2006-07 च्या सुमारास, सचिन आणि बिन्नी बन्सल या दोन मित्रांच्या लक्षात आले की, भारतातील लोकांना हवी ती पुस्तके सहज शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी Flipkart नावाची E-commerce वेबसाइट सुरू केली, सुरुवातीला पुस्तकांची ऑनलाइन विक्री केली. ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याची संकल्पना नवीन होती आणि नेहमीप्रमाणेच अनेकांना शंकासुद्धा होती.
पण जसजसे इंटरनेटचा वापर वाढला आणि अधिकाधिक लोक डिजिटल पेमेंटसाठी सोयीस्कर झाले, फ्लिपकार्टने पुस्तकांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि अशा बऱ्याच प्रॉडक्टची उपलब्धता वाढवली. काही वर्षांतच, Flipkart भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक बनले. पारंपारिक स्टोअर्स पोहोचत नसलेल्या ठिकाणीही खरेदीच्या सवयी बदलून ई-कॉमर्सने कशी जादू केली आणि नवीन व्यवसायाच्या संधी कशा उघडू शकतात हे त्यांचा प्रवास दाखवतो. आणि आज तुम्ही पाहतच आहात की Amazon, Myntra, IndiaMart, BookMyShow, Zomato अशा कितीतरी E-commerce प्लॅटफॉर्म शिवाय भारताची कल्पना करणे अशक्य झाले आहे. अशा एवर ग्रीन ई-कॉमर्सचे कधीही न ऐकलेले आणि महत्त्वाचे जॉब रोल्स पहा.
Table of Contents
ToggleDigital Marketing Manager - सॅलरी प्रति
वर्ष Rs.12.7 Lakhs
डिजिटल मार्केटिंग मॅनेजर कंपनीच्या ऑनलाइन मार्केटिंग ऑपरेशन्सवर देखरेख करतात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी प्रॉडक्ट/सर्व्हिस वेबसाइट कंटेंट, जाहिराती (Ads) आणि सोशल मीडिया अशा महत्त्वाच्या गोष्टी तयार करतात आणि त्यावर देखरेख ठेवतात.
हे SEO, कंटेंट स्पेशलिस्ट, ग्राफिक्स, UX डिझायनिंग आणि प्रॉडक्ट मार्केटिंगच्या टीमचे नेतृत्व करतात.
उद्योगातील ट्रेंड आणि सर्वोत्तम पद्धती समजून घेतात आणि धावत्या जगासोबत अपडेटेड राहतात.
ईकॉमर्स मधील हा महत्त्वाचा जॉब रोल कंपनीची ब्रँड इमेज, पोझिशनिंग आणि ऑनलाइन उपस्थिती कशी उत्तम ठेवता येईल याकडे लक्ष देतो.
Merchandising Manager - सॅलरी प्रति वर्ष Rs.11.5 Lakhs
मर्चंडायझिंग मॅनेजर ईकॉमर्स स्टोअरसाठी ऑनलाइन कंटेंट क्रिएशन आणि त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देतात.
उत्तम कंटेंट आणि कस्टमरला दिसणाऱ्या प्रॉडक्टचे वर्गीकरण करण्यासाठी कंटेंट रायटर, SEO स्पेशलिस्ट आणि ग्राफिक/UX डिझाइनर यांच्या टीमचे नेतृत्व करतात.
ई-कॉमर्स मर्चेंडायझिंग मॅनेजर सेल्स आणि रेवेन्यू वाढवण्यासाठी ऑनलाइन खरेदीचा अनुभव (Online Shopping Experience) तयार करण्यासाठी काम करतात.
ते प्रॉडक्ट निवडतात आणि प्रदर्शित (Show) करतात, किमती सेट करतात, इन्व्हेंटरी व्यवस्थापित करतात आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवण्यासाठी ऑनलाईन स्टोअरवर प्रॉडक्ट छानपणे दाखवतात.
ऑनलाइन स्टोअर दिसायला आकर्षक, सुव्यवस्थित आणि डिमांड असलेल्या प्रॉडक्टचा साठा आहे की नाही याकडे लक्ष देण्याचे त्यांचे काम असते.
Ecommerce Project Manager -सॅलरी प्रति वर्ष Rs.13 Lakhs
प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टची नीट रणनीती आखून ठरवलेल्या वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करून देण्याचे काम करतात.
टीम बनवणे, टीमला काम देणे, डेडलाईन्स मॅनेज करणे आणि क्लायंट्ना आनंदी ठेवण्यासोबतच टीम कामाच्या ओझ्याखाली येणार नाही याची खात्री करण्याचे काम ई-कॉमर्स प्रोजेक्ट मॅनेजर करतात.
प्रोजेक्ट मॅनेजर मार्केट रिसर्च करतात, स्टेकहोल्डर्सच्या (वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लीडरच्या) अपेक्षा (Expectations) हाताळतात
प्रोसेसच्या टेस्टिंगमध्ये सहभागी होतात आणि क्वालिटी चेक करतात.
Supply Chain Manager -सॅलरी प्रति वर्ष Rs.14.5 Lakhs
सप्लाय चेन मॅनेजर सप्लाय चेन धोरण (Strategy) डेव्हलप करतात आणि त्यावर देखरेख करतात.
ते सप्लायर सोबत चांगले संबंध राखतात आणि सप्लाय चेनची कामे विशिष्ट वेळेत सुरळीतपणे चालत आहेत की नाही याची खात्री करतात.
SCM मॅनेजरला सप्लाय चेन, लॉजिस्टिक प्रोसेसचे चांगले ज्ञान असणे आणि ERP (Enterprise Resource Planning) सारख्या संबंधित सॉफ्टवेअरची तांत्रिक माहिती असणे आवश्यक असते.
हे प्रॉडक्टच्या इन्व्हेंटरीचे (साठवण) व्यवस्थापन करतात त्याचबरोबर प्रॉडक्टची ऑर्डर आणि रिटर्न ट्रॅक करतात (लक्ष देतात)
प्रोसेस सुधारणांसाठी डेटाचे ॲनॅलिसिस करतात व ग्राहकांपर्यंत प्रॉडक्ट किफायतशीरपणे पोहोचवतात,ज्यामुळे ग्राहकांचे समाधान वाढते आणि त्यासोबतच व्यवसायामध्ये वाढ होते.
Customer Service Manager -सॅलरी प्रति वर्ष Rs.8 Lakhs
कस्टमर सर्विस मॅनेजर कस्टमरच्या तक्रारी समजून घेतात आणि समस्यांचे निराकरण करतात. त्यांच्या प्रश्नांसाठी उपयुक्त साधने तयार करतात.
टीम मेंबर्सना ट्रेनिंग आणि कोचिंग पुरवतात त्यासोबतच टीमला दिलेल्या कामावर लक्ष ठेवतात(रिस्पॉन्स टाईम, प्रॉब्लेम सॉल्विंग टाईम)
प्रोसेस आणि कार्यप्रवाह (Workflow) सुधारतात. इतर डिपार्टमेंटसोबत (सेल्स, मार्केटिंग, लॉजिस्टिक) काम करतात.
सर्विस स्टॅंडर्ड आणि पॉलिसी सेट करतात व व्यवसायातील सुधारणांसाठी ग्राहकांच्या फीडबॅकचे ॲनालिसिस करतात.
Financial Manager -सॅलरी प्रति वर्ष Rs.11 Lakhs
व्यवसायाचे ॲनालिसिस करणे, बजेटचे नियोजन करणे आणि व्यवसायाच्या विविध क्षेत्रांमध्ये बजेटचे वाटप करणे ही ईकॉमर्स फायनान्शियल मॅनेजरची मुख्य जबाबदारी असते.
आर्थिक नियोजन, अंदाजपत्रक (budgeting) आणि फायनान्शिअल अंदाज ठरवतात व विक्री (Sales), महसूल (revenue) आणि खर्चाचे (expenses) ॲनालिसिस करतात
किमतीची धोरणे (Pricing strategies) ऑप्टिमाइझ करतात व आर्थिक जोखीम ओळखून ती कमी करण्यास प्राधान्य देतात
व्यावसायिक निर्णयांसाठी फायनान्शिअल इनसाइट्स पुरवतात त्यासोबतच कर (Tax), ऑडिटिंग आणि फायनान्शिअल नियमांचे पालन करून व्यवसायास भर देतात
फक्त क्लिक करा आणि वाचा
Quality Assurance Analyst -सॅलरी प्रति वर्ष Rs.6 Lakhs
ई-कॉमर्स क्वालिटी ॲश्युरन्स (QA) ॲनालिस्ट वेबसाइट परफॉर्मन्स, पेमेंट प्रोसेसिंग, मोबाइल ॲप्स आणि सॉफ्टवेअर इंटिग्रेशन्सची टेस्ट आणि पडताळणी करून ऑनलाइन शॉपिंग अनुभव अखंड आणि त्रुटीमुक्त (Error-free) असण्याकडे लक्ष देतात.
ते समस्या ओळखतात आणि टेक्निकल टीमला पाठवतात, प्रॉब्लेमचे सोल्युशन उत्तम आहे की नाही याची पडताळणी करतात आणि एक विश्वासार्ह, सुरक्षित आणि युजर फ्रेंडली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी सुरक्षितता आणि फंक्शनालिटीची (कसे चालत आहे) याची तपासणी करतात, ज्यामुळे ग्राहकांना सहज आणि त्रासमुक्त खरेदीचा अनुभव मिळतो.
Customer Service Representative (CSR) -सॅलरी प्रति वर्ष Rs.5 Lakhs
ई-कॉमर्समधील ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) विविध माध्यमांद्वारे (फोन, ईमेल, चॅट) ग्राहकांना वेळेवर आणि उपयुक्त अशी मदत पुरवतात.
ते समस्यांचे निराकरण (Resolve) करतात, प्रॉडक्ट संबंधित प्रश्नांची उत्तरे देतात, रिफंड प्रोसेस करतात आणि खरेदीचा सकारात्मक अनुभव सुनिश्चित करतात.
CSRs ग्राहकांचे फीडबॅक ऐकतात, ग्राहकांच्या चिंतेबद्दल सहानुभूती देतात आणि विश्वास, निष्ठा व ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी वैयक्तिकृत उपाय करतात ज्यामुळे ब्रँड व्हॅल्यू जपण्यास मदत होते.