सावित्रीबाई फुले जयंती 2026 : शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करावे, दुष्काळात अन्नान्न करून तडफडणाऱ्या हजारो जिवांच्या मुखांत घास भरवावा, शेतकरी सामाजिक सुधारणांसाठी वाङ्मयाचे साधन हाती घेऊन कवयित्री आणि लेखिका बनावे, सर्व गाव, सर्व समाज सुशिक्षित, सुसंस्कृत करण्याचे, जनावरांप्रमाणे जिणे जगणाऱ्या स्त्री-शूद्रांना माणसात आणण्याचे वेड घ्यावे, पतीच्या निधनानंतरही शोक करीत न बसता सत्यशोधक समाजाच्या तत्त्वप्रसाराचे कार्य करण्याचे सतीचे वाण घेऊन अविश्रांत काम करावे,दीनदलितांसाठी, दीनदलितांच्या मुलांसाठी रोगांच्या साथीत दिवसा-रात्री घराबाहेर धावावे, त्यांची सेवा करावी, प्लेगच्या साथीत दत्तकपुत्र यशवंतराव फुले यांना कडेवर घेऊन प्लेगने त्रस्त असल्यामुळे रुग्णालयात आणले. आजारपणाने स्वताला खिळले आहे याची जाणीव होऊन सुद्धा सावित्रीबाई रुग्णांना मदत करत राहिल्या, व प्रक्रियेत अनंतासाठी विलीन झाल्या. अशा व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केवळ अलौकिक म्हणून केले जाऊ शकते.
‘बारा बलुती बारा अलुती कितीक जाती जमाती
शिवारात या सुखे नांदती
पाऊसपाणी छान पडतसे येती पिके सारी
विहिरीवर फळेफुले गोजिरी
गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपांखरे
ऐसा निसर्ग तिथे वावरे’’
