2024-25 या आर्थिक वर्षात टॉप कंपन्यांमध्ये 1.25 लाख इंटर्नशिप संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा (PM Internship Scheme 2024) पायलट टप्पा (नवीन कल्पना तपासण्यासाठी केलेला प्रयोग) गुरुवारी (03/10/2024) सुरू केला.एकदा ते लाईव्ह झाल्यानंतर, ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अर्जदार ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. योजनेसाठी नोंदणी 12 ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि 25 ऑक्टोबर 2024 रोजी बंद होईल.
Table of Contents
Toggleपात्रता निकष (Eligibility criteria)
योजनेसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी खालील निकष पूर्ण केले पाहिजेत:
1. वयोमर्यादा: 21 ते 24 वर्षे
2. इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हायस्कूल, उच्च माध्यमिक शाळा उत्तीर्ण असले पाहिजेत, ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा धारण केलेला असावा किंवा BA, BSC, BCOM सारख्या पदवी असलेले पदवीधर असावेत. BCA, BBA, B.Pharma, इ.
2. पूर्णवेळ नोकरीत गुंतलेले नसावे
3. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील व्यक्ती पात्र नाहीत
4. IITs, IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील पदवीधर किंवा CA किंवा CMA सारख्या पात्रता असलेल्यांना वगळण्यात आले आहे
5. ही योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि कौशल केंद्रे (skill centers) येथे प्रशिक्षित (trained) तरुणांसाठीही खुली आहे.
स्टायपेंड (Stipend offered)
निवडलेल्या सहभागींना सरकारकडून दर महिना 4,500 Rs. स्टायपेंड मिळेल.
त्यासोबतच या प्रोग्राम मधील कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांचा भाग म्हणून 500 Rs. प्रदान केले आहेत.
मासिक स्टायपेंड व्यतिरिक्त, आनुषंगिक खर्च (incidental expenses) भरण्यासाठी अर्जदारांना INR 6,000 चे एकवेळ आर्थिक सहाय्य मिळेल.
PM जीवन ज्योती विमा योजना आणि PM सुरक्षा विमा योजना यांसारख्या प्रोग्रामअंतर्गत इंटर्नचा विमा उतरवून देण्यात येईल आणि प्रीमियम खर्च सरकार कव्हर करेल.
नोंदणी कशी करावी? (How to register)
1. PM इंटर्नशिप योजनेच्या (PM internship scheme 2024) ऑफिशियल वेबसाइट pminternship.mca.gov.in ला भेट द्या.
2. रजिस्टर लिंकवर क्लिक करा मग एक नवीन पेज उघडेल.
4. रजिस्ट्रेशन डिटेल्स भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
4. उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पोर्टलद्वारे बायोडाटा तयार केला जाईल.
5. प्राधान्ये (Priorities)- स्थान (Location), क्षेत्र, कार्यात्मक भूमिका (Functional Role)आणि पात्रता (Eligibility) यावर आधारित 5 पर्यंत इंटर्नशिप संधींसाठी अर्ज करा.
6. वरील गोष्टी पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
7. पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी स्वतःजवळ ठेवा.
उमेदवार कसे निवडले जातील? (Candidates' shortlisting process)
1. शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया उमेदवारांची प्राधान्ये (candidates’ preferences) आणि कंपन्यांनी पोस्ट केलेल्या आवश्यकतांवर आधारित असेल.
2. शॉर्टलिस्टिंग प्रक्रियेत, कमी रोजगारक्षमतेला (lower employability) प्राधान्य देणारे आणि अर्जदारांमधील व्यापक प्रतिनिधित्व असणारे (ऑफिशियल पद्धतीने बोलणारे, कृती करणारे किंवा स्वतःला प्रेझेंट करणारे) निकष विचारात घेतले जातील.
3. पोर्टल अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच अपंग व्यक्ती यांसारख्या लोकसंख्येच्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी टूल्सचा वापर करेल.
4. प्रत्येक इंटर्नशिपसाठी ऑफर्सच्या संख्येवर अवलंबून, उमेदवारांच्या रेझ्युमेसह, अंदाजे दोनदा/तीनदा नावे कंपनीकडे निवडीसाठी पाठवली जातील.
5. कंपन्या उमेदवारांची निवड करू शकतील आणि त्यांच्या संबंधित निवड निकष आणि प्रक्रियांवर आधारित इंटर्नशिप ऑफर करू शकतील
6. एकदा कंपनीने उमेदवाराला ऑफर पाठवली की, उमेदवार वेबसाईट/पोर्टलद्वारे स्वीकृती (acceptance) कळवण्यास सक्षम असेल.
7. प्राधान्यकृत क्षेत्रांसाठी (preferred sectors), कार्यात्मक भूमिका (functional roles), स्थाने (locations) आणि इतर निकषांसाठी- उमेदवार स्थान (राज्य, जिल्हा), क्षेत्र, कार्यात्मक भूमिका आणि पात्रता यासह त्यांच्या प्राधान्यांवर आधारित पाच (5) इंटर्नशिप संधींसाठी अर्ज करू शकतात.
कॉर्पोरेट कंपनीचा सहभाग (Corporate co-ordination)
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कंपन्यांची निवड गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या CSR खर्चाच्या आधारे करण्यात आली आहे. निवडल्या गेलेल्या कंपनी व्यतिरिक्त ऐच्छिक असलेल्या अतिरिक्त कंपन्या, बँका आणि वित्तीय संस्था कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (MCA) मंजुरीनंतर योजनेत सामील होऊ शकतात.
इन-हाऊस इंटर्नशिप प्रदान करण्यास असमर्थ असलेल्या कंपन्यांना संधी निर्माण करण्यासाठी पुरवठादार, ग्राहक किंवा त्यांच्या मूल्य साखळीतील इतर भागीदारांसह सहयोग करण्याची परवानगी आहे.
इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी चालेल, जवळजवळ अर्धा प्रोग्राम हँड्स-ऑन कामाच्या अनुभवासाठी असेल. ज्यामुळे तुम्ही जगातील इंडस्ट्री मध्ये काम करण्यासाठी इंडस्ट्रियल स्किल्ससोबत तयार असाल. ह्या इंटर्नशिप मागचा हेतू हा सहभागींना व्यवहारिक नोकरीच्या स्किल्सह सुसज्ज करण्यासाठीचा आहे.
बहुतेक स्टायपेंड सरकार प्रदान करेल त्यासोबत कंपन्या त्यांच्या CSR निधीतून काही भाग देऊन योगदान देतील.