स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

संधी मिळत नाही तर ती तयार केली जाते. – क्रिस ग्रोसर, फोटोग्राफर

परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून जॉब मिळत नाहीये, जॉब मिळाला पण मनासारखा जॉब रोल नाहीये, मनासारखा जॉब रोल आहे पण सॅलरी नीट नाहीये, सॅलरी नीट आहे पण त्यामध्ये वाढ होत नाहीये, जॉब अगदी मनासारखा चालत आहे पण जॉब सेक्युरिटी नाही, हातात लेऑफ चे लेटर कधी मिळेल याचा काही नेम नाही. असे एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा अशा प्रॉब्लेम्स ना प्रत्येक जण सामोरा जात आहे. 

तर मग काय करावे?

तर अशावेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे संधीची वाट न बघता संधी निर्माण करणे. जे आपल्याला नक्कीच चांगले जमते आणि ज्यामध्ये आपले मन रमते अशा गोष्टीचा पाठलाग करून स्वतःला उत्पन्न मिळवून देण्यासाठी वापर करावा.

स्वतःचा बिझनेस करा, स्वतःचे बॉस बना, स्वतःसाठी काम करा आणि स्वतः प्रॉफिट कमवा हे शब्द तुम्ही नक्कीच मित्रांकडून, नातेवाईकांकडून तर इतकच काय अगदी 9 to 5 नोकरी करणाऱ्या किंवा करून झालेल्या मोठ्या माणसांकडून तर नक्कीच ऐकले असावेत. 

पण नक्की सुरुवात कुठून करावी हे कोणी सांगत नाही, जे आवडते त्यात कोर्सेस करावे की स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी थेट पैशांची गुंतवणूक करावी. रिस्क घ्यावी तर कुठे आणि कधी घ्यावी. एकापेक्षा अधिक जास्त गोष्टी आवडत असतील तर मग नक्की कशामध्ये स्वतःचा बिझनेस सुरु करावा अशा सर्व प्रश्नांचा गोंधळ मनात उडल्या शिवाय राहत नाही. आणि इंटरनेटवर जेव्हा How to Start own Business असे जेव्हा तुम्ही टाइप करता तेव्हा आमच्या ह्या पोस्ट सारखे असंख्य पोस्ट तुम्हाला दिसतील. पण आम्ही नेमकी कोणती पाऊले उचलल्याने काय परिणाम होतील एवढेच सांगून तुमचं वेळ वाचवणार आहोत! 

त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या रिसर्च वरून तुमच्या स्वप्नासाठी नक्की काय गरजेचे आहे आणि ते तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये कसे समजेल तसेच तुम्ही तुमचा आवडता रस्ता कसा निर्माण कराल आणि त्यावर चालताना नक्की काय लक्षात ठेवणे गरजेचे आहे याची माहिती देण्यावरभर दिला आहे. पुढील 5 मिनिट मध्ये तुम्हाला चांगले इन्साइट्स मिळून जातील.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

कल्पना/ आयडिया (Idea Generation)

तर मित्रांनो, तुमचा व्यवसाय सुरू करण्याची किंवा स्टार्ट अप करण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचे आहे हे माहित असणे आवश्यक आहे. तुमची कल्पना (Idea) काय आहे?

बऱ्याच लोकांना असे वाटते की मला अशा कल्पनेचा विचार करणे आवश्यक आहे ज्याचा कोणीही कधीच विचार केला नसेल. पण ते थोडे अयोग्य ठरेल. त्याची याची दोन कारणे आहेत, पहिले कारण असे की ज्याचा कोणी विचार केला नसेल अशी आयडिया पटकन लक्षात येण्याची शक्यता फारच कमी आहे.आणि दुसरे महत्त्वाचे कारण हे की अशा प्रकारचा व्यवसाय जिथे जास्त कस्टमर नाहीत, कमाईचा स्रोत नाही आणि कोणीही कधीच टेस्ट आणि ट्रायल केले नाहीत, तसेच अशा एकदमच वेगळ्या प्रकारचे व्यवसाय केल्याने प्रॉफिट होतो की नाही हे सुद्धा माहीत नसेल तर हे खूप जोखमीचे काम आहे.

म्हणून मी तुम्हाला अशी शिफारस करतो की ज्याचा विचार कोणीही केला नसेल अशा कल्पनेचा विचार करण्यात वेळ वाया घालू नका किंबहुना तुम्हाला स्वतःला काय करायला आवडते याचा विचार करायला हवा.  

येथे मी तुम्हाला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करतो प्रथम, तुमची आवड काय आहे तुमची आवड म्हणजे तुम्हाला काय करायला आवडते. आणि दुसरी तुम्ही तुमच्या कामातून लोकांना मूल्य (व्हॅल्यू) कसे देऊ शकता आणि तुम्ही लोकांना फायदा कसा मिळवून देऊ शकता ज्यामुळे ते कस्टमरच्या रुपात तुम्हाला पैसे देण्यास तयार होतील याचा तुम्ही विचार करा. जेव्हा या दोन गोष्टी स्पष्ट होतात, तेव्हा तुम्ही पाहू शकता की कोणता व्यवसाय आधीपासून अस्तित्वात आहे जो या दोन गोष्टींशी जुळतो. मग अशा प्रकारचे व्यवसाय आधीच बाजारात आहेत आणि ते कसे चालतात याचा अभ्यास करा. 

या प्रोसेसला तुम्ही मार्केट मधील गॅप शोधणे सुद्धा म्हणू शकता. म्हणजे सध्याच्या काळात अशी गोष्ट जी मार्केटमध्ये अस्तित्वात नाहीये पण खूप गरजेची आहे.हे अधिक समजण्यासाठी तुम्ही खालील जिवंत उदाहरण पहा.

उदाहरण –

झोमॅटो आणि स्विगी (Zomato and Swiggy) – या आजच्या काळातील दोन मोठ्या कंपन्या आहेत. बरं यांच्या येण्याच्या अगोदर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट नव्हते का? टेस्टी जेवण कोणी बनवत नसेल का? जेवताना छान वातावरण नव्हते का? तर नाही हे सर्व होते पण ऑर्डर केल्यावर जवळजवळ अर्ध्या तासाच्या आत जेवण हातामध्ये पोहोचवणारे कोणी नव्हते. हाच तो मार्केटमधील छोटा वाटणारा गॅप उद्याच्या मोठ्या बिझनेस मध्ये रूपांतरित झाला  

आणि हा गॅप भरण्याचे काम या दोन कंपनीने केले. आजचा कस्टमर म्हणजे तुम्ही मी आपणास सर्वकाही वेगात हवे असते. सध्याच्या बिझी लाईफ मध्ये 15 मिनिटे मध्ये जेवण मिळणे ही नक्कीच व्हॅल्यूएबल गोष्ट आहे. त्यामुळेच या दोन कंपन्या आता खूप चांगला आणि प्रॉफिटेबल बिजनेस करत आहेत.

ओला अंड उबेर (OLA and Uber) – या कंपन्या का बर प्रगती करत आहेत? कारण तुम्ही 5-6 वर्षांपूर्वी एखादी रिक्षा किंवा टॅक्सी पकडण्यात जायचे म्हटले तर ती मिळणे खूप कठीण असायचे, मिळाली तर त्याचे भाडे जास्त असे, एखाद्या ठिकाणी पोहोचवण्यास चालक मनाई सुद्धा करत असत, कधी सुट्ट्या पैशांवरुन भांडण व्हायचे तर कधी शेअरिंग रिक्षा भरण्यासाठी एकट्याला अजून दोन जण येण्याची वाट पहावी लागत असेल. यात वेळच नाही तर पैसा सुद्धा खर्च होत असे. 

हाच छोटा मार्केट गॅप या दोन कंपन्यांनी सराईतपणे ओळखला आणि त्यानंतर जे काही झाले ते आता तुमच्यासमोर आहेच.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

काय, कसे व कशासाठी (What, Why and How)

सर्वात आधी एखादी आयडिया तुमच्या मनात आली असेल तर त्या आयडिया ने नक्की काय होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी “सिमोन सिनेक (Simon Sinek) हे असे सांगतात की खालील तीन शब्दांचा वापर करून बिजनेस अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करून प्रत्यक्षात तो कसा करता येईल हे तुम्ही पाहू शकता”.खाली तुम्हाला आम्ही एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये सिमक सिनेक यांनी What, How and Why यावर ॲपल कंपनीने स्वतचा बिझनेस लोकांच्या नजरेत मोठा कसा केला याचे गुपित सांगितले आहे. 

व्हिडिओनुसार Simon Sinek हे असे सांगतात की, मार्केटिंग करताना बहुतेक कंपन्या बाहेरून संवाद साधतात (Out to In) , ते काय करतात हे आधी सांगतात (उदा. त्यांच्या उत्पादनांची वैशिष्ट्ये/Product Features ) आणि नंतर ते का करतात हे सांगतात  (उदा. पैसे कमवण्यासाठी) याउलट Apple, ते जे करतात ते का करतात हे आधी सांगतात 

(उदा. त्यांचे यथास्थितीला/status quo आव्हान देणे) आणि नंतर ते कसे करतात (उदा. सुंदर डिझाइन केलेले संगणक बनवून) आतून बाहेर संवाद(In to Out) साधतात. ह्या व्हिडिओनुसार, ॲपल इतके यशस्वी का आहे? कारण Apple जे करते ते लोक विकत घेत नाहीत, Apple ते का करते ते लोकं विकत घेत आहेत.

“हयात Simon एक वाक्य वापरतात “challenge the status quo by Apple” याचा अर्थ;

Status Quo/स्थिती = सध्याची परिस्थिती, सध्या ज्या प्रकारे गोष्टी आहेत.
Challenge/आव्हान = प्रश्न करणे सध्याच्या परिस्थितीला, काहीतरी वेगळे मांडणे.

मार्केट रिसर्च (Market Research)

आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळू. मार्केट रिसर्च एकदा तुम्ही तुमच्या जर व्यवसायाची कल्पना  केली असेल तर त्याची मार्केट मधील रिसर्च करण्यास चालू करा. तुम्हाला तुमचे स्वतःचे मार्केट रिसर्च करावे लागेल तुमचे मार्केट आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष केंद्रित करा. आजकालच्या भरपूर बिझनेस मध्ये प्रतिस्पर्धी (Competitors) आहेतच. 

प्रतिस्पर्ध्यांचा एक मायनस पॉइंट आणि प्लस पॉइंट देखील आहे. मायनस पॉइंट म्हणजे असा की तुमच्या बिझनेसचे कस्टमर वाटले जातील आणि त्यामुळे तुम्हाला नफा (प्रॉफिट) सुद्धा कमी होईल. पण दुसरा चांगला भाग आहे की प्रतिस्पर्धी असल्यामुळे तुम्ही काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुमच्या स्किल्स मध्ये सुद्धा भर पडली जाईल जे उत्तम असेल आणि लॉंग टर्म असेल. त्याबरोबरच अजून एक चांगला मुद्दा हा की जुना प्रतिस्पर्धी असेल तर तुम्ही विचार करत असलेल्या बिजनेस मध्ये त्याने आधीच रिसर्च आणि ॲनालिसिस केला असेल त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईलच कारण तेच रिसर्च तुम्हाला पुन्हा करण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही छोटासा बिजनेस नक्कीच स्टार्ट करू शकाल.

यासाठी आपण दुसरे तिसरे कशाला एका मोबाईल फोनचेच उदाहरण घेऊ शकतो – 

मी बोलत आहे iphone बद्दल

उदाहरण-

iphone लॉन्च होण्याआधी ॲपल ने कस्टमरच्या गरजा किंवा अपेक्षा माहीत करून घेण्यासाठी एक उत्तम मार्केटिंग रिसर्च केला होता ज्यामध्ये त्यांनी कस्टमरला एखाद्या फोन मध्ये काय असणे गरजेचे आहे हे विचारले होते? तेव्हा त्यांना त्या मार्केट रिसर्च मधून असे समजले होते की कस्टमर ला असा डिवाइस (यंत्र) पाहिजे ज्यामधून कॉल लागेल, म्युझिक ऐकता येईल आणि त्यावर उत्तम प्रकारे इंटरनेट सर्फिंग करता येईल त्यावरून त्यांनी iphone बाजारात आणला आणि त्यामध्ये तेच फीचर्स टाकण्यास सुरुवात केली आणि खरोखरच त्यांची भरभराट होण्यास सुरुवात झाली. 

     “कारण कस्टमर हाच किंग असतो (Customer is King)”

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

लक्ष्यित प्रेक्षक (Target Audience/Customers)

कोणत्याही नवीन व्यवसायासाठी आपले लक्ष्यित प्रेक्षक (Target Audience) समजून घेणे महत्वाचे आहे. हे साधारणपणे लोकांच्या विशिष्ट गटावर फोकस करणे ज्यांना तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवांचा फायदा होण्याची शक्यता आहे. कल्पना करा की तुम्ही पार्टीत आहात. सर्वांशी एकाच वेळी बोलण्याऐवजी, तुम्ही कदाचित तुमच्या आवडी असलेल्या लोकांशी संभाषण सुरू कराल. तुमच्या व्यवसायासाठी प्रेक्षकांना लक्ष्य करणे हेच आहे. हे अशा लोकांच्या गटाला शोधण्याबद्दल आहे ज्यांना तुम्ही ऑफर करत असलेल्या गोष्टींचा सर्वाधिक फायदा होईल.

हे लक्ष्यित प्रेक्षक तुम्ही पुढील गोष्टींवरून चांगल्या प्रकारे ठरवू शकता- प्रेक्षक कोणत्या वयोगटातील आहेत? तुम्हाला कोणत्या लोकांना (Gents/Ladies ना) लक्ष्य करायचे आहे? मग ते शहरांत राहतात की खेड्यात. हे व असेच अनेक लक्ष्यित प्रेक्षक ठरवणारे घटक आहेत.

तुमचा व्यवसाय सुरू करताना तुमचे लक्ष्यित प्रेक्षक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला तुमचा मेसेज आणि मार्केटिंग त्यांच्याशी थेट जुळवून घेण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांची तुमच्या प्रॉडक्ट मध्ये आवड असण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या गरजा, इच्छा आणि सवयी समजून घेऊन तुम्ही त्यांची भाषा बोलू शकता आणि त्यांना पटवून देऊ शकता की तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा त्यांच्या समस्येवर योग्य उपाय आहे.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

बिझनेस प्लॅनिंग (Business Planning)

यानंतर पुढील पायरी म्हणजे व्यवसायाची योजना तयार करणे. त्याआधी तुमच्या बिझनेसचे मिशन आणि विजन सेट करा. Mission आणि vision सेट करणे म्हणजे तुमचा बिजनेस नक्की काय करू इच्छितो आणि लोकांवर कोणत्या प्रकारचा प्रभाव पाडू इच्छितो. तसेच लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये फायदा होईल हे निश्चित करणे.

बिझनेस प्लॅनिंग करताना समजा उद्यापासून तुम्ही तुमचा व्यवसाय उभा राहत आहे असे पाहत असाल, तर उद्यापासून वर्षअखेरीपर्यंत पूर्ण एक वर्षाचा अर्थसंकल्पीय अहवाल (बजेट रिपोर्ट) तयार करा.व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील, किती भांडवल आणि गुंतवणूक लागेल? आणि वर्षभरात किती खर्च होईल आणि तुम्हाला मिळणारा नफा किती असेल. आणि तुम्हाला आवश्यक असलेले भांडवल आणि पैसा कोठून मिळेल? तुम्ही तुमच्या मित्रांकडून कर्ज घ्याल, तुमच्या कुटुंबाला विचाराल किंवा बँकेकडून कर्ज घ्याल का? याची प्लॅनिंग करा.

असा व्यवसाय सुरू करा जिथे तुम्हाला बँकेकडून किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून कर्ज घेण्याची गरज नाही. एक असा व्यवसाय सुरू करा जिथे तुम्ही आणि तुमचे कुटुंब प्रारंभिक गुंतवणूक परवडण्यास सक्षम असेल. कारण जर तुम्ही बँकांमध्ये गेलात आणि तुमचा व्यवसाय बिघडला तर तुम्हाला मोठे नुकसान आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून अशा व्यवसायाचा विचार करा जिथे तुम्ही स्वतः गुंतवणूक करू शकता आणि तुमच्याकडे भांडवल असेल. किंवा तुमचे मित्र परिवार तुम्हाला ती रक्कम देण्यास तयार असतील. मी हे वरील सर्व सुरुवातीच्या टप्प्यासाठी सुचवत आहे.

एकदा तुमचा व्यवसाय सुरू झाला की तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करू शकता आणि पुढच्या टप्प्यावर जा. त्यामुळे धोका कमी करता येईल. मित्रांनो तुम्ही कुठूनही पैसे उधार घेऊ शकता पण तुम्ही वर्षभरासाठी तयार केलेला बिझनेस प्लॅन शक्य तितका तपशीलवार (डिटेल मध्ये डॉक्युमेंट केलेला) असावा. जेणेकरून गुंतवणूकदारांना खात्री होईल की हा व्यवसाय नक्कीच चालेल आणि जर आम्ही यामध्ये गुंतवणूक केली तर आमचे कोणतेही नुकसान होणार नाही.आणि व्यवसायातून फक्त नफा मिळेल.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

रेवेन्यू मॉडेल (Revenue Model)

तुमच्या व्यवसायामधील आर्थिक यशासाठी रेवेन्यू मॉडेल खूप महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या बिजनेस मधून उत्पन्न कसे मिळवाल आणि तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ऑनलाइन तसेच हार्ड कॅशमध्ये कशी बदलू शकाल हे ते स्पष्ट करते. तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना एक परफेक्ट रेवेन्यू मॉडेल महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टच्या ऑफरची किंमत कशी ठरवायची, योग्य ग्राहकांना लक्ष्य कसे करायचे हे ठरविण्यात मदत करते, डीलरला, रिटेलरला आणि एंड कस्टमरला किती डिस्काउंट द्यायचे याची स्पष्टता देते. आणि शेवटी, तुम्हाला आजच्या इंडस्ट्रियल जगात पुढे राहण्यासाठी आणि बिझनेस वाढण्यासाठी आवश्यक असलेले निधी सुरक्षित कसे ठेवावे यास मदत करते.

ग्राहकांना थेट उत्पादने विकण्यापासून (मोबाईल विकणारी कंपनी) तसेच सेवेसाठी (उदा: Netflix कंपनी) यामध्ये सबस्क्रिप्शन ऑफर करण्यापासून वन टाइम विकत घेण्यापर्यंत अनेक रेवेन्यू मॉडेल आहेत. तुमच्यासाठी सर्वोत्तम मॉडेल तुमच्या विशिष्ट व्यवसाय कल्पना आणि फोकस मार्केटवर अवलंबून असेल.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

मार्केटिंग स्ट्रॅटर्जी (Marketing Stratergy)

मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे तुमच्या प्रॉडक्टला इतरांपेक्षा वेगळे बनवणे त्याला USP सुद्धा म्हणतात म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट. तुमच्या प्रॉडक्ट मध्ये असे काय वेगळेपण आहे जे लोकांना विक्री करण्यास भाग पाडेल याचा विचार तुम्ही करणे गरजेचे आहे. एखाद्या डायरीचे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता सर्वजण डायरी बनवतात पण त्याचे कव्हरिंग पेज वेगळे बनवणे, कलरिंग छान असणे, डायरीमध्ये पेज मार्कर असणे हे डायरीला वेगळेपण देते. आणि कस्टमरला ते मौल्यवान वाटून पैसे देण्यासाठी त्यांना सुद्धा आनंद होतो.

मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रोडक्ट साठी खूप महत्त्वाचे असते. 

यासाठी आजच्या काळातील बेस्ट उदाहरण म्हणजे स्टारबक्स जिथे कॉफी सोबतच शांत वातावरण, वायफाय ची सेवा, काम करण्यास छोटीशी जागा हे सर्व स्टारबक्स ऑफर करते. ज्यामुळे कस्टमर तासंतास तिथे काम करत बसतात आणि त्यासोबतच कॉफी सुद्धा मागवतात. यांच्या कॉफीची प्राईस जास्त असते ज्यामुळे त्यांचा टार्गेट ऑडियन्स हा मोठ्या प्रमाणात ऑफिस काम करणाऱ्या लोकांचा असतो. इथे टार्गेट ऑडियन्स आधीच सेट केल्यामुळे बिझनेस ला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळून गेली आहे. या स्ट्रॅटर्जीमुळे ब्रँड व्हॅल्यू सुद्धा वाढवण्यास मदत होते. हे सर्व मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमुळे शक्य आहे.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

प्रॉडक्ट डेव्हलपमेंट (Product Development)

आयडिया जनरेट झाली, मार्केट रिसर्च, टार्गेट ऑडियन्स, बिझनेस प्लॅनिंग, मार्केटिंग स्ट्रॅटर्जी हे सर्व झाले पण आता यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. तुमचे प्रॉडक्ट ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे असू शकते. जर ऑनलाईन असेल तर तुम्ही सॉफ्टवेअरची मदत घेऊन असे आकर्षक आणि उपयुक्त प्रॉडक्ट निर्माण करू शकतात (ज्यामध्ये आर्टिकल रायटिंग, व्हिडिओ मेकिंग, टूल्स, सॉफ्टवेअर, वेबसाईट) अशा गोष्टी येतात. ऑनलाईन प्रॉडक्ट मध्ये भांडवल कमी असते.

ऑफलाइन म्हणजेच फिजिकल प्रॉडक्ट जर तुम्ही बनवला असाल तर तुम्हाला वर्कशॉप किंवा प्लांटची गरज हमखास भासते. ज्यामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अशा वेळी सुरुवातीला प्रॉडक्ट तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा बाहेरून बनवून घेऊन त्या  प्रॉडक्ट वर स्वतःचा लोगो लावून थोड्याशा अधिक भावाने मार्केटमध्ये विकू शकता त्यास व्हाईट लेबलिंग किंवा ॲफीलेट मार्केटिंग सुद्धा म्हणतात. त्यामुळे तुमचा लागणारा खर्च वाचतो आणि प्रॉफिट सुद्धा चांगल्या प्रकारे मिळवता येतो. 

प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये डिझाईन पासून मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत सर्व तुम्हाला बघावे लागते.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

सेल्स आणि मार्केटिंग (Sales and Marketing)

आता असे हजार प्रॉडक्ट तर तुम्ही बनवलेत पण ते मार्केटमध्ये विकले गेल्याशिवाय त्याचा काही फायदा आहे का? नक्कीच नाही. जर प्रॉडक्ट विकलेच गेले नाही तर बिजनेस डुबण्यापासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे सेल्स आणि मार्केटिंग हे दोन्ही सेक्शन महत्त्वाचे आहेत. प्रॉडक्ट चा वापर कस्टमरला समजावून त्याची बुकिंग करणे महत्त्वाचे असते यामध्ये कस्टमरला कन्व्हिन्स करण्याचा मोठा रोल सेल्स टीम करते. या सोबतच मार्केटिंग टीम तुमच्या प्रॉडक्टचे ऍडव्हर्टाइजमेंट बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते ज्यामुळे तुमचा प्रॉडक्ट कस्टमरच्या नजरेत येतो आणि त्यामुळे कस्टमर तुमचा प्रॉडक्ट विकत घेण्यास तुमच्या शॉप मध्ये जातो. यासारखेच ऑनलाइन प्रोडक्ट साठी सुद्धा वेगवेगळ्या कस्टमर पर्यंत ऑनलाईन प्रॉडक्ट पोहोचवणे महत्त्वाचे असते.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi

बुकिंग आणि सप्लाय चेन (Booking and Supply Chain)

तर आता आपण वळूया शेवटचा मुद्द्याकडे जो आहे बुकिंग आणि सप्लाय चेन. ऑनलाईन प्रॉडक्ट मध्ये ई-कॉमर्स प्रॉडक्ट सोडून बाकी कोणत्याही प्रॉडक्टची बुकिंग आणि सप्लाय होत नाही. पण ऑफलाइन म्हणजेच फिजिकल प्रॉडक्ट मध्ये ऑर्डर बुकिंग आणि ऑर्डर डिलिव्हरी हा सर्वात मोठा भाग असतो. ज्यामध्ये कस्टमरची ऑर्डर इन्क्वारी,ऑर्डर बुकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग आणि डिस्पॅचिंग हे मुद्दे खूप मोठा रोल प्ले करतात. यामध्ये कस्टमरच्या हातात प्रॉडक्ट नीटपणे पोहोचवण्यापर्यंत सर्व काही येते. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

चला तर मग आता स्वतःचा छोटासा का होईना बिजनेस सुरू करण्याचा फक्त विचार न करता तो प्रत्यक्षात उतरवा. फक्त रिस्क नाही तर एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट भले हळू होईल पण नुकसान मोठे होणार नाही. वर आम्ही सुचवल्याप्रमाणे लोकांना तुमच्या बिझनेस मधून काय व्हॅल्यू मिळेल हे पहिले शोधा आणि भले ती गोष्ट छोटी असेल पण लोकांचा त्यामधून फायदा होत असेल आणि वेगळेपण जपले जात असेल तर तुमचा बिजनेस भरभराटीस नेण्यास कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही.

स्वतः बिझनेसमॅन व्हा ! स्वप्न.. नव्हे सत्य|How to Start own Business in marathi
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment