आजकालच्या सोशल मीडियाच्या (Social Media Networking) हवेमुळे तुम्हाला हा प्रश्न पडलाच असणार की सोशल मीडिया हा शाप आहे की वरदान? ते म्हणतात ना, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तसेच ह्या सोशल मीडियाचेही काही चांगले आणि वाईट पैलू आहेत, ज्यावर आपण प्रकाश टाकला पाहिजे. हजारो वाईट गोष्टी आहेत सोशल मीडिया मुळे जसे की वेळ वाया जाणे, शरीरावर परिणाम होणे, एकाग्रता कमी होणे,वगैरे. परंतु सोशल मीडियाच्या सकारात्मक बाजूकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
पूर्वीच्या पारंपारिक नोकरी शोधण्याच्या पद्धती आत्ता बदलत आहेत, जसे की रेझ्युमे किंवा कव्हर लेटर पाठवणे, जॉब फेअरला उपस्थित राहणे आणि तोंडी केलेल्या शिफारशींवर अवलंबून राहणे, जे की सर्व वेळखाऊ आणि हळू होते. आजच्या जगात जिथे आपण डिजिटल पद्धतीने प्रगती करीत आहोत, तिथे असे वाटते की AI लवकरच आपणासर्वांची मुलाखत घेईल. म्हणूनच या डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी तयार असले पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही का?
आजच्या तुलनेत आधी आपल्याकडे जास्त वेळ होता त्यामुळे संथ गतीने चालणारी प्रक्रिया तशी चांगली होती. परंतु ,आजच्या ह्या सर्वात वेगवान जगात आपण त्याचीच पुनरावृत्ती करू शकत नाही म्हणून आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले डिजिटल प्लॅटफॉर्म जसे की Twitter, LinkedIn, Instagram आणि Facebook वापरणे आवश्यक आहे.
त्याचा वापर करून नोकरी शोधणे आवश्यक आहे! परंतु बऱ्याचदा माहीत नसते ते कसे करावे? त्याची काही ठराविक पद्धत असते का? पहिली स्टेप काय असेल? काळजी करू नका!
ह्या सर्वांची उत्तरे तुम्हाला येथे मिळून जातील, तर पुढे जरूर वाचा !
Table of Contents
Toggleजॉब शोधण्यासाठी मी सोशल मीडियाचा वापर कसा करू शकतो ? | How do I use social media to find a job?

फोर्ब्समध्ये प्रकाशित झालेल्या रीपोर्टनुसार,“सोशल मीडिया केवळ वैयक्तिक संवादासाठीच नाही तर व्यावसायिक प्रगतीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे”.म्हणून आपल्या स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून सोशल मीडियाच्या सामर्थ्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
जर्नल ऑफ इन्फॉर्मेशन सायन्सच्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, नोकरी शोधण्यासाठी वारंवार केलेला सोशल मीडियाचा वापर मुलाखतीचे आमंत्रण सोबत घेऊन येतो. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, बहुतेक नोकरी शोधणारे लोक सोशल मीडियाचा वापर फक्त अधूनमधून करतात, पण जर त्यांना एखाद्या व्यावसायिकाने असे वारंवार करण्याचा सल्ला दिला तर त्याच्या वापरात वाढण्याची शक्यता जास्त असते.
फ्युचर बिझनेस जर्नलच्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एम्प्लॉयरचे आकर्षण आणि नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या Gen Z यांच्यातील संबंध वाढवण्यासाठी मध्यस्थी करते. कंपन्या त्यांच्या गरजांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि नवीन होतकरू तरूणांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियाचा फायदा घेतात.
ह्या प्रोसेसमध्ये पारदर्शकता जास्त असते. दोघेही एकमेकांचे प्रोफाइल चेक करून लगेचच निर्णय घेऊ शकतात.
2018 च्या सर्वेक्षणानुसार, 70% एम्प्लॉयर अर्जदारांची तपासणी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. आणि अंदाजे 43% कर्मचारी जॉब बदलण्यासाठी सोशल मीडिया तपासत राहतात!
तुम्ही कितीही हुशार, अभ्यासू, एकटे राहणारे असाल तरी हा एक सल्ला असेल की तुमच्याकडे सोशल मीडिया अकाऊंट असायलाच हवे! हे युग त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे काहीही नसेल तर ते प्रेझेंट करू शकतील. आणि जर तुमच्याकडे टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स असतील तर सोशल मीडियाला तुमच्यासाठी प्राधान्यच असायला हवे. तसेच कोणतीही जागा रिक्त असल्यास थेट कंपनीच्या एम्प्लॉयरपर्यंत पोहोचणेच योग्य ठरेल.
सोशल मीडियावर जॉब सर्च करताना खालील स्टेप्स वापरा!
1. सोशल मीडियावर खाते तयार करणे
केवळ फोटो पोस्ट करण्यासाठी बेसिक अकाऊंट तयार करू नका. त्यामध्ये तुमची सर्व कौशल्ये, उपलब्धी, प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक प्रकल्पांचे वर्णन करणारे एक प्रोफेशनल अकाऊंट तयार करा. तुमचे सर्व शैक्षणिक तपशील आणि कॉलेजमधील प्रोजेक्ट्सची यादी पोस्ट करा.
1. उत्कृष्ट Bio 2.कंपनी/कॉलेजचे नाव 3.प्रोजेक्ट/क्लाईंट नंबर

2. तुमचे कनेक्शन विस्तृत करा
तुमच्या व्यवसायाशी निगडीत एक उत्तम प्रोफेशनल सर्कल तयार करण्यासाठी शक्य तितक्या दररोज कनेक्शन पाठवा आणि अॅक्सेप्ट करा. विशेषतः फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर. तसेच, तुमच्या विशिष्ट उद्योगातील संबंधित गटांमध्ये सामील व्हा.

3. तुम्ही कोण आहात हे दाखवा
विशेषत: तुमची कौशल्ये दाखवण्यासाठी Instagram, LinkedIn किंवा Facebook पेज तयार करा. वर्तमान ट्रेंड तपासा आणि संबंधित पोस्ट तयार करा.
जर तुम्ही engineer असाल तर तुमच्या प्रकल्पांची चित्रे दाखवू शकता, लेखक असाल तर, दररोज विविध नमुने,विडियो पोस्ट करू शकता.

4. चर्चेत सहभागी व्हा
जर तुम्हाला एखाद्याने केलेली पोस्ट किंवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. कारण तुमच्या सारख्याच त्या व्यक्तीनेही लोकांचे लक्ष वेधण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते. अशाप्रकरे ते दररोज लोकांना मदत करीत असतात. तुमची एक कमेन्ट एखाद्याचा दिवस बनवू शकते. तसेच, गटांमध्ये संभाषण करा आणि आपले मत मांडा. ग्राउंड रिॲलिटी तपासण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी वेबिनार आणि सेमिनारमध्ये देखील सामील व्हा.

5. गरुडासारखी नजर ठेवा
तुमच्या क्षेत्रात आणि आवडीच्या क्षेत्रात येणाऱ्या ट्रेंडिंग तंत्रज्ञानावर लक्ष ठेवा.त्याबद्दल स्वतःला अपडेट ठेवा. उदा., ChatGPT, GEMINI, व इतर AI TOOLS . अशा लोकांचे अनुसरण करा जे नवीन गोष्टी आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. त्यांच्या कृती, पोस्ट, व्हिडिओंवर टिप्पणी द्या. वास्तविकता तपासण्यासाठी प्रश्न विचारा.
