Digital Marketing| मार्केटिंग जगातील एक वळण| जुन्या जाहिराती झाल्या बंद कारण…

Digital Marketing:  हेमा…. रेखा… जया और सुषमा, सबकी पसंद निरमा….सिर्फ एक सॅरीडॉन, सर दर्द से आराम…विको टर्मरिक क्रीम, नही कॉस्मेटिक क्रीम… विको टर्मरिक,टर्मरिक क्रीम….तुम हुस्न परी, तुम जाने जहा तुम सबसे हसीन तुम सबसे जवा| सौंदर्य साबुन निरमा…सौंदर्य साबुन निरमा…

आता तुम्ही विचार कराल हे काय आता यांचं नवीन? तर हे नवीन नाही अगदी जुनच आहे.. असा विचार करा की तुम्ही 2010 मध्ये एकत्र बसून टीव्ही बघत आहात आणि त्यामध्ये या जाहिराती चालू आहेत. मग दिवसभर या काव्यात्मक ओळी तुमच्या नक्कीच लक्षात राहत असत. तर अशा ॲडवर्टाइजमेंट (जाहिराती) मागील हेतूच हा असे की त्यामधील प्रोडक्ट लोकांच्या चांगले लक्षात रहावे आणि जेव्हा त्यांना गरज भासेल तेव्हा बाजारात तेच प्रॉडक्ट त्यांनी घ्यावे

टीव्ही सोबत वर्तमानपत्रांमध्ये असलेले पॅम्प्लेट पण तुम्ही पाहिलेच असेल आणि भिंतीवर/ बस आणि ट्रेन वर लावलेली प्रॉडक्ट चे पोस्टर्स अजूनही तुम्ही पाहत असाल. त्यासोबत रस्त्यांच्या बाजूला मोठमोठे होल्डिंग तर जागोजागी बांधलेले असतात ज्यावर दर आठवड्याला प्रॉडक्टची एडवर्टाइजमेंट बदलत असते. 

इतके सारे मार्केटिंगचे मार्ग आहेत. बरोबर!  पण अशा मार्केटिंगचा एक तोटा सुद्धा आहे. तो कोणता हे जाणून घेण्यासाठी पुढील सोपी उदाहरणांसोबतची माहिती नक्की वाचा आणि जाणून घ्या डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? त्याची सुरुवात कशी झाली? त्याची कोणकोणते फायदे आहेत? या मार्केटिंगचे कोणकोणते प्रकार आहेत?डिजिटल मार्केटिंग मधील करिअर आणि डिजिटल मार्केटिंग आजच्या काळात खूप जास्त का वापरली जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे नक्कीच मिळतील. तर वाचा आणि अंमलात आणा.

Digital Marketing| मार्केटिंग जगातील एक वळण| जुन्या जाहिराती झाल्या बंद कारण...

एक जॉय आणि वीर नावाचे दोन रेस्टॉरंट मालक होते. ते दोघेही खूप चांगले मालक होते आणि लोकांना त्यांच्या रेस्टॉरंटमधील स्वादिष्ट जेवणाने खुश करत होते. आता दोघांनीही त्यांचा व्यवसाय अधिक उंचीवर नेण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी चांगल्या बिजनेस कन्सल्टंट सोबत संपर्क साधला आणि तेव्हा त्यांना मार्केटिंग करणे गरजेचे आहे हे उत्तर मिळाले. मग त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टचे मार्केटिंग करणे चालू केले. 

जॉय ने काही सेल्स मेन ला कामावर घेतले, त्यांची त्याच्या रेस्टॉरंटचे पॅम्प्लेट वाटायला लावले, वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या, भिंतीवर पोस्टर्स लावले, जवळपासच्या छोट्या छोट्या होल्डिंग वर प्रॉडक्टची एडवर्टाइजमेंट केली. इतकेच नाही तर रेडिओ, टीव्हीवर जाहिराती तसेच खेळाडूंच्या टी-शर्ट वर सुद्धा रेस्टॉरंटची ऍडव्हटाईजमेंट करण्याचे पूर्ण प्रयत्न त्याने केले. पण या सर्वामुळे त्याचा खर्च जास्त झालाच, पण तितका नफा सुद्धा त्यास झाला नाही

तर दुसऱ्या बाजूला वीरने एका मार्केटिंग कंपनीची मदत घेऊन फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब वर त्याचे रेस्टॉरंटचे व्हिडिओ आणि फोटोज टाकण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणेच त्याने रेस्टॉरंट ची एक  वेबसाईट बनवून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास प्रयत्न केला. त्याप्रमाणे ई-मेल मार्केटिंग, इन्फ्लुएन्स मार्केटिंग या पद्धतींचा वापर केला. आता तुम्हाला हे माहीतच असेल की सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक उपलब्ध असतात व जे काही आपण त्यावर बघतो त्याच संबंधित अधिक माहिती पाठवण्याचे काम सोशल मीडिया करते. अशा प्रकारच्या आधुनिक पद्धतीमुळे ज्या लोकांना आपल्या प्रॉडक्टची खरच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अगदी सोपे होते त्यामुळे अशा पद्धतीने वीरचा खर्च कमी झाला व नफा जास्त

तर तुम्हाला वरील उदाहरणावरून हे समजून गेलेच असेल की डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुमच्या प्रॉडक्टची ज्यांना खरंच गरज आहे म्हणजेच लक्षित ग्राहक त्यांच्यापर्यंत अगदी सहजतेने पोहोचणे आणि आजच्या आधुनिक साधनांचा म्हणजेच लॅपटॉप, मोबाईल, त्यावरील सोशल मीडिया, वेबसाईट यांचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रॉडक्टचे मार्केटिंग करणे आणि उत्तम नफा मिळवणे.

Digital Marketing| मार्केटिंग जगातील एक वळण| जुन्या जाहिराती झाल्या बंद कारण...

डिजिटल मार्केटिंग केव्हा उदयास आले?

1991 मध्ये, वर्ल्ड वाइड वेबची (WWW. ची) ओळख टिम बर्नर्स ली यांनी जगासमोर केली. वेब कंटेंटची पोहोच सुलभ करण्यासाठी Yahoo आणि AltaVista सारख्या सर्च इंजिनांद्वारे सार्वजनिक प्रवेशासाठी इंटरनेट उघडले. 

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, डॉट कॉम बूमने ऑनलाइन व्यवसायात गुंतवणूक वाढवली आणि जाहिरातींद्वारे इंटरनेट जाहिरातींना जन्म दिला. 2000 मध्ये गुगल ऍडव्हर्टने पे पर क्लिक (PPC) आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO च्या) मदतीने वेबसाईट कशी रँक होते हे सांगितले. 

मग इसवी सन 2000 नंतर स्पेस, लिंकड इन, फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि असे बरेच प्लॅटफॉर्म उद्यास आले. त्यासोबतच मोबाईल मधील वेबसाईट रँकिंग आणि अपडेट मध्ये चालना मिळाली. 2010 नंतर डिजिटल मार्केटिंग लोकांच्या मार्केटिंग जगातील महत्त्वाचा भाग ठरली. 

2018 रोजी झालेल्या सर्वेनुसार इंटरनेट युजर्सची संख्या 4 बिलियन, सोशल मीडिया ची संख्या 3.2 बिलियन तर मोबाईल फोन युजर्स 5.14 बिलियनवर पोहोचले. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग फक्त मोठ्या कंपनीने नाही तर कमी खर्चिक असल्या कारणाने छोट्या छोट्या कंपनीने सुद्धा वापरण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. आणि आज 2024 मध्ये प्रत्येक गोष्ट मोबाईल वर केली जात असल्यामुळे प्रॉडक्टची मार्केटिंग करणे खूप सोपे आणि फायदेशीर झाले आहे.

Digital Marketing| मार्केटिंग जगातील एक वळण| जुन्या जाहिराती झाल्या बंद कारण...

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार

सोशल मीडिया मार्केटिंग -: 

या मार्केटिंग पद्धतीमध्ये तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंडिंग चा वापर तुमच्या प्रोडक्टची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास करता. यामध्ये लोकांना गुंतवून ठेवणारे कॉन्टेन्ट तुम्ही बनवू शकता ज्यामधून तुमच्या प्रॉडक्टची झलक लोकांच्या नजरेवर नक्कीच टाकता येते. आणि कॉन्टेन्ट जर अगदीच एंगेजिंग असेल तर लोक तुमचा प्रॉडक्ट घेण्यास नक्कीच मन वळवतात आणि त्यासोबतच त्यांच्या मित्रांनाही संदर्भ देऊन (अधिक माहिती देऊन) तुमचा बिजनेस वाढवण्यात मदत करतात.

ई-मेल मार्केटिंग -: 

यामध्ये एखाद्या प्रॉडक्टचा सेल लागला असेल तर त्याची जाहिरात करण्यासाठी तुम्ही तुमच्या कस्टमरला एकत्रितपणे ई-मेल करू शकता. किंवा तुम्ही नवीन प्रॉडक्ट तयार केले असाल किंवा जुन्या प्रोडक्ट मध्ये नवीन बदल तुम्ही घडवून आणले असाल तर त्याची माहिती कस्टमर पोहोचवण्यास ई-मेल मार्केटिंग उपयुक्त ठरते. त्यासोबत कस्टमरने तुमचे प्रॉडक्ट खूप दिवस विकत घेतले नसेल तर त्यांना आठवण करून देण्यासाठी सुद्धा तुम्ही ई-मेल मार्केटिंग वापरू शकता. 

ॲडव्हर्टायझिंग -: 

युट्युब, फेसबुक, गुगल वेबसाईट, काही ऑनलाईन ॲप्स यावर तुम्ही ॲडवर्टाइजमेंट (जाहिरात) पाहत असाल. अशा प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंग पद्धतीने लोकांपर्यंत प्रॉडक्ट पोहोचवणे, कॅम्पेन मध्ये सहभाग घेण्यास उत्सुक करणे, न्यूज लेटर्स पोहोचवणे, एंगेजिंग कंटेंट मध्ये गुंतवणे, आणि अजून जास्त लोकांपर्यंत प्रॉडक्ट पोहोचवणे शक्य होते. उत्तम एडवर्टाइजमेंट ही क्रिएटिव गोष्ट असते. यामध्ये तुम्ही बटन (Learn More, Read More, Buy Now, Sign Up) समाविष्ट करून  त्यावर प्रेस करण्यास लोकांना पुढे सरसावू शकता. 

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) -: 

SEO म्हणजे एखाद्या वेबसाईटवर लोक काही सर्च करतात तर त्याची माहिती देताना तुमचे कंटेंट सर्वांच्या वर असण्यासाठी केलेली कसरत. वेबसाईट सोबत यूट्यूब व्हिडिओ, इंस्टाग्राम व्हिडिओ मध्ये सुद्धा SEO महत्त्वाचे ठरते. ज्यामुळे लोकांना अगदी पहिल्याच क्लिकमध्ये तुमच्या प्रॉडक्टची माहिती मिळून जाते आणि तितक्या लवकर मार्केट कॅप्चर होण्यास मदत मिळते. 

ॲफीलेएट मार्केटिंग -: 

एखादे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवल्या नंतर त्याचा सेल झाल्यानंतर त्यातून मिळणारी इन्कम ज्यांनी  त्यामध्ये मदत केली त्यांस त्याचा हिस्सा मिळणे म्हणजेच ॲफीलेएट मार्केटिंग. 

वायरल मार्केटिंग -: 

वायरल मार्केटिंग मध्ये प्रॉडक्ट मालक. प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी  मदत केली त्यांस काही उत्पन्नातील हिस्सा देतो. अशा प्रकारच्या मार्केटिंग मध्ये अगदी विद्यार्थ्यांपासून, मोठ्या लोकांपर्यंत कोणीही भाग घेऊ शकतो व कमाई मिळवू शकतो.

इन्स्टंट मेसेज मार्केटिंग

रिअल-टाइममध्ये ग्राहकांसोबत मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा फायदा घेण्यासाठी ही डायनॅमिक आणि प्रभावी डिजिटल मार्केटिंग धोरण आहे. यामध्ये फेसबुक मेसेंजर, चॅटबॉट्स आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या व्यवसायांचा समावेश आहे. हे युजर्सना डिजिटल कनेक्शन वाढवण्यास सक्षम करून ॲप्सच्या व्यापक वापराचे ॲनालिसिस करते.

Digital Marketing| मार्केटिंग जगातील एक वळण| जुन्या जाहिराती झाल्या बंद कारण...

डिजिटल मार्केटिंग मधील जॉब रोल्स

1. सोशल मीडिया मॅनेजर (Social media manager)-:

सोशल मीडिया मॅनेजर हा फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म वरील महत्त्वाचा घटक असतो. ते लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि कंपनी काय ऑफर करत आहे याबद्दल लोकांना माहीत करून देण्यासाठी पोस्ट, चित्रे आणि व्हिडिओ बनवतात. ऑनलाईन जगात कंपनी कशाप्रकारे छान दिसेल यावर ते भर घालतात.

2. कॉपीरायटरर (Copywriter)-:

कॉपीरायटर ही एक अशी व्यक्ती आहे जी लोकांना एखादे उत्पादन वापरून पाहण्यास आणि वापरण्यासाठी उत्साहित करण्यास, प्रॉडक्टच्या सर्विस बद्दल अधिक माहिती देण्यासाठी किंवा लोकांना प्रॉडक्ट विकत घेण्यास पटवून देण्यासाठी जादूचे शब्द वापरतात. लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रॉडक्ट मध्ये लोकांची आवड निर्माण करण्यासाठी ते आकर्षक जाहिरातीच्या घोषणा, वेबसाइट कंटेंट आणि सोशल मीडिया पोस्ट यासारख्या गोष्टी लिहितात.

3. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) स्पेशालिस्ट-: 

SEO स्पेशालिस्ट हा वेबसाइट्स आणि सर्च इंजिनमधील अनुवादकासारखा (ट्रान्सलेटर सारखा) असतो. जेव्हा लोक विशिष्ट शब्द टाइप करतात (क्वेरी टाईप करतात) तेव्हा वेबसाइट सर्च रिझल्टच्या अगदी वरच्या स्थानी दिसण्यासाठी ते विशेष टूल्स आणि युक्त्या वापरतात. SEO स्पेशालिस्ट वेबसाइटना अधिक विजिटर्स व्हिजिट करण्यास आणि लक्ष वेधण्यात मदत करतात.

4. ईमेल मार्केटिंग स्पेशालिस्ट -:

ईमेल मार्केटिंग स्पेशालिस्ट हा डिजिटल मार्केटर आहे जो ग्राहकांशी अधिक कनेक्ट होण्यासाठी ईमेल वापरण्यावर लक्ष केंद्रित करतो. ते कस्टमर सोबत चांगले नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी आणि शेवटी विक्री वाढवण्यासाठी वृत्तपत्रे आणि जाहिराती यांसारख्या ईमेल कॅम्पेन तयार करतात. ई-मेल अधिक बोलका आणि कस्टमरला अधिक आवडेल असा तयार करण्यावर भर देतात.

5. कॉन्टेन्ट मॅनेजर

कॉन्टेन्ट मॅनेजर हा कोणत्याही प्रकारचे लिखित किंवा दृश्य असलेले कॉन्टेन्ट निर्माण करतात. ते ठरवतात की कोणत्या प्रकारचा कॉन्टेन्ट सामग्री (जसे की लेख, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट) आवश्यक आहे, ते चांगले लिहिलेले आणि मनोरंजक असल्याची खात्री ते करतात त्यासोबतच ती योग्य ठिकाणी ऑनलाइन प्रकाशित करण्याचे काम सुद्धा त्यांचे असते. ते मुळात कथाकार आहेत जे लोकांना/कस्टमरला समजून घेण्यास आणि कंपनीशी कनेक्ट करण्यात मदत करतात.

6. मार्केट रिसर्च आणि ॲनालिस्ट -:

मार्केट रिसर्च आणि ॲनालिस्ट मुळात व्यवसायिकांसाठी एक गुप्तहेर असतात. लोकांना कशाची गरज आहे आणि काय हवे आहे हे समजून घेण्यासाठी ते सर्वेक्षण आणि मुलाखती यांसारखे संकेत गोळा करतात. इतर व्यवसाय काय करत आहेत हे पाहण्यासाठी ते जगातील चालू असलेल्या स्पर्धेचाही अभ्यास करतात. ही सर्व माहिती एकत्र ठेवून, ते कंपन्यांना कोणती उत्पादने विकायची, त्यांची किंमत कशी ठरवायची आणि योग्य ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे हे शोधण्यात मदत करतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment