यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग।
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग॥
ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग।
त्यो तव तेज निहारके तखत त्यजो औरंग॥
Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या सुख, दुःखात तसेच इतकेच काय तर मरणात सुद्धा सोबत असलेले त्यांचे जिवलग मित्र कवी कलश यांचे (मोठमोठ्या संकटांसमोर न डगमगता उभे असणाऱ्या व स्वराज्याच्या मातीसाठी आणि रयतेसाठी स्वतःच्या मरणालाही न घाबरता एखाद्या वाघाप्रमाणे झुंज देणाऱ्या महाराजांचे वर्णन करणारे) हे शब्द. ज्यामध्ये असे लिहिले आहे की –
संभाजी (महाराज) यांना इस्लामी रावणाच्या (म्हणजे औरंगजेबाच्या) दरबारात हनुमानाप्रमाणे बांधले आहे. महाराजांनी केलेल्या महान युद्धातील जखमा आणि रक्तामुळे लाल दिसत आहेत. ज्या प्रकारे एखादी छोटीशी शेकोटी सूर्याचा उदय झाल्यानंतर स्वतःची चमक गमावते, तसे तुमचा तेजस्वीपणा पाहून दिल्लीच्या भल्या मोठ्या सैन्याच्या औरंगजेबाने (त्याची चमकही गमावली आहे) आपला फेक सोडला आहे.
अशा या वर्णन केलेल्या शब्दांवरून मरणासही न घाबरलेल्या रयतेच्या राजावर अनेक आरोप केले गेले, राजकारण झालं, इतिहासातून त्यांचे अस्तित्व मिटवण्यासाठी वाईट प्रयत्न केले गेले. पण ‘बादशहाच्या हातावर तुरी’ या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील धड्यातून आपल्या शाळेच्या इतिहासाच्या शिक्षकांनी शिकवलेला इतिहास कोणालाही पुसता येऊ शकणार नाही.
आग्र्यावरून सुटका होताना पिता पुत्र वेगवेगळ्या मार्गाने घरी जाताना “आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली जास्त गरज आहे” हे त्या लहानघ्या नऊ वर्षाच्या मुखातील शब्दांनी रयतेचा दुसऱ्या राजाचे नक्कीच आगमन झाले होते. पण म्हणतात ना ‘ओळखीचा चोर जीवे न सोडली’– ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूंपेक्षा भयंकर असतो. असेच काही जीवाला जीव देणाऱ्या मंत्र्यांसोबत काही बंडखोर मंत्री सुद्धा त्यावेळी सामील होते. त्यावेळच्या एका परकीय प्रवासी जॉन फ्रायर वर्णन केल्यानुसार “मंत्रिमंडळातील काही भाग हा फार लबाड जातीचा आहे” या कटू सत्याला डावलता येणार नाही. पण का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? तर मग उत्तरासाठी पुढे वाचा.
Table of Contents
Toggleसंभाजी राजांचे बालपण(Sambhaji Maharaj Childhood)
14 मे 1957 पुरंदर किल्ल्यावर एका शिवरत्नाचा जन्म झाला. तर या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून महाराणी जिजाबाईंनी त्याचं नामकरण केलं “संभाजी“. बघता बघता संभाजींच्या बाल लिलयेने सर्वजण हरपून गेले. पण नियतीने घात घातला आणि अवघा सव्वा दोन वर्षाचे हे लहान मुल त्याच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांच्या जाण्याने पोरके झाले. डोईवरून मातेचे छत्र हरवले तर पिता शिवाजी राजे पाठीवर मरण बांधून रयतेच्या कल्याणासाठी घोडदौड करत होते. तर अशा वेळी पुन्हा एकदा छत्रपती तयार करण्याची जबाबदारी जिजाऊ माता यांनी स्वतःवर घेतली. तर अशा चालता बोलता विद्यापीठामध्ये संभाजी राजांच बालपण सावरलं गेलं.
संभाजी राजे चालणे बोलणे शिकले, लिहिणे वाचणे शिकले त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कला आणि विद्या मध्ये पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यामधील प्रत्येक गोष्ट ते शिकू लागले. एक नाही दोन नाही तर तब्बल 13 भाषांवर त्यांनी प्रभुत्व गाजवले. मराठी, हिंदी, उर्दू, कानडी, हिब्रु, पाली, पोर्तुगीज, संस्कृत इतकेच नाही तर Henry Oxenden यांनी असे सुद्धा लिहून ठेवले आहे की संभाजी राजांना इंग्रज व्यापारांसोबत व्यवहार करण्यासाठी शिकलेली English भाषा सुद्धा येत होती.
नुसत्या या भाषा येतच नव्हत्या तर संभाजी राजांनी अनेक भाषांमध्ये काव्य ग्रंथ लिहिले राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम्, नायिकाभेद, नखशीखा, काव्यात्मक चर्चा करणारा सातसतक. बुद्धीच्या जोरावर कार्य केलेच त्यासोबतच व्यायामाचे बळ सुद्धा जोपासलेच मल्लखांब, भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी यामध्ये सुद्धा माहीर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा त्यासोबतच एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला त्या योद्धाचे नाव होतं संभाजी.
संभाजी राजांचा राजकारणामध्ये प्रवेश(Sambhaji Maharaj Political Entry)
बघता बघता साडेआठ वर्षे वय झालं संभाजींचं आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झाराजे जयसिंगाचं आगमन झालं आणि शिवरायांना नाईलाजाने तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल केले गेले पण त्याचवेळी तहातील 10 दहा मधील एक अट अशी होती कि शिवरायांचे पुत्र संभाजी मुघलकडे ओलीस (नजरे देखत बंदी बनवणे) म्हणून राहतील. हे ऐकून शिवाजी महाराजांना राग आला, पण तहा मधील अटी डावलने रयतेच्या हितासाठी घातक होते. आणि वयाच्या साडेआठाव्या वर्षी संभाजी राजे मोघलांकडे ओलीस म्हणून राहिले तेव्हाच संभाजी राजांना राजकारण समजू लागले. त्याच सोबत औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी पिता-पुत्रांस मनसबदार म्हणून आग्रा मध्ये हजर राहण्याची अट सुद्धा तहामध्ये घातली गेली होती.
पण याच सोबत शिवरायांना मोठा प्रश्न पडला की कसे न्यावं या वयातील लहान मुलाला आग्रा मध्ये ते सुद्धा एका कटकारस्थानी औरंगजेबाच्या महालामध्ये. पण संभाजींच्या कर्तुत्वावर आणि लहानपणापासून महाराष्ट्रात वाढलेल्या लहानग्यावर त्यांचा पूर्णपणे विश्वास होता त्यामुळेच संभाजी राजांना मुघली दरबाराचा, मुघली रियासतीचा आणि मुघली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता यावा म्हणून शिवरायांनी त्यांना सोबत घेतले.
शिवराय व संभाजी राजे काही मावळ्यांसमवेत औरंगजेबाच्या महालात उपस्थित झाले पण याचवेळी औरंगजेबाने एक अपमान म्हणून शिवाजी राजांना मागच्या रांगेत उभे केले, महाराष्ट्राचा स्वाभिमानी राजा उफाळला भर दरबारात शिवाजीराजांनी औरंगजेबाला फटकाळलं असा अपमान शहेनशा हिंदुस्तान गाझी औरंगजेबाचा कोणी केला नव्हता तो सह्याद्रीच्या नरसिंहाने केला आणि राजे इथून तडख निघाले. त्यामुळे हा अपमान सहन न होऊन शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा औरंगजेबाने कट रचला होता. त्याने शिवरायांना आणि संभाजीराजांसोबत समवेत घेतलेला मावळ्यांना बंदिस्त केले. पण त्या अटकेतून बाहेर निघण्याची योजना अमलात आणणे गरजेचे होतेच. पण त्याच वेळी आग्रहाच्या महालातून अगदी काळजीपूर्वक बाहेर निघताना संभाजी महाराजांना आणि शिवरायांना वेगळ्या वाटेने बाहेर निघणे महत्त्वाचे होते.
पण एकट्या लहानग्या पुत्राला या परिस्थितीमध्ये मागे ठेवून बाहेर पडणे अगदीच कोणत्याही पित्याचा काळीज व्याकुळ करणारा क्षण होता. पण नऊ वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता “आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज जास्त आहे,आपण निर्धास्त पुढे व्हा”. आणि पित्याला कळून चुकले की संभाजी राजे जाणते झालेत. आणि ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी राजगडावर पोचल्या पोहोचल्या राजांनी वार्ता उठवली की वाटेत ‘संभाजी राजांच निधन झालं’. नऊ वर्षाचा असताना संभाजी राजांच्या पाठीवर मरण बांधलं गेलं ते अगदी इंद्रायणी नदीच्या तीरावर मरणाला निधड्या छातीने सामोरे जाईपर्यंत हे मरण संभाजींची सोबतच करत राहिल. ही बातमी ऐकल्यानंतर औरंगजेबाने संभाजी राजांचा पाठलाग करणे थांबवले. अगदी लगेचच काशीपंतांसह संभाजी राजे सुखरूप रायगडावर पोहोचले.
पराक्रमाची पहिली मुद्रा(Sambhaji Maharaj The first posture of prowess)
बघता बघता दिवस उलटले आणि संभाजी राजांचे वय झाले 14 वर्षे. ते स्वराज्याच्या महालामधील कामकाज पाहू लागले. मुघल दरबाराचा अगदी जवळून अभ्यास केल्यामुळे शत्रूची कटकारस्थाने सुद्धा त्यांच्या लक्षात आली. आणि एके दिवशी शिवाजी महाराजांनी संभाजींना विचारले “संभाजी राजे तुम्ही लेखणी तेज चालवता, पण तुमची तलवार…” आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब, आणि आज्ञा सुटली गुजरात, खंबायत प्रांत टिपण्याची. आणि एखाद्या राखेतून अग्निपेटावी अशी संभाजी राजांनी तलवार उचलली आणि गुजरात त्यांनी टिपलं त्यासोबत खांबात सुद्धा लुटलं. संभाजींच्या रणनीतीने अनेकांच्या नजरा विस्फारल्या, बघता बघता जीत हासिल झाली आणि ही वार्ता शिवाजी महाराजांना कळाली व राजांची छाती अभिमानाने भरून आली आणि त्यांनी संभाजीराजांच्या स्वागतासाठी तोफांची सलामी देण्यास आज्ञा दिली. आणि अशी स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली.
शिवाजी महाराजांना असा पुत्र हवा होता जो त्यांच्या मागे रयतेची काळजी घेईल आणि पराक्रमी वारसा पुढे चालवत राहील. आणि मग शिवाजी महाराज मोहिमा घेत होते आणि त्यांना अंमलात आणण्याचे कार्य संभाजीराजांच्या हातात होते. बघता बघता संभाजी राजे 17 वर्षाचे झाले आणि त्याचवेळी महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असलेला काळ उंबरठ्यावर आला तो म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आत्तापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते, संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीरी मिळवत होते. संभाजी पहिले युवराज झाले. स्वराज्याला युवराज मिळाला आणि खरेतर इथपर्यंत संभाजी राजांवर एकही डाग नाही, एकही आरोप नाही आणि जसे संभाजी राजे युवराज झाले तर तसे एक एक आरोप होण्यास सुरुवात झाली आणि मूळचा संभाजी राजाच पुरता हरवून गेला.
महाराष्ट्रावरील काळे सावट(Shivaji Maharaj Death)
3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाले, सारा महाराष्ट्र कोसळून पडला. संभाजी राजे त्यावेळी पन्हाळा वर होते. नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचे प्रेत दहन करता येत नाही हा त्यावेळचा धार्मिक नियम होता. संभाजी राजे रायगडावर परत येईपर्यंत उशीर झाला असता. म्हणून तातडीने राजारामाला मंचकारोहण करून शिवाजी महाराजांचे अंत्यविधी करण्यात आले. पण याचवेळी रायगडावर काही कुटीलमंत्र्यांनी डाव आखला संभाजी पराक्रमी, शूरवीर, धर्म पंडित, तत्त्वज्ञानी आहेत हे सर्व अशा बंडखोर मंत्र्यांना माहीत होतेच, जे शिवाजी महाराज हयात असेपर्यंत जुमानत नव्हते आता तर छत्रपती झालेत तर आपले अस्तित्वच राहणार नाही याची भीती त्यांना वाटू लागली आणि त्यांनी पन्हाळ्यावर संभाजींना कैद करण्याचा डाव आखला.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना निरोप धाडला, हंबीरराव म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू. राजाराम म्हणजे हंबीररावांचा भाचा. कोणत्या मामाला वाटणार नाही की भाचा गादीवर बसावा. हंबीरराव मदत करतील, त्यामुळे सगळे बंडखोर मंत्रिमंडळ हंबीररावांकडे गेल. हंबीरराव तयार झाले आणि राजांना कैद करायला पन्हाळा वर पोहोचले आणि तिथेच हंबीररावांनी डाव उलटवला आलेल्या सगळ्या मंत्र्यांना संभाजीराजांपुढे कैद करून हजर केले. हंबीरराव कडाडले शिवराय जाऊन अकरा दिवस ही नाही झाले आणि ही बंडखोरी संभाजीराजांसोबत. सर्व फितुरांना संभाजी राजांनी कैद करावे अशी मागणी हंबीररावांनी केली. पण राजाने असे काहीही केले नाही तर त्यांची सुटका केली.
त्यानंतर मग संभाजी राजे रायगडावर पोहोचले. पित्याचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते ते संभाजीराजांनी पुन्हा केले. रायगडावर श्री छत्रपतींची समाधी उभारली. कोसळलेल्या रायगडाची घडी नीट बसवली. आणि त्यानंतर शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ महिन्यांनी संभाजी राजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
स्वराज्याचा वारसा(Legacy of Swarajya)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संकटांचे वादळ वाहू लागले होते. सर्व बाजूने शत्रू वार करण्यास तयार होते. त्याचवेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना संभाजी राजेंनी स्वराज्याचा वारसा उत्तम प्रकारे चालू ठेवण्यासाठी मोहिमेची सुरुवात करण्यास विचारले असता हंबीरराव मोहितेने मुघलांचे जणू नातेच असलेले आजच्या मध्य प्रदेश मधील भुरानपुरा या प्रांतावर सैर करण्याचे सुचवले. भुरानपुरा म्हणजे दख्खनेची जणू राजधानीच होती. बघता बघता मराठ्यांनी बुरानपुरा लुटले आणि सैर केले. त्यामुळे औरंगजेब संतापला, शिवाजी महाराजांनी कधी हात न लावलेल्या या त्याच्या मनाने जवळच्या जागेवर सैर करून काबीज घेतल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोहोचली. त्याचबरोबर त्याला दुसरा तडाखा बसला संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नावाने बसवलेलं औरंगाबादच लुटलं.
त्यामुळे औरंगजेब आणखी संतापला. त्यातच अकबर औरंगजेबाचा मुलगा बापा विरुद्ध वैर घेऊन आला तो थेट राजा संभाजी कडे. संभाजी राजांनी अकबराला स्वीकारून औरंगजेबाला पुन्हा खुले आव्हान दिले. त्यामुळे जागत्या डोळ्याने देखत या गोष्टी घडताना पाहून औरंगजेब सरसावला आणि त्याने लगेच दख्खन कडे कुच केली.
औरंगजेबाचे सैन्यांची संख्या 70 कोटी इतकी तर आपल्या स्वराज्याच्या सैन्य जमवले तरी जेमतेम पन्नास हजार होते. औरंगजेबाचा त्या काळाचा महसूल 23 हजार कोटींचा होता तर आपल्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसाबसा एक कोटी होता. औरंगजेब पूर्ण 62 वर्षाचा आणि संभाजी राजा जेमतेम 23 वर्षांचे. मनभर औरंगजेब आणि कणभर स्वराज्य होते. स्वराज्याला बरखास्त करण्यास औरंगजेब निघाला आणि बघता बघता महाराष्ट्रात येऊन पोहोचला. सर्व सैन्याला त्याने मराठ्यांना खिंडीत पकडायला सांगितले. प्रत्येक सरदाराला मोठ्या रकमेचे बक्षीस लावून कामगिरी बजावण्यास सांगितली. सर्वांना रोखून धरण्यासाठी मुठभर मराठी लढत होते. दिवसाच्या चोवीस तासातील 21 तास लढाई सतत चालू होती. मराठ्यांनी औरंगजेबाचेच सैन्याला सळो का पळो करून सोडले.
मुघलांचाच मुलुख पूर्ण बेचिराख करून टाकला. बहादुर खानाला मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवले. वाऱ्याप्रमाणे तेज मराठी त्याच्या तावडीत गावातील तर खरं. तब्बल एक वर्ष ही लढाई चालू होती पण औरंगजेबाच्या हातात स्वराज्याच्या मातीचा एक कण सुद्धा लागला गेला नाही.
औरंगजेबाने मोठी बैठक बोलावली. त्यामधून गड किल्ले जिंकले तर स्वराज्यातील मराठी शांत होतील असा निष्कर्ष निघाला. सर्व मुघल सरदार मोहिमेवर लागलं. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील छोटासा रामशेज किल्ला त्याने काबीज करण्याचा बेत आखला. अवघे 350 मावळे असलेला हा किल्ला घेण्याचे त्यांनी फक्त केले. त्यासाठी शहाबुद्दीन खान उभा राहिला आणि हा किल्ला काबीज करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. वीस हजाराची सैन्य घेऊन एका दिवसात हा किल्ला काबीज करण्याच्या मनसुभाने खान नाशिक मध्ये पोहोचला. रामशेजवारी किल्लेदार रामाजी पवार यांनी अवघ्या 300 मावळ्यांसोबत एक भक्कम लढत दिली.
जवळजवळ तीन वर्षांनी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेणे शहाबुद्दीन खानला जमलंच नाही. औरंगजेबाने त्यास परत बोलावले. मग उभा राहिला फतेह खान, त्याने सुद्धा बलाढ्य सैन्य घेऊन हा किल्ला काबीज करण्याचे धोरण आखले, आपल्या मावळ्यांनी त्यासही जुगारून लावले. जवळजवळ पाच वर्ष मराठी मावळ्यांनी एक जोरदार लढत देऊन रामशेज अजिंक्यच ठेवला.
नऊ राज्यांवरील सत्ता(Rule over nine states)
औरंगजेब थोडा मंदावला पण तो पुन्हा तयार होऊन वार करणार हे संभाजी महाराजांना नक्कीच ठाऊक होते. त्यामुळे अजून सशस्त्र, बलाढ्य होण्यासाठी संभाजी महाराजांनी कर्नाटकातील मैसूर काबीज करून खंडणी मिळून पूर्ण कर्नाटक वर ताबा मिळवला. मराठी फौज घुसल्या तामिळनाडमध्ये मद्रास मध्ये तो पूर्ण प्रांत काबीज करून. संभाजीराजांसोबत मावळ्यांनी पुढे आंध्रप्रदेशावर चाल केली. गंगाराम वाणी नावाचा संभाजी महाराजांचा सेनापती बिहारमध्ये पोहोचला आणि बिहारच्या पाटण्यावर सुद्धा मराठ्यांचा भगवा फडकला. त्यानंतर पुढे मराठी फौजानी बंगाल प्रदेश सुद्धा काबीज केला. म्हणजे आताच्या हिंदुस्तानचा जर नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र आणि तामिळनाडू या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता होती.
झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा
असे हे इतके बलाढ्य छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल 120 लढाया लढल्या आणि एकही हार मानली नाही तरीही शेवटी त्यांच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला .गणोजी शिर्के , संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंचा तो भाऊ होता. संभाजी राजांनी त्यांना वतनदारी देण्यास मनाई केली होती कारण हे स्वराज्याच्या नियमां बाहेरील जाणारी गोष्ट होती. त्यामुळे याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी 1 फेब्रुवारी 1689 रोजी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये न्याय निवाडासाठी गेले असता, गणोजी शिर्केने ही माहिती औरंगजेब पर्यंत पोहोचवली आणि संभाजी राजे पकडले गेले. कोणत्याही राज कैद्याला तुरुंगात नीट व्यवहार केला जातो. आणि संभाजी राजे तर एक महाराज होते पण औरंगजेबाने शरीरावरच नाही तर मनावर सुद्धा मोठे घाव केले.
त्याने तीन अटी ठेवल्या पहिली ही की संभाजीराजांनी औरंगजेबाला बादशहा म्हणावे, दुसरी मराठ्यांचा सर्व खजाना मुघलांकडे सोपवावा. आणि तिसरी संभाजीराजांनी आपल्या धर्माला सोडून इस्लाम धर्म स्वीकारावा. छत्रपती यामधील एकही अट मान्य करणारे नव्हतेच. संतापलेल्या औरंगजेबाने कधीही हाताला न घावलेल्या महाराष्ट्राच्या राजाला आम्ही पकडले आहे हे दाखवण्यासाठी साखळदंडामध्ये अडकवलेल्या राजां सोबत त्यांचे मित्र कवी कलाश यांची उंटावर उलटे करून विदूषकी कपडे घालून राज्यात धिंड काढली, लोकांना दगडे मारण्यास उत्सावले, तुरुंग मध्ये 40 दिवस लागोपाठ त्यांच्यावर अंगावर काटा आणणारे अत्याचार केले गेले. एक एक करून त्यांची नखे उपटण्यात आली, त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची टाकली गेली, एखाद्या बोकडाची कातडी सोलतात तसे त्यांची कातडी सोलून काढली, लोखंडाच्या गरम सळ्यांनी त्यांचे डोळे उपसून काढले गेले.
दररोज विचारले गेले आता तरी अटी मान्य आहेत का? पण महाराजांचे उत्तर फक्त ‘नाही’ हेच होते. एक एक करून त्यांची बोटे छाटली गेली, हात पाय कापले गेले, इतकच काय तर जीभ सुद्धा कापली गेली, पण राजांनी अटी स्वीकारणे कधीच मानले नाही. अशा राजाच्या नशिबात एका सामान्य माणसाप्रमाणे अंतिम विधी सुद्धा नव्हते, त्यांच्या अंगाचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये टाकले गेले. 11 मार्च 1689 हाच तो काळा दिवस ज्या दिवशी राजे अनंतात विलीन झाले.
पाहुनी शौर्य तुझपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला
असा हा राजा जगला सुद्धा रयतेसाठी आणि मेला सुद्धा रयते साठी. मरण सुद्धा त्याच्या नशिबात नीटपणे आलं नाही. हा त्यांचा इतिहास वाचला तरी अंगावर काटा येतो. पण अजूनही त्यांच्या नावाने प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा मिळते. नव्याने उभे राहण्याची ताकद मिळते. स्वाभिमानाने जगण्याचे कारण मिळते. तर अशा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा!