व्यवसाय करताय? मग ओळखा Domestic Business आणि International Business मधील फरक|In Marathi

मित्रांनो, तुम्हाला हे तर ठाऊक असेलच की काही वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीस दूरवर राहणाऱ्या व्यक्तीसोबत संदेश साधायचा असल्यास कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधली जात असे आणि कित्येक महिन्यांनी तो संदेश योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत असे. हा झाला हजारो वर्षांपूर्वीचा संदेश पोहोचवण्याचा मार्ग. पण आज प्रत्येक व्यक्तीकडे फोन आहे, मोबाईल मध्ये इंटरनेट आहे, दूरच्या व्यक्तीसोबत संवाद साधण्यासाठी, व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगवेगळे ॲप्स उपलब्ध आहेत. फक्त आपल्या देशातीलच नाही तर लाखो मैल दूरवर असणाऱ्या दूरच्या देशांमधील लोकांसोबत संपर्क साधने सुद्धा सोपे झाले आहे. त्यामुळे इंटरनॅशनल बिझनेस (International Business) मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यासोबतच एखादी वस्तू स्वतःच्या देशामध्ये बनवण्यापेक्षा जर दुसऱ्या देशांमधून आयात करून कमी किंमतीमध्ये मिळत असेल तर त्याचा फायदा का कोणता देश नाही उचलणार? 

नॉर्थ कोरिया सारख्या देशांप्रमाणे आपला भारत देश एकुलता एक राहणारा नाही आहे. आपल्या देशाने गेल्या काही वर्षांमध्ये इतर देशांसोबत व्यवहार करणे चालू केले आहे. ज्यामुळे वस्तूंची आयात (Import) आणि निर्यात (Export) मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यामुळे देशाला फायदाच होत आहे. तर असा हा इंटरनॅशनल बिझनेस(International Business) म्हणजे नक्की काय आहे? या बिझनेस ची वैशिष्ट्ये तरी कोणती आहेत? इंटरनॅशनल बिजनेसमुळे देशाला कसा फायदा होतो? विद्यार्थ्यांसाठी इंटरनॅशनल बिझनेस हा करिअरमधील मोठा भाग कसा बनू शकेल? इंटरनॅशनल बिझनेसचे फ्री कोर्सेस कोणते आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढे अगदी सोप्या शब्दांमध्ये दिली आहेत. तर अगदी पाच मिनिटांमध्ये समजून घ्या इंटरनॅशनल बिजनेस आणि त्याचे भारतातील अद्वितीय भविष्य.

व्यवसाय करताय? मग ओळखा Domestic Business आणि International Business मधील फरक

सोप्या भाषेत इंटरनॅशनल बिझनेस (International Business) म्हणजे आपल्या देशामध्ये एखादी वस्तू नसेल किंवा उत्पादनास अधिक खर्च लागत असेल तर दुसऱ्या देशांमधून अशा वस्तूंची आयात करणे म्हणजे इम्पोर्ट करणे (मागवणे) आणि त्याच्या अगदी विरुद्ध जर एखादी वस्तू समोरच्या देशाकडे नसेल तर त्या देशामध्ये त्या वस्तूची निर्यात करणे म्हणजे एक्सपोर्ट करणे (पाठवणे). यामध्ये दोन किंवा अधिक देशांमधील सीमेच्या पलीकडच्या देशांसोबत व्यवहार केला जातो, ज्यामुळे कंपन्यांना देशांतर्गत सीमेपलीकडे काम करता येते आणि देशाबाहेरील बाजारपेठा, संस्कृती आणि वातावरणात सहभागी होता येते.

इंटरनॅशनल बिझनेस मध्ये फक्त वस्तूच नाही तर सर्विसेस, टेक्नॉलॉजी, नॉलेज इत्यादींचा सुद्धा व्यापार केला जातो. उदाहरणार्थ– 

सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या – Amazon, McDonald’s (MCD), Starbucks Coffee(SB), Microsoft (MSFT)

(Manufacturing) उत्पादन करणाऱ्या कंपन्या – Mercedez, Toyota,Kia

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक – SAMSUNG, LG, SONY आणि ब्रिटिश पेट्रोलियम (BP) सारख्या ऊर्जा कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात आपल्या देशात व्यवहार करत आहेत

तर हे सर्व शक्य आहे इंटरनॅशनल बिझनेसमुळे!

इंटरनॅशनल बिझनेस चे प्रकार (Types of International Business)

व्यवसाय करताय? मग ओळखा Domestic Business आणि International Business मधील फरक

एक्सपोर्ट (Export) व्यापार – परदेशात वस्तू आणि सेवांची विक्री करणे 

इम्पोर्ट (Import) व्यापार – इतर देशांकडून वस्तू आणि सेवा खरेदी करणे 

एन्ट्रीपोट (Entrepot) व्यापार – इतर देशांकडून वस्तू आणि सेवांची खरेदी करणे आणि त्याच वस्तू पुन्हा दुसऱ्या देशांमध्ये विकणे

डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल बिझनेस मधील फरक (Difference Between Domestic and International Business)

मुद्देडोमेस्टिक बिजनेस (देशांतर्गत व्यवसाय) इंटरनॅशनल बिजनेस (आंतरराष्ट्रीय व्यवसाय)
 व्याख्या (Definition)डोमेस्टिक बिझनेस (देशांतर्गत व्यवसाय) म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत व्यवहार करणेइंटरनॅशनल बिझनेस (आंतरराष्ट्रीय व्यवसाय) म्हणजे एखाद्या देशाच्या सीमेपलीकडे व्यवहार करणे
बिजनेस मधील सहभाग (Participants in Business)या बिजनेस मध्ये फक्त देशामधील लोक किंवा कंपन्या  भाग घेतातया बिजनेस मध्ये  देशाबाहेरील लोक किंवा कंपन्या भाग घेतात
उत्पादनाचे घटक (Factors of Production)एखाद्या व्यवसायासाठी उत्पादनाचे घटक म्हणजे श्रम, भांडवल, तंत्रज्ञान, साहित्य इ. देशाच्या सीमेपर्यंत मर्यादित असतातउत्पादनाचे घटक म्हणजे श्रम, भांडवल, तंत्रज्ञान, साहित्य इत्यादी देशाच्या सीमेच्या बाहेर वापरू शकतो.
ग्राहकांचा स्वभाव (Nature of Consumers) संस्कृती, वर्तन, चव, प्राधान्ये, कायदेशीर व्यवस्था, रीतिरिवाज आणि पद्धती इत्यादींच्या बाबतीत ग्राहक तुलनेने एकसंध असतात.संस्कृती, वर्तन, चव, प्राधान्ये, कायदेशीर व्यवस्था, रीतिरिवाज आणि प्रथा इत्यादींच्या बाबतीत ग्राहक तुलनेने भिन्न (वेगवेगळे) असतात.
बिजनेस सिस्टम (Business System)देशांतर्गत व्यवसाय हा एकाच देशाचे नियम, कायदे, धोरणांद्वारे नियंत्रित केला जातोआंतरराष्ट्रीय व्यवसाय अनेक देशांचे नियम, कायदे, धोरणे कर प्रणालीद्वारे नियंत्रित केला जातो
व्यवहारासाठी लागणारे चलन (Currency Used)देशांतर्गत व्यवसायातील व्यवहार देशाच्या स्थानिक चलनाद्वारे चालवले जातातआंतरराष्ट्रीय व्यवसायातील व्यवहार परकीय चलनाद्वारे चालवले जातात
वाहतुकीचे प्रकार (Modes of Transport)देशांतर्गत व्यवसायातील मालाची वाहतूक मुख्यत्वे रस्ते आणि रेल्वेने केली जातेआंतरराष्ट्रीय व्यवसायातील मालाची वाहतूक प्रामुख्याने जल आणि हवाई मार्गाने केली जाते
जोखीम व्यवस्थापन (Risk Management)देशांतर्गत व्यवसायातील जोखीम तुलनेने कमी असतेअंतर, सामाजिक-अर्थशास्त्र आणि राजकीय परिस्थितीमधील फरक यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसायातील जोखीम अधिक असते.
बाजाराची व्याप्ती ((Scope of Market))बाजाराची व्याप्ती देशाच्या राष्ट्रीय सीमांपुरती मर्यादित असतेआंतरराष्ट्रीय बाजारपेठेची व्याप्ती खूप विस्तृत आहे आणि ती देशाच्या सीमांच्या पलीकडे पसरलेली आहे

इंटरनॅशनल बिझनेसची वैशिष्ट्ये (Features of International Business)

व्यवसाय करताय? मग ओळखा Domestic Business आणि International Business मधील फरक

1. मोठ्या प्रमाणावरील कामकाज:

आंतरराष्ट्रीय व्यवसायात (International Business मध्ये )सर्व कामकाज खूप मोठ्या प्रमाणावर चालते. उत्पादन (Production) आणि विपणन (Marketing) प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात.

2. अर्थव्यवस्थांचे एकत्रीकरण:

इंटरनॅशनल बिझनेस अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचे एकत्रीकरण (एकत्रित) करतो. याचे कारण हे की हा बिझनेस एका देशाचे पैसे (Finance) आणि दुसऱ्या देशाचे श्रम  सुविधा वापरतो.

3. विकसित देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे (MNC company) वर्चस्व:

इंटरनॅशनल बिझनेसवर विकसित देश आणि त्यांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे (MNC –Multinational Corporationचे वर्चस्व आहे. सध्या USA, युरोप आणि जपानमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे विदेशी व्यापारावर वर्चस्व (पूर्ण नियंत्रण) आहे. कारण त्यांच्याकडे उत्तम आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे ते कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू तयार करतात आणि उत्तम सेवा पुरवतात.

4. सहभागी देशांना लाभ:

इंटरनॅशनल बिझनेसमुळे सर्व देशांना लाभ होतो. मात्र, विकसित (श्रीमंत) देशांना सर्वाधिक लाभ होतो. विकसनशील (गरीब) देशांनाही लाभ मिळतो. त्यांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतात. 

5. तीव्र स्पर्धा:

इंटरनॅशनल बिझनेसला जागतिक बाजारपेठेत तीव्र (मोठ्या) स्पर्धेला सामोरे जावे लागते. ही स्पर्धा विकसित आणि विकसनशील देशांमधील असते.

6. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची विशेष भूमिका:

इंटरनॅशनल बिझनेस विज्ञान आणि तंत्रज्ञानाला खूप महत्त्व देतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology) व्यवसायाला मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास मदत करतात.

7. गुंतवणुकीच्या वाढीव संधी: 

जागतिकीकरणामुळे कंपन्यांना कोणत्याही देशामध्ये गुंतवणुकीची सर्वात आकर्षक संधी मिळते. 

8. परकीय चलनाची वाढ

वेगवेगळे देश त्यांच्या वस्तू आणि सेवा जगभर निर्यात करतात , हे मौल्यवान परकीय चलन मिळविण्यास मदत करते. या परकीय चलनाचा वापर आयातीसाठी पैसे देण्यासाठी केला जातो. परकीय चलन आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करते. 

इंटरनॅशनल बिझनेस मध्ये मी पाऊल कसे टाकू शकतो? (How to enter in International Business)

1. शिक्षण आणि ज्ञान (Education and Knowledge):

इंटरनॅशनल बिझनेस, अर्थशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रात पदवी (Degree) मिळवा.

जागतिक बाजारपेठा, व्यापारामधील धोरणे आणि संस्कृतीमधील फरक समजून घ्या.

तुम्हाला जो देश आवडतो त्या प्रदेशातील संबंधित परदेशी भाषेचा अभ्यास करा.

क्रॉस-कल्चरचा (वेगवेगळ्या संस्कृतींचा) अभ्यास करण्यासाठी परदेशातील कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.

International Business (BE) डिग्री नंतरचे जॉब रोल्स

आंतरराष्ट्रीय विपणन व्यवस्थापक (International marketing manager)

आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक (International sales manager)

जागतिक पुरवठा साखळी व्यवस्थापक (Global supply chain manager)

आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार (International business consultant)

आंतरराष्ट्रीय व्यवसाय विकास तज्ञ (International business development specialist)

आंतरराष्ट्रीय व्यवसाय आर्थिक विश्लेषक (International business financial analyst)

जनसंपर्क व्यवस्थापक (Public relations manager)

लॉजिस्टिक मॅनेजर (Logistics manager)

मानव संसाधन व्यवस्थापक (Human resources manager)

गुंतवणूक बँकर किंवा विश्लेषक (Investment banker or analyst)

International Business (Master) डिग्री नंतरचे जॉब रोल्स

परराष्ट्र सेवा अधिकारी (Foreign service officer)-UPSC देऊन

राजनैतिक सुरक्षा तज्ञ (Diplomatic security specialist)-स्पर्धा परीक्षा देऊन 

आंतरराष्ट्रीय व्यापार विशेषज्ञ (International trade specialist)

जागतिक विपणन व्यवस्थापक (Global marketing manager)

आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापक (International business manager)

गुंतवणूकदार संबंध विशेषज्ञ (Investor relations specialist)

जागतिक संशोधन संचालक (Global research director)

माहिती सुरक्षा व्यवस्थापक (Information security manager)

कॉर्पोरेट गुंतवणूक बँकर (Corporate investment banker)

International Business (MBA) डिग्री नंतरचे जॉब रोल्स

आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक (International sales manager)

जागतिक विपणन संचालक (Global marketing director)

आंतरराष्ट्रीय व्यापार अनुपालन व्यवस्थापक (International trade compliance manager)

आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स व्यवस्थापक (International logistics manager)

ब्रँड आणि उत्पादन विकास समन्वयक (Brand and product development coordinator)

पुरवठा साखळी व्यवस्थापन संचालक (Supply chain management director)

आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापक (International human resources manager)

International Business (DBA-Phd) डिग्री नंतरचे जॉब रोल्स

मुख्य जागतिक अधिकारी (Chief global officer)

जागतिक व्यवसाय विकास संचालक (Global business development director)

आंतरराष्ट्रीय व्यापार अनुपालन व्यवस्थापक (International trade compliance manager)

ग्लोबल ऑपरेशन्स डायरेक्टर (Global operations director)

आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे प्राध्यापक (International business professor)

आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार (International management consultant)

लॉजिस्टिक विश्लेषक (Logistics analyst)

संस्थात्मक विकास व्यवस्थापक (Organizational development manager)

2. नेटवर्किंग आणि अनुभव (Networking and Experience):

उद्योग परिषद (Industrial Council), कार्यशाळा आणि नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये सहभाग घ्या.

बहुराष्ट्रीय (MNC) कंपन्यांमध्ये इंटर्नशिप किंवा एंट्री-लेव्हल पदे (Degree) मिळवा.

क्षेत्रातील व्यावसायिकांशी संबंध (Relations) निर्माण करा.

3. कौशल्य शिका (Learn Skills):

उत्तम संप्रेषण कौशल्ये (Communication Skills) विकसित करा.

जागतिक पुरवठा साखळी (World Supply Chain), लॉजिस्टिक्स आणि मार्केटिंग समजून घ्या.

आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि आर्थिक घडामोडींवर अद्ययावत रहा.

इंटरनॅशनल बिझनेसचे फ्री कोर्सेस (Free Courses of International Business)

1. Alison चा Introduction to International Business फ्री कोर्स- 

तुम्ही काय शिकाल?

1. इंटरनॅशनल बिझनेसमधील आव्हाने

2. सीमेच्या पलीकडील व्यापार

3. आंतरराष्ट्रीय मार्केटिंगमधील सध्याचा ट्रेंड (नवीन मार्केट शोधण्यासाठी)

4. आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी फायनान्स मधील कौशल्य

5. इंटरनॅशनल बिजनेसमध्ये प्रवेश करण्यासाठी पद्धती

कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓

2. Alison चा Introduction to International Business फ्री कोर्स- 

तुम्ही काय शिकाल?

1.आंतरराष्ट्रीय मार्केटमधील गुंतागुंत समजून घेणे

2. इंटरनॅशनल बिझनेसमधील खाजगीकरण

3. MNC कॉर्पोरेशन

4. “घटक गतिशीलता” (component mobility) ची संकल्पना समजून घ्या

5. इंटरनॅशनल बिझनेसमधील उत्पन्नाचा प्रसार

कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓

3. Class Central चा International Business फ्री कोर्स– 

तुम्ही काय शिकाल?

1. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि ट्रेड थिअरी

2. ग्लोबल कॅपिटल मार्केट्स आणि प्रादेशिक व्यापारामधील क्षेत्र

3. आंतरराष्ट्रीय व्यवसायातील धोरणे

4. आंतरराष्ट्रीय व्यवसायातील साधने आणि करार

कोर्सवर जाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा↓

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment