ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?

इंटरनेटवर तुम्हाला हजारो लेख सापडतील ज्यामध्ये 3 महिन्यांत, 6 महिन्यांत भाषा शिकता येते असे म्हटले जाते. पण हे सर्व खोटं आहे. एखादी गोष्ट मग ती भाषा असुदे किंवा टेक्निक असुदे तिला बेसिक पासूनच शिकणे योग्य ठरते. जर तुमचे फाऊंडेशन मजबूत असेल तर इमारत भक्कम तयार होते. कोणती पण गोष्ट की एखाद्या विषयाशी निगडीत असते आणि ही विषय 4 श्रेणीमध्ये विभागलेले असतात. ते समजून घेणे आवश्यक आहे. त्या चार श्रेणी खालीलप्रमाणे:

How to learn any language?

श्रेणी 1: हे असे विषय असतात, ज्यामध्ये Concept क्लियर असणे गरजेचे असते. जसे की,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, थर्मोडायनॅमिक्स,मशीन लर्निंग ह्यामध्ये संकल्पनांची समज असणे आवश्यक असते. 

श्रेणी 2: हे असे विषय असतात, ज्यामध्ये आठवणीत ठेवण्याची, स्मरणशक्ती स्ट्रॉंग ठेवण्याची गरज लागते. या विषयांना स्मरणशक्ती वाढवणाऱ्या सोप्या पद्धती (menemonics) चा वापर करून लक्षात ठेवता येते. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी या श्रेणीत येतात.

श्रेणी 3: या तिसऱ्या श्रेणीमध्ये भाषा येतात.भाषांची एक संपूर्ण वेगळी श्रेणी आहे. कारण त्यामध्ये मिक्सचर ऑफ ऑल म्हणजेच, ग्रॅमर(Grammer) ज्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे, काही विषय असे असतात जिथे रुल्स जसेच्या तसे मुलांना पाठ करावेच लागतात. जसा की इंग्लिश. त्यानंतर भाषेवर पूर्ण कमांड येण्याकरीता निरंतर प्रॅक्टिसची गरज असते. 

श्रेणी 4: या श्रेणीमध्ये अनुप्रयोग-आधारित विषय येतात. जसे की गणित, लेखा (अकाउंटिंग) आणि यंत्रशास्त्र. असे विषय ज्यांचा प्रत्यक्ष जीवन किंवा व्यवहारात उपयोग होतो. या विषयांमध्ये शिकलेल्या ज्ञानाचा वापर करून समस्या सोडवणे, निर्णय घेणे किंवा नवीन गोष्टी तयार करणे असते. थोडक्यात शिकलेल्या कन्सेप्टचे फायदे अंमलात आणणे. 

तिसऱ्या श्रेणीला पुढे अजून 4 भागांमध्ये विभागून समजून घेऊ,

नवीन भाषा शिकण्यासाठी चार मूलभूत कौशल्य आवश्यक आहेत:

  1. वाचन
  2. लेखन
  3. बोलणे
  4. ऐकणे

आता, मित्रांनो, कृपया येथे लक्षात ठेवा की खऱ्या प्रगतीला वेळ लागतो. आणि कोणतीही भाषा शिकण्यासाठी सराव व ती भाषा समजून घेण्याची गरज असते. जसे की, इंग्रजीच्या बाबतीत Tense हा भाग खूप महत्वाचा असतो. त्यावरच इंग्रजी वाक्यांचे स्ट्रक्चर अवलंबून असते. फक्त इंग्रजी नाहीच तर साऱ्या भाषांमध्ये Grammer खूप महत्वाचा पाया आहे. ज्यामुळे त्या वाक्यांचा काळ समजतो. 

“Through practice, gently and gradually we can collect ourselves and learn how to be more fully with what we do.” — Jack Kornfield

मी एखादी भाषा कशी शिकू? How to learn any language?

तुम्ही उच्चार, स्वर आणि बोलण्याच्या शैली (जसे की तुम्ही अनुकरण आणि नक्कल करू शकता) समजून घेतल्यावर कोणतीही भाषा बोलू शकता.

परंतु लिहिणे आणि वाचणे यासाठी तुम्हाला मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

तर हे तुम्ही कसे कराल?

चला, तर मग हे शोधूयात.. 

आपण शिकण्याच्या प्रक्रियेला तीन टप्प्यांमध्ये विभागून घेऊ: अ) नवशिक्या(Beginner) ब) मध्यवर्ती (Intermediate) क) प्रगत(Advanced)

जर तुम्ही एखादी नवीन भाषा शिकत असाल आणि त्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसेल किंवा कमी माहिती असेल, तर तुम्ही नवशिक्या श्रेणीत आहात आणि मग तुमचे लक्ष्य खूप सोपे आहे: तुम्हाला समजायला सोपे आणि सरळ असणाऱ्या वाक्यांची वारंवार उजळणी करायची आहे. तुम्ही ते कुठून सुरू कराल? कोणत्या पैलूवर तुम्हाला जास्त काम करायचे आहे ह्याचा विचार करा! कारण भाषा ही वैयक्तिक आहे. आपण नेहमी स्वत:ला वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल काळजी करतो म्हणूनच आपल्यालाच माहिती असते, की भाषा शिकण्यासाठी काय आवश्यक आहे. इंटरनेटवर भरपूर साधने उपलब्ध आहेत परंतु येथे मी तुम्हाला काही मोफत मार्गदर्शक प्रदान करेन ज्यातून तुम्ही शिकायला सुरुवात तर नक्कीच कराल.

याबद्दल माहिती प्रदान करताना, मला विचार आला होता की मी तुम्हाला भाषा शिकण्यास मदत करणारी साइट्स, प्लॅटफॉर्म किंवा ॲप्सबद्दल सांगितले तर? जर मी इतरांनी सांगितलेले तेच रोजचे पर्याय सांगितले तर? पण नंतर मनात प्रश्न आला की मी मग असे काय वेगळे करत आहे? अश्या प्लॅटफॉर्मसचा वापर केला पहिजे जिथे पैसे द्यावे लागणार नाही.

हे जग मशीन लर्निंगचे आहे व आपण 21व्या शतकात जगात आहोत आणि आजूबाजूला चॅटजीपीटी सारखे AI टूल तर मग त्याचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी आणि स्वत:ला सुधारण्यासाठी का करू नये?

चला, तर मग ह्याचा उलगडा आपण मिळून करुयात…

प्रथम, तुम्ही भाषा कशी दिसते, तिची वर्णमाला, अक्षरे, मूलभूत व्याकरण काय आहे हे समजून घ्या. इत्यादींची कल्पना मिळवण्यासाठी अशा मूलभूत प्रॉम्प्ट्ससह सुरुवात करू शकता.

ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?
gemini.google.com

दैनंदिन जीवनातील काही शब्द किंवा अक्षरांचे काही मूलभूत अर्थ समजून घ्या. मग तुम्ही संभाषण सुरू करू  शकता आणि त्याच वेळी व्याकरणाबद्दल शंकाही विचारू शकता.

ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?
gemini.google.com
ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?
gemini.google.com

ज्याला परदेशी भाषा बोलता येते अश्या मित्रांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण तुम्ही ChatGPT शी अगदी मित्रासारख्या टोणमध्ये कोणत्या परदेशी भाषेत संवाद साधू शकता. Gemini मध्ये तर स्पीकर चा ऑप्शन असल्याने तुम्ही उच्चार सुद्धा तपासून पाहू शकता. Google Gemini जवळजवळ 45 भाषांना प्रतिसाद देतो तर ChatGPT 80 भाषांना उत्तर देण्यास सक्षम आहे. 

आता येथे, आपण योग्य मार्गावर आहात की नाही ते तपासण्यासाठी, Duolingo आणि Memrise सारख्या ॲप्सचा वापर  करून चेक करा. त्यासाठी कोणतेही सब्स्क्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही.

आता बोलण्याकरिता, तुम्ही शब्दांचे उच्चार पुरुष आणि स्त्री आवाजात समजून घेण्यासाठी Forvo.com या साइटचा वापर करू शकता.

ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?
forvo.com

येथे सुरुवात करण्यासाठी काही टिप्स आहेत:

  1. वास्तविक लक्ष्ये ठेवा. एका रात्रीत एक्स्पर्ट होण्याची अपेक्षा करू नका.
  2. तुम्हाला योग्य असलेली पद्धत शोधा. भाषा शिकण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. कोणते तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करते ते शोधण्यासाठी प्रयोग करा.
  3. धैर्य धरा. भाषा शिकण्यास वेळ लागतो. जर तुम्हाला ताबडतोब परिणाम दिसले नाही तर हताश होऊ नका.
  4. मजा करा! भाषा शिकणे आनंददायक बनवण्याचे मार्ग शोधा. सापडत नसतील तर ते बनवा. शेवटी कोणतीही प्रोसेस मजेशीर बनवली तरच त्यात शेवट पर्यंत शिकता येते.
  5. तुम्ही शिकत असलेल्या परदेशी भाषेत चित्रपट पहा, संगीत ऐका किंवा पुस्तके वाचा.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment