Blockchain म्हणजे? : Bitcoin ज्यावर आधारित आहे अशा Blockchains काम कशा करतात?

What is the meaning of blockchain in marathi?

 

नमस्कार मित्रांनो! निवडणुकीत मतदान करायला गेल्यावर जेव्हा तुम्ही EVM वर तुमच्या आवडत्या पक्षाचे बटण दाबता. तुमचे मत प्रत्यक्षात नोंदवले जाईल याची खात्री कोण देते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमचे मत प्रत्यक्षात मोजले गेले आहे हे कोण सांगते? तर याचे उत्तर आहे ‘निवडणूक आयोग’. मतमोजणी मध्ये कोणतेही घोटाळे होणार नाहीत याची जबाबदारी केंद्रीय एजन्सीने म्हणजेच निवडणूक आयोगाने घेतली आहे. पण आपले प्रत्येकाचं मत अगदी आपण मत दिलेल्या पक्षाच्याच यादीमध्ये आहे की नाही हे कोणी सांगत नाही, बरोबर? निवडणूक आयोगावर आंधळेपणाने विश्वास ठेवावा लागतो.

पण मित्रांनो अशी कल्पना करा की तुमचे मत खरंच मोजले गेले आहे की नाही याची खात्री कोणतीही केंद्रीय एजन्सी, निवडणूक आयोग किंवा कोणत्याही थर्ड पार्टी न देता, जर तुम्ही स्वतः देऊ शकला असता म्हणजेच स्वतःच्या मतांची पडताळणी करू शकला असता तर?

तुम्हाला माहिती आहे का, Blockchain वापरून अशी सिस्टीम तयार केली जाऊ शकते.

आणि हो! हे तेच तंत्रज्ञान आहे ज्यावर Bitcoin आधारित आहे. हे तर नाव तुम्ही ऐकलेच असेल? तर Blockchain Technology म्हणजे नक्की काय आहे? ती कशी काम करते? आणि  आजच्या काळात ब्लॉकचेन कुठे वापरली जाते? याची अगदी कमी आणि सोप्या भाषेत माहिती आम्ही पुढे दिली आहे. तर ती नक्की वाचा आणि आणि ब्लॉकचेनचे महत्त्व जाणून घ्या.

What is Blockchain in simple words-

Blockchain हे मुळात माहिती साठवण्याचे तंत्र आहे. यामध्ये विकेंद्रित पद्धतीने डेटा संग्रहित केला जातो. विकेंद्रीत म्हणजे केंद्रित नसलेला, कोणी एक याचा एडमिन नसतो तर प्रत्येक जण हा डेटा पाहू शकतो आणि कोणी यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला थांबवू शकतो.

यामध्ये तुम्ही RBI चे उदाहरण घेऊ शकता. आपल्या भारतातील रुपयांमधील ₹ 500 ची नोट RBI छापते. RBI याची हमी देते की त्याचे मूल्य ₹500 आहे. ₹501 किंवा ₹502 नाही. RBI याची गॅरंटी देते असेही  नोटवर लिहिलेले आहे. त्यामुळे RBI ही मुळात जगभरातील सर्व भारतीय रुपयाच्या नोटांवर नियंत्रण ठेवणारी केंद्रीय एजन्सी आहे. रिझर्व्ह बँकेला हवे असल्यास नोटांचे मूल्य बदलू शकते. नोटांचे उत्पादन वाढवू शकते किंवा कमी करू शकते.

Bitcoin ज्यावर आधारित आहे अशा ब्लॉकचेनचा बना डेव्हलपर

पण दुसरीकडे, Bitcoinचे नाव तुम्ही ऐकले असेल, तर Bitcoin विकेंद्रीत आहे. पण Bitcoin नक्की काय करते हे तुम्हाला माहित आहे का? 

Bitcoin ने अगदी बँकांचे अस्तित्व नाहीसे करण्याचा प्रयत्न केला आहे. Bitcoin नियंत्रित करणारी कोणतीही केंद्रीय संस्था किंवा अधिकारी नाहीत. बिटकॉइन मध्ये तुम्ही व्यवहार करू शकता म्हणजेच पैशाप्रमाणे एकमेकांना बिटकॉइन पाठवू शकता आणि त्यावरून खरेदी विक्री करू शकता. कोणत्याही बँकेच्या पैशांची गरज यात भासत नाही. 

आजच्या काळात आपल्याला भारतामधून अमेरिकेमध्ये कोणाला पैसे पाठवायचे असतील तर बँक रुपयांचे डॉलर मध्ये रूपांतर करते आणि काही प्रमाणात फी घेऊन हे पैसे अमेरिकेला पाठवले जातात. पण बिटकॉइन मध्ये ही फी अगदी नसल्याप्रमाणेच असेल हे शक्य आहे कारण बिटकॉइन ब्लॉकचेनवर आधारित आहे आणि या तंत्रज्ञानात जगभरातील लोक सहभाग घेऊ शकतात. त्यामुळेच Blockchain हे असे तंत्रज्ञान आहे जे प्रत्यक्षात Bitcoin चे विकेंद्रीकरण करते [ट्रांजेक्शन(transaction) करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टीची यात गरज भासत नाही]

ब्लॉकचेन कसे कार्य करते?|How does blockchain work in marathi

Blockchain मध्ये, ब्लॉक्सच्या स्वरूपात माहिती साठवून ठेवली जाते. प्रत्येक ब्लॉक तीन मुख्य गोष्टींनी बनलेला असतो.

प्रथम, आपण ब्लॉकमध्ये साठवून ठेवलेला कोणताही डेटा किंवा माहिती (बिटकॉइन कोणाकडून आला आणि कुणाकडे जात आहे). दुसरे, प्रत्येक ब्लॉकचे फिंगरप्रिंट हॅश (प्रत्येक बॉक्सची युनिक आयडेंटिटी) म्हणून ओळखले जाते म्हणजेच प्रत्येक ब्लॉकचे स्वतःचे फिंगरप्रिंट असते. आणि तिसरे, यापैकी प्रत्येक ब्लॉक डेटा चा रेफरन्स मिळण्यासाठी त्याच्या आधीच्या ब्लॉकचे फिंगरप्रिंट साठवून ठेवतो

Block Chain

Blockchain मधील सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही ब्लॉकमधील डेटा बदलायचा असल्यास, कोणी डेटा सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास, ब्लॉकचा फिंगरप्रिंट किंवा हॅश बदलेल. आणि जर एका ब्लॉकचा हॅश बदलला तर पुढच्या ब्लॉकचा हॅश देखील बदलेल. आणि पुढे अखेरीस संपूर्ण Blockchain नष्ट होईल. या कारणामुळे, Blockchain मधील डेटामध्ये बदल करणे किंवा छेडछाड करणे अशक्य आहे.

Bitcoin ज्यावर आधारित आहे अशा ब्लॉकचेनचा बना डेव्हलपर

Blockchain सुरक्षित असण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे विकेंद्रीकरण. Blockchain एका मोठ्या कॉम्प्युटरच्या नेटवर्कमध्ये नियंत्रित केले जाते. जगभरातील जितके कॉम्प्युटर बिटकॉइनमध्ये सहभागी आहेत त्यांना नोड्स म्हटले जाते. त्यामध्ये काहीजण असतात ‘मायनर्स’. जेव्हा ब्लॉगचेन मध्ये नवीन डेटा भरायचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो डेटा व्हेरिफाय करण्याचे काम  या मायनर्सचे असते. त्यांच्या प्रत्येकाच्या कॉम्प्युटरवर बिटकॉइनच्या ट्रांजेक्शनची कॉपी शेअर केली जाते

ज्या माणसाने यामध्ये डेटा भरला आहे तो बरोबर आहे कि नाही, यासोबतच कोणी डेटा हॅक तर करायचा प्रयत्न नाही ना केला  हे चेक करणाचे काम हे मायनर्स करतात. त्यामुळे एखाद्या डेटा मध्ये कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर बिटकॉइन मध्ये सहभागी झालेले सर्व कॉम्प्युटर्स त्याची पडताळणी करतात. त्यासाठी कोणत्याही त्रयस्थ (बँक सारखी थर्ड पार्टी) किंवा व्यक्तीची गरज नाही. तर सर्व कंट्रोल प्रत्येकाच्या हातात असतो. 

पुढचा प्रश्न हा हाच असणार की हे काम करण्यासाठी मायनर्स ना मिळते तरी काय? Blockchain मध्ये 51% टक्के  (अर्ध्याहून जास्त) बिटकॉइन धारकांनी ट्रांजेक्शन एक्सेप्ट केले म्हणजे ते ट्रांजेक्शन योग्य असते. ट्रांजेक्शन एक्सेप्ट आणि रिजेक्ट करण्यासाठी बिटकॉइन धारकांना काही छोटे छोटे बिटकॉइंस बक्षीस म्हणून दिले जातात. 

कोणी म्हणेल हॅकर्स ने या सर्व कॉम्प्युटर्स  ना हॅक केले तर? बिटकॉइन मध्ये 500-1000 लोकांनी सहभाग घेतलेला नाही तर जगभरातील  लाखांमध्ये बिटकॉइन धारक उपलब्ध आहेत त्यामुळे प्रत्येक कम्प्युटरला हॅक करणे अगदी अशक्य असते. तुम्ही म्हणाल जर डेटा सर्वांना दिसत असेल तर डेटा प्रायव्हसी कशी नीटपणे राहील? तर यामध्ये प्रत्येक कॉम्प्युटरकडे एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक Key असते. जसं की तुमचा ईमेल आणि पासवर्ड. तर ब्लॉक चेन मध्ये तुमचा आयडी हा एक अक्षर आणि अंकांनी बनलेला युनिक आयडी असतो. ज्याने तुम्ही तुमच्या ब्लॉक मध्ये लॉगिन करू शकाल. त्यामुळे सुरक्षिततेसाठी बिटकॉइन उपयुक्त ठरतो. 

5 April 2018 मध्ये RBI ने सर्व बँकांना नोटीस पाठवली होती की जे लोक Cryptocurrency मध्ये व्यवहार करत आहेत त्यांना बँक मधून पैसे काढणास परवानगी देऊ नये. मग यानंतर क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज ने सुप्रीम कोर्टमध्ये या विरोधात केस लढली. आणि दोन वर्षात ही केस क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज ने जिंकली. त्यानंतर RBI ने या गाईडलाईन्स मागे घेतल्या. त्यामुळेच बिटकॉइन भारतामध्ये कायदेशीर आहे पण त्याची रिस्क पूर्णपणे बिटकॉइन धारकांवर अवलंबून असते.

ब्लॉकचेनचा वास्तविक जीवनातील वापर

खऱ्या आयुष्यातील Blockchain चे वापर| What is a real life example of a blockchain?

लोकांनी बऱ्याचदा blockchain हे नाव ऐकले असेल परंतु त्याचे उपयोग काय आहेत आणि Real life उदाहरणे काय आहेत हे समजून घेऊ !!
 

अशा तंत्रज्ञानाचा चा वापर मतदानामध्ये केला जाऊ शकतो ज्यामुळे आपल्याला याची खात्री असेल की आपले मत अगदी योग्य ठिकाणी गेले आहे.

त्यासोबतच याचा वापर हॉस्पिटलमध्ये पेशंटची माहिती साठवून ठेवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे डॉक्टर पेशंटचे मेडिकल सर्टिफिकेट ब्लॉकचेन द्वारा अपलोड करू शकतात. आणि त्यामध्ये काही बदल करायचा असल्यास पेशंट आणि डॉक्टर दोघांना हा बदल अप्रूव्ह करणे गरजेचे असते.

इतकेच नाही तर शैक्षणिक सर्टिफिकेट मध्ये छेडछाड न करण्यासाठी सुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे CBSE बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट ब्लॉकचेन च्या मदतीने अपलोड करू शकेल आणि त्यानंतर अपलोड झालेल्या सर्टिफिकेट मध्ये कोणीही बदल करू शकणार नाही.

त्यासोबतच जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा तो सप्लायर नीट वस्तू देईल की नाही किंवा सप्लायरला सुद्धा असा संदेह असतो की कस्टमर सर्व पैसे देईल की नाही. तर अशावेळी ब्लॉक चेनमध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट नावाचा ऑप्शन असतो. यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कोणी थर्ड पार्टीवर विश्वास ठेवण्याची गरज भासत नाही. सामान जसे पोहोचते तसे पैसे बँक अकाउंट कट होऊन सप्लायर कडे पाठवले जातात.

अशा तंत्रज्ञानाचा वापर आजच्या काळात सप्लाय चेन मॅनेजमेंट (SCM), क्लाउड कंप्युटिंग, स्टॉक ट्रेडिंग, रिअल इस्टेट आणि अगदी सरकारी एजन्सी द्वारे देखील केला जात आहे.

Blockchain म्हणजे? : Bitcoin ज्यावर आधारित आहे अशा Blockchains काम कशा करतात?

ब्लॉकचेन मधील करिअर

ब्लॉकचेनचे जग विविध प्रकारचे रोमांचक करिअर मार्ग ऑफर करते. तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड मधील असल्यास, तुम्ही ब्लॉकचेन डेव्हलपर, इंजिनीयर किंवा आर्किटेक बनू शकता, ब्लॉकचेन ऍप्लिकेशन्सच्या बेसिक डिझाईनची रचना आणि बांधकाम करू शकता. प्रोजेक्ट मॅनेजर हे प्रोजेक्टवर ट्रॅक ठेवतात, तर सल्लागार कंपन्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम फायदा कसा घ्यावा याबद्दल सल्ला देतात. अगदी बिगर-तांत्रिक क्षेत्रही यात सहभागी होत आहेत. 

ब्लॉकचेन मध्ये करिअर कसे बनवावे? त्यामध्ये कोणते कोणते जॉब रोल्स असतात? त्यासोबतच त्याचा किती फायदा आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment