जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात दिगंत यश मिळवणारे पण झोप हरवलेले काही नामवंत लोक!

नेपोलियन बोनापार्ट/Napoleon Bonaparte
निद्राराणीला प्रसत्र करण्याकरिता लिंकन “व्हाइट हाऊसच्या” (अमेरिकेचं राष्ट्रपतीभवन) हिरवळीवर शतपावल्या घालायचे; पण रात्रीची झोप हे त्यांचं स्वप्न-किंबहुना दुःस्वप्नच ठरलं. चक्रवर्ती म्हणून गौरवानं उल्लेख होणाऱ्या नेपोलियननं लढायमागुन लढाया जिंकल्या, पण झोपेबरोबरची लढाई त्याला जन्मधर जिंकलता आली नाही. निद्रानाशामुळे त्याला दिवसभर डुलक्या यायच्या. त्यातूनच त्याच्याबद्दलची, घोड्यावर बसूनही झोप घेण्याची आख्यायिका जन्माला आली. दुपारच्या जड जेवणानंतर नेपोलियनला खरी झोप लागत असे. आयुष्यातली वॉटरलू अखेरची व ऐतिहासिक लवाई हरण्याच्या आदल्या रात्री मात्र नेपोलियनला खरी झोप लागली; पण दुसन्या दिवशी ती काळझोप ठरली.

मेरिलीन मनरो/marilyn monroe
आपल्या अनुपम लावण्यानं आणि लाडिक, नखरेल अदांनी उभ्या जगातल्या पुरुषांची झोप उडवणा-या मेरिलीन मनरो हॉलिवूडच्या सुंदर तारकेला झोप येत नसे. झोपेच्या गोळ्या घेण्याची तिची सवय दिवसेंदिवस (की रात्रन् रात्र) वाढत गेली, आणि दुर्दैवी त्याच्या ओवर डोसमुळेच १९६२ मध्ये तिचा मृत्यू झाला.
हृषिकेश मुखर्जीच्या ‘अभिमान” मध्ये एक सुंदर वाक्य आहे. त्याचा आशय आहे; देव माणसाला भरभरून सुख आणि संपत्ती देतो, पण त्या बदल्यात त्याची झोप काढून घेतो. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत अजरामर कीर्ती व अविस्मरणीय यश मिळवणान्या नेपोलियनसारख्या जगजेत्याला आणि मेरिलिन मनरोसारख्या सौदर्यशालिनीला झोप मिळवता आली नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे अमेरिकेतलीच नव्हे, तर सबंध जगातली सामर्थ्यवान व्यक्ति. पण अमेरिकेचा सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्ष म्हणून गौरवल्या गेलेल्या अग्राहम लिंकन यांना रात्रीच्या रात्री झोपेविना तळमळून काढाव्या लागायच्या.

शेक्सपीअर/Shakespeare
जगविख्यात अजरामर लेखक शेक्सपीअरला फक्त रात्रीच लेखनाची स्फूर्ती मिळायची. नीरव शांततेमुळे व निवांतपणामुळे तो रात्रभर झपाटल्यासारखा लिहीत रहायचा. त्यामुळे सरस्वती व लक्ष्मी देवता त्याच्यावर प्रसन्न झाल्या; पण निद्रादेवता रुसली ती कायमची!
चार्ल्स डिकन्स या दुसन्या प्रतिभावंत आणि जगतमान्य लेखकालाही आयुष्यभर झोप म्हणजे काय, हे कळल नाही.
त्यामुळेच की काय त्याच्या एका कादंबरीची सुरवात झोप न लागण्यामुळे होणारी जीवाची तळमळ सांगण्यावरून होते.
शेक्सपिअरप्रमाणेच डिकन्सनं अनिद्रेचा काळ रात्रभर लिहिण्यात आणि त्यापेक्षाही लंडन शहर पायी फिरून पालथ घालण्यात कारणी लावला. आणि त्याच्या अनेक कलाकृतीच्या कथा आणि व्यक्तिरेखा त्याला या रात्रीच्या भटकंतीतच गवसल्या!

व्हिन्सेंट वॅन गॉग/Vincent van Gogh
व्हिन्सेंट वॅन गॉग हा अलौकिक चित्रकार तर झोपेनं आयुष्यभर पुकारलेल्या असहकारामुळे अखेर वेडापिसा झाला आणि सरतेशेवटी त्यानं आत्मघात करून घेतला.
झोप यावी म्हणून तो रोज रात्री खोलीत ढीगभर कापूर जाळायचा; पण त्याचा तीळमात्र उपयोग झाला नाही. त्याच्या डोळ्यांची आणि झोपेची अखेरपर्यंत भेट झालीच नाही कधीच नाहीच!
आपण काय शिकावे?
भारतातही असे काही नामवंत निद्रानाशवंत आहेत. त्यात बॉलिवूडकरांचा अर्थातच अग्रक्रम आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये रात्रभर बालणारी शूटिंग्ज आणि पार्ट्या यांच्यामुळे यांना रात्री झोप येत नाही, राज कपूर, दिलीपकुमार, शाहरु खान, बच्चन हे या प्रांतातही सुपर स्टार आहेत. पैशाने अॅवॉईस विकत घेता येतात पण झोपेच औषधं नाही. हे बॉलिवूडमपत्या बऱ्याचजणांना उशिरा का होईना कळते, (वळत मात्र काहीच नाही)
बॉलीवुडच नव्हे तर इतर क्षेत्रातील लोकही ह्या दुर्दैवापासून लांब नाही. खरतर ह्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही. पण बॅलेन्स मात्र आपल्या हातात आहे. म्हणूनच पैशाची हाव असो वा नसो दोघांचा अतिरेक हा वाईटच. म्हणूनच जीवनामध्ये समतोल राखता आला पाहिजे. ज्याला ते जमलं किंवा जमवत आहे तोच सुखी आहे.