Table of Contents
ToggleIIT Bombay ने केली प्लेसमेंटची खरी स्थिती स्पष्ट
- IIT Bombay च्या अनेक पदवीधरांना नोकऱ्या शोधण्यात अडचण येत असल्याच्या बातम्या अलीकडेच आल्या पसरल्या होत्या. पण खुद्द आयआयटी बॉम्बेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ह्या नंबरमध्ये फारसे तथ्य नाही आहे. पदवीधर विद्यार्थ्यांपैकी फक्त 6.1% विद्यार्थीच अजूनही नोकरीच्या शोधात आहेत.
- याचा अर्थ बहुतेक पदवीधरांकडे आधीच नोकऱ्या आहेत किंवा ते पदवीधर कोर्स करण्यासाठी उत्सुक आहेत , प्रयत्न करत आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात जात आहेत. त्याचबरोबर ऑफ कॅम्पस प्लेसमेंट साठी काहीजण तयारी करत आहे व काही गवर्नमेंट परीक्षांसाठी तयारी करत आहेत.
- त्यामुळे, असे दिसते की IIT Bombay ग्रॅज्युएट्स पदवीधर झाल्यानंतर विविध पर्यायांसाठी ओपन आहेत.
सर्वेक्षणानुसार, 57.1% ने संस्थेच्या कार्यक्रमाद्वारे प्लेसमेंट मिळवल्या तर 12.2% ने उच्च पदव्यांचा पाठपुरावा करण्याचा विचार केला.
IIT Bombay ने मीडियाच्या एका 36% मुलांना प्लेसमेंट न मिळाल्याचा अहवाल धुडकावून लावत सांगितले आहे की केवळ 6.1% विद्यार्थी सक्रियपणे रोजगार शोधत आहेत. आणि हा डेटा संस्थेने 22-23 पदवीधर विद्यार्थ्यांच्या एक्झिट सर्वेक्षणातून घेतलेला आहे.
IIT Bombay ने सांगितलेली तथ्ये
सर्वेक्षणात दोन मुख्य गोष्टी दिसून आल्या:
- IIT Bombay मधून पदवी घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात आणि त्यांच्यासाठी अनेक पर्याय आहेत.
- काही विद्यार्थ्यांना ताबडतोब नोकरी घेण्याऐवजी त्यांचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे तर काहींना सार्वजनिक सेवेत काम करायचे आहे.
- यावरून असे दिसून येते की विद्यार्थी पदवीनंतर नोकरी मिळवण्यापेक्षा अधिक इतर गोष्टीनचा देखील विचार करतात.
- ही सर्व माहिती एकत्रितपणे पाहिल्यास, IIT Bombay पदवीधरांच्या निवडी कालानुरूप बदलत आहेत हे आपण पाहू शकतो.
- IIT Bombay चे प्रमुख वक्ते सांगतात की” ही माहिती उपयुक्त आहे कारण ती आम्हाला विद्यार्थी कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या शोधत आहेत हे समजून घेण्यास मदत करते”.
जर तुम्हाला IIT Bombay मध्ये प्रवेश मिळवता आला नाही तर तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत?
IIT Bombay साठी आयआयटी जेईई ही परीक्षा असते .जी भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते याची अनेक कारणे आहेत. परंतु दुर्दैवाने, या प्रयत्नात खरोखर यश मिळविणारे विद्यार्थी फार कमी असतात.याचे प्रमुख कारण हे आहे की या संस्थांची प्रतिष्ठा ही उच्च कुशल व्यावसायिकांवर आधारित आहे ज्यांना ते प्रशिक्षण देतात त्यामुळे प्रवेश कठीण असावा असे वाटते.
इतर टॉप इंजीनीरिंग एंट्रेन्स परीक्षा
- फक्त अभियांत्रिकी केंद्रित:-
- BITSAT (Birla Institute of Technology and Science (BITS) Pilani)
- COMEDK (Consortium of Medical Engineering and Dental Colleges of Karnataka)
- MHCET (महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी)
- VITEEE (व्हीआयटी वेल्लोर आणि त्याच्या इतर कॅम्पसमध्ये प्रवेशासाठी)
- SRMJEEE(एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलजी बीटेक प्रोग्राम्सच्या प्रवेशासाठी)
- फक्त संशोधन केंद्रीत:-
- IIITH UGEE (त्यांच्या दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी)
- KVPY (IISc आणि IISER मध्ये प्रवेशासाठी)
- IISER अभियोग्यता चाचणी (IISER मध्ये प्रवेशासाठी)
- NEST (NISER मध्ये प्रवेशासाठी)
- ISI आणि CMI प्रवेश परीक्षा (ISI आणि CMI मधील गणित आणि सांख्यिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी)
गवर्नमेंट स्पर्धा परीक्षा
- NDA (जर तुम्हाला सशस्त्र दलात सामील होण्यास स्वारस्य असेल)
- UCEED आणि NIFT (प्रीमियर कॉलेजमधील फॅशन डिझायनिंग कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी)
- CLAT (लॉं च्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी)
- CA-CPT (CA अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी)
- GRE (जर तुम्हाला परदेशात तुमचे नशीब आजमावायचे असेल तर)
क्रिएटिव करियर पर्याय
- जेव्हा आपण एखाद्या पूर्व परीक्षेची किंवा गवर्नमेंट च्या एंट्रेन्स परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा आपण नुसते टार्गेट च्या मागे धावत असतो. जस की मला IIT JEE परीक्षेत ९९% मार्क्स मिळवायचे आहेत. आणि त्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतो. पण आयुषयात बॅकअप प्लान नेहमी असावा. जेणेकरून तुम्ही एकीकडे नापास झालात तरी ती मेहनत अश्या योग्य ठिकाणी वापरली जाईल की तिथे तुम्ही १००% मार्क्स मिळवणारच.
- सध्याचे जग खूपच अप्रत्याशित(unpredictable) आहे. कारण की तुम्ही तयार लाख कराल हो परंतु कॉलेज च्या सीटच जर कमी भरायला लागल्या तर. स्पर्धा परीक्षांमद्धे वेकन्सी /रिक्त पदे च जर कमी निघाली तर?
- मला mila kunis ह्या अमेरिकन अॅक्ट्रेस चे quote इथे आठवते ज्या सांगतात “Always Have A Backup Plan”.
- JEE MAINS मध्ये सुमारे 13 लाख विद्यार्थी अर्ज करतात टोटल आयआयटीच्या 10 हजार जागांसाठी, म्हणजे 130 विद्यार्थी एकाच जागेसाठी लढतात. याचा अर्थ सुमारे 12 लाख उमेदवार ते करू शकनार नाहीत. या वर्षी जेईई मेन उत्तीर्ण होऊ न शकलेल्या १२ लाख उमेदवारांपैकी तुम्ही एक असाल, तर निराश होण्यासारखे काहीच नाही! लोकसंख्येच्या वाढीसह विद्यार्थ्यांसाठी चांगल्या टक्केवारीसह मुख्य परीक्षा उत्तीर्ण करणे अधिक कठीण झाले आहे. आज, तुम्ही तुमच्या JEE-Mains क्रॅक करण्यात अयशस्वी झालात तरीही तुमच्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. म्हणून शांत व्हा आणि आशा सोडू नका.
- Erudera च्या रीपोर्ट नुसार IIT मध्ये स्वीकृती दर सुमारे 1 टक्के आहे, ज्यामुळे ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा आहे. 23 वेगवेगळ्या IIT मध्ये सुमारे 11,000 जागांसाठी दरवर्षी 1.2 दशलक्षाहून अधिक उमेदवार असतात. या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी सरासरी दोन वर्षे सतत प्रयत्न करावे लागतात . म्हणूनच खाली दिलेल्या वेगवेगळ्या करियर संधीचा आताच फायदा करा.
- एखादे freelancing skill आतच शिकून ठेवा, जेणेकरून तो तुमचा बॅकअप प्लान होऊन जाईल.
12वी नंतर कोणता कोर्स सर्वोत्तम आहे जाणून घ्या! After 12th which course is best
Banking Courses Information in Marath|12वी नंतरच्या सर्वोत्तम बँकिंग अभ्यासक्रमांचे पर्याय
12वी कॉमर्स गणिताशिवायही उज्ज्वल भविष्य!|Career options after 12th Commerce
10वी,12वी नंतरचे सर्वोत्कृष्ट संगणक अभ्यासक्रम|Best Computer Courses for High Salary
लक्षात ठेवा :
- कोणत्याही मोठ्या कंपनीला अप्लाय करताना समजून घेण्याच्या गोष्टी :
- ज्या कंपनी साठी अर्ज करत आहात तीच बॅकग्राऊंड, गोल्स,मिशन, प्रॉडक्ट, सेल्स,कस्टमर याचा एकूण अभ्यास असणे गरजेचे असते. त्याचबरोबर कंपनीच्या घोषणा (Announcements) आणि कमाईच्या अहवालांकडे (Earnings reports) लक्ष द्या. हे तुम्हाला कंपनीच्या आर्थिक आरोग्याविषयी आणि भविष्यातील दिशेबद्दल संकेत देऊ शकते.
- तुमचा उद्योग विशिष्ट सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञानावर अवलंबून असल्यास, तुम्ही नवीनतम आवृत्त्यांमध्ये (latest versions) निपुण आहात याची खात्री करा.
- नवीन आव्हानांसाठी खुले व्हा आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या घेण्यास तयार रहा .
- इतरांशी सहयोग करण्याची आणि सकारात्मक कामाच्या वातावरणात योगदान देण्याची इच्छा ठेवा.
निष्कर्ष | Conclusion
- इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ने 26 मार्च रोजी जारी केलेल्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 नुसार, यावेळी नोकरी शोधणे खूप कठीण आहे, विशेषतः भारतातील अधिक शिक्षित तरुणांसाठी.पण जरी असे असेल तरी वेळेनुसार स्वताला अपडेट ठेवणे आपले कामं आहे. त्यासाठीच आपण निवडलेल्या स्ट्रीम नुसार अचूक व भविष्यवादी कोर्स करणे गरजेचे आहे. जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा ठरवतील!
- उद्योग प्रकाशनांवर लक्ष ठेवा, कॉन्फ्रेंसना उपस्थित राहा किंवा सोशल मीडियावर इंडस्ट्री लीडरचे अनुसरण करा. हे तुम्हाला तुमचे क्षेत्र/फील्ड कोठे जात आहे आणि कोणत्या नवीन कौशल्यांची मागणी आहे हे समजण्यास मदत करेल.