

  • SSC (Short Service Commission) – मुलींसाठी विशेष प्रवेश

या एक्झॅम्सद्वारे तुम्ही सैन्यात अधिकारी म्हणून निवड होऊ शकता. त्यानंतरच Special Forces मध्ये जाण्याचा पर्याय खुला होतो.

प्रश्न 3: Special Forces साठी खास Exam असते का?

Special Forces साठी कोणतीही वेगळी exam नसते, परंतु सैन्यात अधिकारी म्हणून निवड झाल्यावर तुम्ही स्वतःची निवड Commando Unit किंवा Special Forces साठी करू शकता.

उदाहरणार्थ:

  • Para (SF) साठी अर्ज करणं

  • त्यानंतर होणाऱ्या अत्यंत कठीण Selection Process आणि Training मध्ये यश मिळवणं

हे ट्रेनिंग शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर खूप कठीण असतं. फक्त 10 टक्के उमेदवारच हे पूर्ण करू शकतात.

प्रश्न 4: मुली Special Forces मध्ये जॉईन करू शकतात का?

 होय! आधीपर्यंत ही क्षेत्र फक्त पुरुषांसाठी मर्यादित होती, पण आता Major Deeksha यांनी Special Forces मध्ये प्रवेश करून नवीन इतिहास घडवला आहे. ह्या बदलामुळे मुलींसाठीही दरवाजे उघडले आहेत.

मुली SSC मधून अधिकारी होऊ शकतात आणि त्यानंतर जर त्यांचं शारीरिक व मानसिक बळ अत्यंत सक्षम असेल, तर त्या पण Special Forces मध्ये जायला पात्र ठरू शकतात.

प्रश्न 5: भविष्यात Special Forces मध्ये करिअर कसं असू शकतं?

Special Forces मध्ये करिअर खूप आव्हानात्मक आणि सन्माननीय असतं. हे क्षेत्र केवळ देशासाठी बलिदान देण्याची तयारी असलेल्या व्यक्तींना शोभतं. तुमचं भविष्यातील करिअर इथे पुढीलप्रमाणे घडू शकतं:

  • Combat Operations (सीमेवर खास मिशन्स)

  • Anti-Terror Operations

  • Intelligence Gathering

  • International Assignments (UN Peace Missions)

  • उच्च पदांवर प्रमोशन – Lieutenant ते Colonel पर्यंत

निष्कर्ष:

Special Forces मध्ये प्रवेश मिळवणं सोपं नाही, पण अशक्यही नाही. जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल, शरीर आणि मन दोन्ही तयार असेल, तर तुम्ही सुद्धा कॅप्टन दीक्षा यांच्यासारखे इतिहास घडवू शकता.

देशसेवा हे सर्वोच्च उद्दिष्ट असलं पाहिजे. बाकी गोष्टी शिका, तयारी करा आणि तुमचा मार्ग स्वतः घडवा!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment