E-commerce आहे तरी काय?…“Fluid Concepts And Creative Analogies” (फ्लूड कन्सेप्ट अँड क्रिएटिव्ह ऍनालॉजीज) या पुस्तकाचं नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का. हे पुस्तक आहे तर अगदी सामान्य, पण तुम्ही म्हणाल मग यात विशेष असे काय आहे?
तर Amazon वरून सर्वात प्रथम विकली गेलेली वस्तू हे पुस्तक होते. 1995 मध्ये 3 april या दिवशी ऑस्ट्रेलियामधील John Wainwright या इंजिनीअरने ही वस्तू विकत घेतली. Amazon साठी, ही पहिली ऑनलाईन ऑर्डर सोपी नव्हती. ती खरेदी अजूनही Amazon मधील इतिहासाचा भाग आहे.
शून्यापासून सुरुवात झालेली ॲमेझॉन (Amazon) कंपनी आज (July 2024 चा रिपोर्टनुसार) जवळजवळ 2079.14 बिलियन डॉलर चा बिजनेस करते म्हणजे भारतीय करन्सी मध्ये 1,73,63,67,28,65,000 रुपये. आज Amazon प्रमाणेच Flipkart, Myntra, Instamart, Blinkit अशा बऱ्याच कंपन्यांची नावे तुम्ही ऐकत असाल. या आजच्या काळातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या आहेत. सध्याच्या व्यस्थ जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी वेळ ही खूप महत्त्वाची झाली आहे त्यामुळे एका ग्राहकाप्रमाणे विचार कराल तर स्वतः बाजारात न जाता किंवा घराच्या बाहेर पाऊल न टाकता कोणतीही वस्तू अगदी काही मिनिटांमध्ये ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचवणे गरजेचे झाले आहे. आणि हेच काम ईकॉमर्स द्वारे केले जाते त्यामुळे ई-कॉमर्स हा फक्त आजच्या काळातच नाही तर येणाऱ्या पुढील काळात सुद्धा महत्त्वाचा ठरताना दिसत आहे.
ई-कॉमर्स म्हणजे नक्की काय? ई-कॉमर्स कधी उदयास आले? ई- कॉमर्सचे फायदे कोणते आहेत? ई-कॉमर्स मधील जॉब रोल्स कोणते आहेत? ई-कॉमर्सचे फ्री कोर्सेस आणि ई-कॉमर्समध्ये सॅलरी किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील सोप्या भाषेतील माहिती वाचून नक्कीच मिळून जाईल.
Table of Contents
Toggleई-कॉमर्स म्हणजे काय? (What is E-commerce?)
- मित्रांनो ई-कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (Electronic Commerce). सोप्या भाषेत ऑनलाइन खरेदी-विक्री करणे.
- एक ग्राहक म्हणून दुकानामध्ये जाण्याऐवजी, तुम्ही वेबसाइट किंवा ॲप्सवर एखाद्या वस्तूची माहिती, फोटो व त्याची किंमत नीटपणे बघू शकता आणि त्याची खरेदी करू शकता.
- यामध्ये कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी इतकेच नव्हे तर आजच्या काळात किराणा मालापासून अगदी विमानाच्या तिकिटांपर्यंत तुम्ही गोष्टी विकत घेऊ शकता.
- ई-कॉमर्स मध्ये तुम्ही डेबिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतीने पेमेंट करता आणि वस्तू तुमच्या घरापर्यंत पोहोचवल्या जातात.
ई-कॉमर्स केव्हा उदयास आले? (History of E-commerce)
सुरुवातीला ऑनलाइन खरेदी संगणकावर केली गेली नव्हती!
- 1979 मध्ये, मायकेल अल्ड्रिच नावाच्या व्यक्तीने एक सिस्टम शोधून काढली ज्यामध्ये फोनची लाईन एका विशिष्ट स्क्रीनशी जोडली गेली होती. ज्यामुळे फोन लाईनद्वारे वस्तूंची ऑर्डर करणे शक्य झाले होते.
- याचा वापर प्रथम सामान्य माणसांसाठी केला नव्हता तर फक्त व्यवसायामधील (बिझनेस मध्ये) खरेदी विक्री करण्यासाठी ही सिस्टीम वापरली गेली होती.
- काही वर्षांनंतर 1992 मध्ये, चार्ल्स स्टॅक नावाच्या व्यक्तीने सामान्य लोकांच्या वापरण्यायोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी पहिले ऑनलाइन स्टोअर तयार केले. हे पुस्तकांचे ऑनलाइन स्टोअर होते ज्यामध्ये डायल-अप कनेक्शन (आजच्या इंटरनेटपेक्षा खूपच हळू) वापरले गेले होते. हे स्टोअर आजच्या काळातील प्रसिद्ध ॲमेझॉनच्या आधीही अस्तित्वात होते.
ई-कॉमर्सचे फायदे (Benefits of E- commerce)
1. कोणत्याही ठिकाणाहून खरेदी:
तुम्ही तुमच्या घरी पलंगावर आरामात बसून, कामावर किंवा अगदी सुट्टीच्या दिवशीही मोबाईल किंवा लॅपटॉप वर प्रॉडक्ट बघू शकता आणि खरेदी करू शकता – स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही!
2. विस्तृत निवड:
नेहमीच्या दुकानांपेक्षा ऑनलाइन स्टोअर मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात. त्यासोबत वेगवेगळ्या ई-कॉमर्स साईट्स किंवा ॲप्स वरून तुम्ही वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या किंमती आणि वैशिष्ट्यांची सहज तुलना करू शकता.
3. 24/7 प्रवेश:
ऑनलाइन स्टोअर नेहमी उघडे असतात, त्यामुळे तुम्ही दिवसा किंवा रात्री जेव्हा हवे तेव्हा खरेदी करू शकता.
4. जागतिक पोहोच:
एक विक्रेता म्हणून विक्रेते आपले प्रॉडक्ट जगभरातील ग्राहकांना विकू शकतात. फक्त स्वतःच्या देशातच नाही तर विदेशी सुद्धा मालाची विक्री करण्यास सोपे होते.
5. कमी खर्च:
विक्रेत्यांना दुकानांचे भाडे, वेअर हाऊस उपलब्धता आणि दुकानांमधील कर्मचाऱ्यांसाठी पैसे देण्याची आवश्यकता येतच नाही, ज्यामुळे त्यांचे बरेच पैसे वाचतात.
6. अधिक डेटा:
ई कॉमर्स विक्रेते त्यांच्या ऑनलाइन स्टोअरला किती लोक भेट देतात आणि ते कोणती प्रॉडक्ट्स पाहतात याचा मागोवा घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय सुधारण्यास मदत होऊ शकते.
नक्की वाचा
Digital Marketing| मार्केटिंग जगातील एक वळण| जुन्या जाहिराती झाल्या बंद कारण…
Freelancing : फ्रीलान्सिंग म्हणजे काय?|Freelancer म्हणजे कोण?|Freelancing meaning in marathi
आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi
Interview preparation | Interview Skills in marathi | Interview tips for fresher |फ्रेशर्ससाठी मुलाखतीची तैयारी आणि 11 टिप्स मराठीतून
ई-कॉमर्स मधील नोकरीची संधी (Job Roles in E-commerce)
डिजिटल मार्केटिंग मॅनेजर:
मार्केटिंग मॅनेजर कंपनीचे ऑनलाइन मार्केटिंग ऑपरेशन्स हँडल करतात. यामध्ये प्रॉडक्टची मार्केटिंग, बिझनेस प्लॅनची अंमलबजावणी करणे, सोशल मीडियावरील ऍडव्हर्टायझिंग व्यवस्थापित करणे, वेबसाईटचा SEO (Search Engine Optimizarion) आणि प्रॉडक्ट मार्केटिंग प्रयत्नांवर देखरेख करणे समाविष्ट असते.
SEO कंटेंट रायटर:
कस्टमरने Search Engine वर सर्च केल्यावर प्रॉडक्ट गुगलच्या रिझल्ट पेजवर सर्वात वर कसे दिसेल हे विचारात घेऊन उत्तम कन्टेन्ट बनवणे. यामध्ये प्रोडक्टची वैशिष्ट्ये नीटपणे लिहिणे, प्रॉडक्ट रिलेटेड ब्लॉग पोस्ट सर्वांसाठी उपलब्ध करून देणे आणि प्रॉडक्ट वेबसाईट उत्तम बनवणे यांचा समावेश असतो.
सोशल मीडिया मॅनेजर:
कंपनीच्या सोशल मीडिया संबंधित गोष्टी हाताळणे, कंटेंट तयार करणे आणि पोस्ट करणे त्यासोबतच फॉलोवर्स सोबत संवाद साधणे आणि प्रॉडक्ट विषयीची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे.
PPC स्पेशलिस्ट:
पे-पर-क्लिक (PPC) जाहिरातींची कामे हाताळते आणि व्यवस्थापित करते, Google, Youtube आणि Facebook च्या जाहिराती पे-पर-क्लिक द्वारे काम करतात.
प्रॉडक्ट मॅनेजर:
प्रॉडक्ट मॅनेजर कंपनीसाठी प्रॉडक्टची लाईन तयार करतात आणि व्यवस्थापित करतात. यामध्ये कच्चा मालाची सोर्सिंग, प्रॉडक्टचे वर्णन तयार करणे आणि प्रॉडक्टची किंमत ठरवणे हे त्यांचे काम असते.
मर्चंडायझर:
मर्चंडायझर एक दिसण्यास आकर्षक आणि युजर फ्रेंडली ऑनलाइन स्टोअर तयार करतात. यात वेबसाइट आणि प्रॉडक्ट पेजेस चे लेआउट डिझाइन करण्याचे काम समाविष्ट असते.
ग्राहक सेवा प्रतिनिधी:
ग्राहकांना ग्राहक सेवा प्रदान करण्याचे काम ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणजेच कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह करतात. प्रॉडक्ट, ऑर्डर आणि प्रॉडक्ट रिटर्न याविषयी प्रश्नांची उत्तरे कस्टमरला देतात.
वेअरहाऊस मॅनेजर:
वेअरहाऊसच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवतात, ज्यामध्ये पिकिंग, पॅकिंग आणि ऑर्डर शिपिंग समाविष्ट असते.
ई-कॉमर्स डेव्हलपर:
ई-कॉमर्स वेबसाइट आणि प्लॅटफॉर्म तयार करतात आणि त्यांची देखरेख करतात.
वेब डिझायनर:
ई-कॉमर्स वेबसाइटचा यूजर इंटरफेस (UI) डिझाइन करतात
ई-कॉमर्समध्ये स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा? (How to start own business in E-commerce)
1. तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे विकू शकता हे शोधून काढा (मार्केटमधील गॅप ओळखू शकता, तुम्ही काय वेगळे विकू शकता यावर लक्ष केंद्रित करा)
2. मार्केटमधील स्पर्धकांना ओळखून त्यावर रिसर्च करा आणि प्लॅनिंग करा.
3. तुमचा बिजनेस कायद्याप्रमाणे नीट रजिस्टर करा, बिजनेसला नाव द्या आणि तुमचा स्वतःचा प्लॅटफॉर्म (वेबसाईट,ॲप,न्यूज लेटर) निवडा.
4. प्रॉडक्टच्या सप्लायची नीट मॅनेजमेंट करा आणि त्याचा खर्च ठरवा.
ई-कॉमर्स कोर्सेस (E-commerce Courses)
1. Alison चे ई-कॉमर्स फ्री कोर्सेस-
तुम्ही काय शिकाल?
1. ई-कॉमर्सची ओळख (Introdution to E-commerce)
2. ऍमेझॉन वेब सेवा (Amazon Web Service)
3. ई-कॉमर्सची मूलभूत माहिती (Basics of E-commerce)
4. वेअरहाऊस मॅनेजमेंट (Warehouse Management)
5. विपणन आणि ग्राहक वर्तन (Marketing and Consumer behaviour)
कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓
2. Simplilearn चे ई-कॉमर्स फ्री कोर्सेस-
तुम्ही काय शिकाल?
1. ई-कॉमर्स सूचीचा परिचय (Introduction to E-commerce Listing)
2. व्यवसाय बुद्धिमत्तेमधील मूलभूत तत्त्वे (Business Intelligence Fundamentals)
कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓
3. ClassCentral चे ई-कॉमर्स फ्री कोर्सेस-
तुम्ही काय शिकाल?
1. टी-शर्ट व्यवसाय कसा सुरू करायचा (How to start a T-shirt Business)
2. ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणजे काय? (What is Drop Servicing?)
3. ebay आणि Amazon वर वस्तूंची विक्री (Selling Items on ebay and Amazon)
4. वेबसाइटची कमाई कशी सुरू करावी (How to Monetize website)
कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓
4. eMarketing Institute चा ई-कॉमर्स फ्री कोर्स-
तुम्ही काय शिकाल?
ई-कॉमर्सची ओळख, बिझनेस प्लॅन तयार करणे, ई-कॉमर्ससाठी कायदेशीर मार्गदर्शन, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, विक्री वाढवण्याची योजना, ई-कॉमर्स SEO, मोबाइल SEO, ई-कॉमर्स ऑनलाइन मार्केट
कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓
ई-कॉमर्स मधील सॅलरी (E-commerce Salary)
भारतातील ई-कॉमर्स मधील जॉब रोल्स आणि त्यांची सॅलरी खालील प्रमाणे-
ई-कॉमर्स जॉब रोल | सॅलरी (प्रति वर्ष- रुपये) |
ई-कॉमर्स मॅनेजर | 6,09,000 |
SEO कंटेंट रायटर | 3,02,400 |
सोशल मीडिया मॅनेजर | 3,48,166 |
PPC स्पेशलिस्ट | 3,22,860 |
प्रॉडक्ट मॅनेजर | 3,48,500 |
मर्चंडायझर | 3,66,182 |
कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह | 2,99,162 |
वेअरहाऊस मॅनेजर | 5,05,092 |
ई-कॉमर्स डेव्हलपर | 15,25,000 |
वेब डिझायनर | 3,56,733 |